फोटो सौजन्य: Pinterest
इलेक्ट्रिक कारला जोरदार मागणी असून देखील Kia EV9 ला ग्राहकांनी वाऱ्यावर सोडले आहे. ही कार 360 डिग्री कॅमेरा, ADAS आणि 561 किमी रेंजने सुसज्ज असून देखील का फ्लॉप ठरली हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Kia इंडियाच्या पोर्टफोलिओमधील EV9 ही त्यांची सर्वात पॉवरफुल इलेक्ट्रिक SUV आहे. कंपनीने ती ऑक्टोबर 2024 मध्ये लाँच केली होती. मात्र, याची विक्री खूपच कमी झाली आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये या इलेक्ट्रिक कारचे फक्त 1 युनिट विकले गेले. कमी विक्रीचे एक प्रमुख कारण त्याची महागडी किंमत असू शकते. त्याची एक्स-शोरूम किंमत 1.3 कोटी रुपयांपासून सुरू होते. ती फक्त पूर्णपणे लोड केलेल्या GT-लाइन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. EV9 ही CBU मार्गाने भारतात आणली जाते. पूर्ण चार्ज केल्यावर त्याची ARAI-प्रमाणित श्रेणी 561 किमी आहे.
Kia EV9 मध्ये 99.8kWh बॅटरी पॅक आहे जो ऑल-व्हील ड्राइव्हसाठी ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्सना पॉवर देतो. दोन्ही इलेक्ट्रिक मोटर्स एकत्रित 384hp आणि 700Nm पीक टॉर्क निर्माण करतात, ज्यामुळे SUV 5.3 सेकंदात 0-100kph पर्यंत स्पीड पकडू शकते. 350kW DC फास्ट चार्जर वापरून या कारची बॅटरी 24 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करता येते.
EV9 मध्ये सहा सीट पाहायला मिळतात. दुसऱ्या रांगेत इलेक्ट्रिक ॲडजस्टमेंटसह कॅप्टन सीट्स, मसाज फंक्शन आणि ॲडजस्टेबल लेग सपोर्ट आहे. इतर फीचर्समध्ये 12.3-इंच टचस्क्रीन, एक मोठा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, तीन-झोन क्लायमेट कंट्रोल, ड्युअल इलेक्ट्रिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, डिजिटल इनसाइड रीअरव्ह्यू मिरर, व्हेईकल-टू-लोड फंक्शनॅलिटी, 14-स्पीकर मेरिडियन ऑडिओ सिस्टम, डिजिटल की, OTA अपडेट्स, Kia Connect कनेक्टेड-कार टेक्नॉलॉजीचे लेटेस्ट व्हर्जन आणि बरेच काही समाविष्ट आहे.
फक्त 5 हजार रुपये देऊन घरी आणा Bajaj Pulsar चा सर्वात स्वस्त मॉडेल, मायलेज तर एकदमच भारी
ही एसयूव्ही प्रवाशांच्या सुरक्षिततेवर सुद्धा लक्ष देते. यात 10 एअरबॅग्ज, ईएससी, डाउनहिल ब्रेक कंट्रोल, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, फ्रंट, रियर आणि रियर पार्किंग सेन्सर्स, ऑल-व्हील डिस्क ब्रेक, 360-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल 2 एडीएएस फीचर्ससह सुसज्ज आहे जसे की फॉरवर्ड टक्कर वॉर्निंग आणि अव्हॉइडन्स असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, हाय बीम असिस्ट आणि लेन कीप असिस्ट.






