फोटो सौजन्य: iStock
भारतात या वर्षी अनेक उत्तम कार्स लाँच झाल्या आहेत. यातील काही तर विक्रीच्या बाबतीत आजही सुसाट धावताना दिसत आहे. अनेक ऑटो कंपन्यांनी आपल्या वाहनांसोबत अनेक प्रयोग देखील केले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बजाजने जगातील पहिली सीएनजी बाईक आणणे. येणाऱ्या नवीन वर्षात सुद्धा अनेक उत्तम कार्स लाँच होणार आहे, ज्या नक्कीच ग्राहकांची मने जिंकणार आहे.
येणाऱ्या नवीन वर्षात भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 हा ऑटो इव्हेंट होणार आहे. या कार्यक्रमात अनेक उत्तम वाहनं लाँच केली जाऊ शकतात. अनेक कंपन्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. त्यातीलच एक म्हणजे स्कोडा.
Ambulance ला रस्ता न दिल्याने बसू शकतो चांगलाच फाइन, काय सांगतात वाहतुकीचे नियम?
नवीन Skoda Superb ची एंट्री लवकरच भारतात होणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये ही कार सादर केली जाईल. यासोबतच new Kodiaq आणि Octavia RS देखील सादर केले जातील. चौथ्या जनरेशन सुपर्बला शेवटच्या वेळी 2023 मध्ये जागतिक स्तरावर सादर करण्यात आले होते. चला जाणून घेऊया नवीन Skoda Superb मध्ये काय पाहायला मिळणार आहे.
जुन्या मॉडेलपेक्षा नवीन सुपर्ब अधिक स्टायलिश दिसते. दुसऱ्या जनरेशनमधील कोडियाक प्रमाणेच स्मार्ट डायल नियंत्रणे त्याच्या डॅशबोर्डवर दिसतील. काही फिजिकल बटणे कारच्या डॅशबोर्डवर देखील व्हिसिबल असतील, तर बहुतेक फंक्शन नवीन 13-इंचाच्या इन्फोटेनमेंट स्क्रीनवर देखील दृश्यमान असतील, जे नवीन कोडियाक प्रमाणेच आहे.
नवीन कारवर PPF Coating करणे खरंच फायद्याचे आहे का? जाणून घ्या ‘ही’ गोष्ट
नवीन Skoda Superb मध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्याय दिसू शकतात. यात 2.0-लिटर टर्बो पेट्रोल मिळण्याची अपेक्षा आहे, जे 204 hp किंवा 265 hp ची पॉवर जनरेट करेल. यासोबतच यामध्ये 1.5-लिटर मिड-हायब्रिड इंजिन देखील दिसू शकते. त्याचे इंजिन सात-स्पीड डीसीटीशी जोडले जाण्याची शक्यता आहे आणि हे VW मधील दोन्ही डी-सेगमेंट मॉडेलसाठी सामान्य इंजिन आहे.
चौथ्या जनरेशनमधील स्कोडा सुपर्ब पूर्णपणे तयार केलेले युनिट म्हणून आयात केली जाईल. त्यामागे स्थानिक पातळीवर असेम्बल केलेली मागील जनरेशनची सुपर्ब होती. 400 युनिट्सची मासिक विक्री पार करण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. त्याचबरोबर ग्राहकांना आकर्षित करणे कंपनीला अवघड जात आहे. कंपनी डिसेंबर 2024 मध्ये यावर 18 लाख रुपयांपर्यंत सूट देखील देत आहे.
तथापि, चौथ्या जनरेशनची सुपर्ब पूर्णपणे तयार केलेले युनिट म्हणून आयात केले जाईल. भारतीय परिस्थितीचा विचार करता त्यात काही बदल दिसू शकतात जसे की ADAS फीचर. ज्यांना डिझेल वाहने आवडतात त्यांच्यासाठी कंपनी CBU मार्गाने सुपर्ब डिझेल परत आणू शकते.