
फोटो सौजन्य: Pinterest
एसयूव्ही सेगमेंटमध्ये Nissan भारतात Magnite ची विक्री करते. आता कंपनी लवकरच त्यांची Nissan Tekton ही नवीन एसयूव्ही म्हणून लाँच करण्याची तयारी करत आहे. लाँच होण्यापूर्वी, या एसयूव्हीचा एक नवीन टीझर अलीकडेच सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
निसान लवकरच भारतात त्यांची नवीन एसयूव्ही, Tekton, लाँच करण्याची तयारी करत आहे. लाँच होण्यापूर्वी, कंपनीने सोशल मीडियावर एसयूव्हीचा एक नवीन टीझर जारी केला आहे, ज्यामध्ये याच्या एक्सटिरिअरबद्दल माहिती मिळाली आहे.
2025 मध्ये ‘ही’ Electric Car बनली ईव्ही मार्केटची बादशाह! मध्यम वर्गीय ग्राहकांनी भरभरून दिलं प्रेम
कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या टीझरमध्ये एसयूव्हीच्या मागील आणि पुढील भागाची झलक दाखवली आहे. ही कदाचित आतापर्यंतची सर्वात स्पष्ट झलक आहे, जी एसयूव्हीच्या अनेक फीचर्सबद्दल माहिती देते.
निसान टेक्सन एसयूव्ही तिच्या प्रमुख एसयूव्ही, Nissan Patrol पासून प्रेरित आहे. यात क्रोम-प्लेटेड फ्रंट ग्रिल, कनेक्टेड एलईडी लाईट्स, मोठे टेक्सन ब्रँडिंग, साइड प्रोफाइलवर प्रमुख व्हील आर्च, मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स, सी-डिझाइन कनेक्टेड टेल लॅम्प, सेंटर निसान लोगो आणि तळाशी री-एम्बॉस्ड टेक्सन ब्रँडिंग आहे. एसयूव्हीमध्ये मागील स्पॉयलर देखील आहे.
या एसयूव्हीमध्ये कंपनीकडून अनेक आधुनिक आणि आकर्षक फीचर्स देण्याची शक्यता आहे. यात एलईडी डीआरएल, एलईडी हेडलाइट्स, कनेक्टेड एलईडी टेललाइट्स आणि मोठी फ्रंट ग्रिल पाहायला मिळू शकते. यासोबतच, या एसयूव्हीमध्ये प्रीमियम इंटिरिअर, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, पॅनोरामिक सनरूफ आणि व्हेंटिलेटेड सीट्स यांसारखी सुविधा देण्यात येण्याची अपेक्षा आहे.
कंपनीकडून अद्याप अधिकृत लाँच तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, उपलब्ध माहितीनुसार ही एसयूव्ही फेब्रुवारी ते मार्च दरम्यान भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
निसानकडून ही एसयूव्ही मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये सादर केली जाणार आहे. बाजारात लाँच झाल्यानंतर या कारची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, Honda Elevate, Mahindra Scorpio आणि Tata Harrier यांसारख्या लोकप्रिय एसयूव्हींशी होणार आहे.