भारतीय बाजारात Nissan Magnite Kuro Edition लाँच
भारतात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्यांनी भारतीय ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार दमदार कार ऑफर केल्या आहेत. निसान ही त्यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी. नुकतेच कंपनीने Nissan Magnite Kuro Edition लाँच केली आहे.
निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा एक आकर्षक अवतार ‘Nissan Magnite Kuro Edition’ भारतीय बाजारात लाँच केली आहे. अत्यंत बोल्ड ब्लॅक थीम, प्रीमियम इंटीरियर्स आणि अनेक स्मार्ट फीचर्सनी सुसज्ज असलेल्या या स्पेशल एडिशन कारची किंमत 8.30 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. या कारची बुकिंग अधिकृत निसान डीलरशिप किंवा कंपनीच्या वेबसाइटवर केवळ ₹11,000 मध्ये करता येणार आहे.
भारतीय बाजारात Nissan Magnite Kuro Edition लाँच, किंमत फक्त ₹8.30 लाखांपासून सुरू
‘कुरो’ हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ ‘ब्लॅक’ असा होतो. या स्पेशल एडिशनमध्ये पूर्णतः ब्लॅक थीम वापरली गेली असून तिच्यात पियानो ब्लॅक फ्रंट ग्रिल, ग्लॉस ब्लॅक रूफ रेल्स, ब्लॅक डोअर हँडल्स, डायमंड कट R16 अलॉय व्हील्स आणि सेबल ब्लॅक वायरलेस चार्जरसारखी प्रीमियम फीचर्स आहेत. सिग्नेचर ब्लॅक एलईडी हेडलॅम्प्ससह लाईटसेबर टर्न इंडिकेटर्सही आकर्षणाचा भाग आहेत.
या मॉडेलमध्ये टर्बो-पेट्रोल आणि नैसर्गिक एस्पिरेटेड इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय, मिडनाईट डॅशबोर्ड थीम, पियानो ब्लॅक गियर शिफ्ट गार्निश, स्टीअरिंग इन्सर्ट्स आणि स्टील्थ डॅश कॅम यांसारख्या ॲक्सेसरीज देखील देण्यात आल्या आहेत.
Oben Rorr EZ Sigma बाईक लाँच, नवीन फीचर्ससह मिळणार १७५ किमी रेंज, काय आहे किंमत?
निसानचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांनी सांगितले की, “न्यू मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशन ही आमच्या ग्राहकांच्या मागणीनुसार खास तयार करण्यात आली आहे. तिचे डिझाइन, फीचर्स आणि संपूर्ण ब्लॅक थीम ग्राहकांना एक प्रीमियम अनुभव देतात.”
अलीकडेच मॅग्नाइटने ग्लोबल एनसीएपी कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील ही एक सुरक्षित SUV म्हणून ओळखली जाते. या गाडीमध्ये 6 एअरबॅग्ज, ABS+EBD, ESC, HSA, TCS, TPMS यांसारखी 40 हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये दिली आहेत.
मॅग्नाइट कुरो एडिशनसोबतच निसानने एक नवीन मेटॅलिक ग्रे रंग पर्यायही सादर केला आहे, जो टेक्ना, टेक्ना+ आणि एन कनेक्टा व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. सध्या न्यू निसान मॅग्नाइट 65 हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे आणि ती निसानच्या ‘एक कार, एक जग’ तत्त्वज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे.