फोटो सौजन्य: iStock
पूर्वी कार खरेदी करताना अनेक जण त्याचे मायलेज आणि किंमत पाहायचे. पण आज ही स्थिती बदलली आहे. याचे कारण म्हणजे आजचा ग्राहक हा कारच्या मायलेजसोबतच त्याच्या सेफ्टीकडे देखील लक्ष देतो. त्यामुळेच तर आता अनेक ऑटो कंपन्या आपल्या कोर्समध्ये अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स ऑफर करत आहे. आता मारुती सुझुकी देखील आपल्या कारमध्ये 6 एअरबॅग्सची सुविधा देणार आहे.
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे की लवकरच ते त्यांच्या संपूर्ण कार रेंजमध्ये स्टॅंडर्ड म्हणून 6 एअरबॅग्ज प्रदान केल्या जातील. याचा अर्थ असा की आता तुम्ही कोणतीही मारुती कार खरेदी करा, लहान असो वा मोठी, तुम्हाला त्यात उत्तम सेफ्टी पाहायला मिळणार.
मागील 12 महिन्यात ग्राहकांवर ‘या’ बाईकने केली जादू ! Activa, Shine आणि Pulsar ला टाकले मागे
सध्या, एस-प्रेसो, फ्रॉन्क्स, बलेनो आणि इग्निस सारख्या काही मारुती सुझुकीच्या कारमध्ये सर्व व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्ज स्टॅंडर्ड म्हणून नाहीत. यापैकी, फ्रॉन्क्स आणि बलेनोच्या टॉप व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्ज निश्चितपणे उपलब्ध आहेत, परंतु बेस मॉडेल्समध्ये नाहीत. आता कंपनीने निर्णय घेतला आहे की संपूर्ण लाइनअपमधील प्रत्येक मॉडेलमध्ये आणि प्रत्येक व्हेरियंट 6 एअरबॅग्ज उपलब्ध असतील.
मारुती सुझुकीचे 2025 च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस सर्व वाहनांमध्ये हा बदल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच, पुढील काही महिन्यांत, जेव्हाही तुम्ही नवीन मारुती कार खरेदी कराल तेव्हा तिला 6 एअरबॅग्ज मिळतील याची पूर्ण खात्री आहे.
मारुतीच्या कार्समधील सेफ्टी फीचर्समध्ये वाढ झाल्यामुळे, किमती देखील वाढणे जवळजवळ निश्चित आहे. एअरबॅग्ज हा एक महागडा सुरक्षा घटक आहे आणि जेव्हा तो बेस व्हेरिएंटमध्ये समाविष्ट केला जातो तेव्हा एक्स-शोरूम किंमत थोडी वाढू शकते.
मारुती सुझुकीने स्विफ्ट, वॅगन आर, अल्टो K10 आणि सेलेरियो सारख्या काही मॉडेल्समध्ये आधीच 6 एअरबॅग्ज स्टँडर्ड बनवल्या आहेत. याशिवाय, डिझायरला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग देखील मिळाले आहे, जे एक मोठे यश आहे. आता संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये 6 एअरबॅग्ज उपलब्ध असल्याने, मारुती कारची ताकद आणि सेफ्टी लेव्हल वाढणार आहे.
मारुती सुझुकी भारतात पेट्रोल आणि सीएनजी सेगमेंटमध्ये सर्वाधिक कार्सची विक्री करते. मारुतीकडे बजेट-फ्रेंडली कारची सर्वात मोठी रेंज आहे. अशा परिस्थितीत, प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी उचललेले हे पाऊल भारतीय ग्राहकांसाठी खूप महत्वाचे ठरू शकते.