फोटो सौैजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात विविध सेगमेंटमध्ये वाहनं ऑफर केली जातात. यात टू-व्हीलर सेगमेंटमधील बाईक्सना देखील चांगली मागणी मिळताना दिसत आहे. आज बजेट फ्रेंडली बाईक्सपासून ते स्पोर्ट बाईकपर्यंत अनेक उत्तम बाईक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यातही आजचे तरुण हाय परफॉर्मन्स आणि दमदार लूक असणाऱ्या बाईकला जास्त प्राधान्य देत असतात.
KTM ने देशात अनेक उत्तम बाईक ऑफर केल्या आहेत. तसेच तरुणांमध्ये देखील या बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. पण आताकेटीएम खडतर काळातून जात आहे. कंपनीला ऑस्ट्रियातील मॅटिघोफेन प्लांटमध्ये पुन्हा एकदा बाईकचे उत्पादन थांबवावे लागले आहे. यामागचे कारण म्हणजे आवश्यक कंपोनंट्सचा अभाव. चला हे उत्पादन थांबवण्याचे कारण सविस्तरपणे जाणून घेऊयात.
‘या’ कारच्या अक्षरशः मागे पडलेत ग्राहक ! ठरली सर्वात जास्त विक्री होणारी 7 सीटर कार
रिपोर्ट्सनुसार, कंपनी काही महत्त्वाच्या सप्लायर्सचे कर्ज भरू शकली नाही. यामुळे, आवश्यक पार्ट्सचा पुरवठा थांबला आहे आणि या पार्टसशिवाय बाईक बनवणे कंपनीला अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत KTM कडे उत्पादन थांबवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.
KTM चे म्हणणे आहे की जुलै 2025 पासून परिस्थिती नीट हाताळल्यानंतर उत्पादन पुन्हा सुरू करण्याचे प्लँनिंग आहे. कंपनी सध्या आर्थिक अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी केटीएमला मोठे नुकसान सहन करावे लागले होते आणि एक वेळ अशी होती जेव्हा कंपनी विकली जाण्याच्या किंवा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आली होती. पण आता केटीएम पुन्हा एकदा आपली ओळख मजबूत करण्यात व्यस्त आहे.
KTM ची ऑस्ट्रियामधील परिस्थिती वाईट असताना, कंपनी भारतात मात्र सुसाट निघाली आहे. अलीकडेच, कंपनीने भारतात नवीन KTM 390 Enduro लाँच केली आहे, जी ॲडव्हेंचर आणि ऑफ-रोडिंग राईड करणाऱ्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत चालली आहे.
6 लाखांच्या किमतीत येते Maruti Suzuki Wagon R आणि Tata Tiago, पण दोघांपैकी सुरक्षित कार कोणती?
जर तुम्ही केटीएम बाईक्सचे चाहते असाल, तर काळजी करण्यासारखे फारसे काही नाही. स्थानिक उत्पादन आणि स्टॉकमुळे भारतात कंपनीच्या बाईक्सची उपलब्धता कायम राहील.
आवश्यक पार्ट्सच्या कमतरतेमुळे केटीएमचा ऑस्ट्रियातील प्लांट ठप्प झाला आहे. परंतु, केटीएम भारतात पूर्ण वेगाने काम करत आहे. यामुळे बाईक प्रेमींना सध्या काळजी करण्याची गरज नाही. जुलै 2025 पर्यंत परिस्थिती सामान्य होण्याची अपेक्षा आहे.