फोटो सौजन्य: www.heromotocorp.com
भारतात नेहमीच मार्केटमध्ये टू व्हीलरचा बोलबाला राहिला आहे. आजही जेव्हा एखादी व्यक्ती आपले पहिले वाहन खरेदी करण्याचा प्लॅन करते, तेव्हा त्यांचे पहिले प्राधान्य हे बाईकलाच असते. त्यात आता अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या भारतात बेस्ट फीचर्स आणि मायलेज देणाऱ्या बाईक ऑफर करत आहे. यामुळे दिवसेंदिवस भारतात बाईक्सच्या विक्रीत झपाटयाने वाढ होताना दिसत आहे. आज आपण अशा एका बाईकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी ग्राहकांना भुरळ पाडली आहे.
जर आपण गेल्या FY 25 मध्ये या सेगमेंटच्या विक्रीबद्दल बोललो तर पुन्हा एकदा Hero Splendor ने हे स्थान मिळवले आहे. या काळात हिरो स्प्लेंडरने एकूण 34,98,449 बाईक्स विकल्या आहेत. या काळात हिरो स्प्लेंडरच्या विक्रीत वार्षिक आधारावर 6.23 टक्क्यांची वाढ झाली आहे. या विक्रीच्या आधारे हिरो स्प्लेंडरचा मार्केट शेअरही 26.05 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या काळात सर्वाधिक विक्री होणाऱ्या 10 दुचाकी वाहनांच्या विक्रीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
विक्री यादीत होंडा अॅक्टिव्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कालावधीत होंडा अॅक्टिव्हाने एकूण 25,20,520 स्कूटर विकल्या आहेत, ज्यात वार्षिक 11.80 टक्क्याने वाढ झाली. तर होंडा शाइन या विक्री यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली होती. या कालावधीत होंडा शाइनने एकूण 18,91,399 युनिट्स बाईक विकल्या आहेत, ज्यात वार्षिक 27.54 टक्के वाढ झाली. याशिवाय, बजाज पल्सर या विक्रीच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होती. बजाज पल्सरच्या एकूण 13,25,816 युनिट्स विकल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये वार्षिक 6.04 टक्के घट झाली.
दुसरीकडे, या विक्रीच्या यादीत टीव्हीएस ज्युपिटर पाचव्या क्रमांकावर होती. ज्युपिटरचे एकूण 11,07,285 स्कूटर विकल्या, वार्षिक 31.06 टक्के वाढ झाली. तर सहाव्या क्रमांकावर हिरो एचएफ डिलक्स होती. या बाईकच्या एकूण 9,72,119 बाईक विकल्या, वार्षिक आधारावर या बाइकच्या विक्रीत 6.10 टक्के घट झाली आहे. याशिवाय, सुझुकी अॅक्सेस या सातव्या क्रमांकावर होती. या कालावधीत सुझुकी अॅक्सेसने एकूण 7,27,458 स्कूटर विकल्या, ज्यात वार्षिक आधारावर 14.64 टक्के वाढ झाली आहे.
6 लाखांच्या किमतीत येते Maruti Suzuki Wagon R आणि Tata Tiago, पण दोघांपैकी सुरक्षित कार कोणती?
या विक्री यादीत टीव्हीएस एक्सएल आठव्या क्रमांकावर होती, तर नवव्या क्रमांकावर TVS Apache
होती. या कालावधीत या बाईकचे एकूण 4,46,218 बाईक विकल्या गेल्या आहेत, ज्यात वार्षिक आधारावर 18.08 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर बजाज प्लॅटिना विक्रीच्या या यादीत दहाव्या स्थानावर होती. या कालावधीत बजाज प्लॅटिनाच्या एकूण 4,38,740 युनिट्स विकल्या, ज्यामध्ये वार्षिक आधारावर 12.69 टक्क्यांची घट झाली.