फोटो सौजन्य: @FilterCoffeeHQ (X.com)
भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यातही इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरला चांगली मागणी मिळताना दिसत आहे. हीच मागणी पाहत भारतात अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या बेस्ट ई बाईक आणि स्कूटर ऑफर करत आहे.
खरंतर आजही इलेक्ट्रिक स्कूटर म्हंटलं तर अनेकांच्या नजरेसमोर OLA Electric कंपनी येते. 2024 मध्ये कंपनीने बाईक सेगमेंटमध्ये पाऊल ठेवत आपल्या पहिल्या वाहिल्या इलेक्ट्रिक बाईक लाँच केल्या होत्या. नुकतेच या बाईक्सची डिलिव्हरी सुरु झाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
ओला इलेक्ट्रिकने 23 मे 2025 पासून भारतीय बाजारात त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईक रोडस्टर एक्सची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती शेअर केली होती, त्यानंतर टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बाईकची डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे.
95 KM ची रेंज ! Suzuki च्या ‘या’ पहिल्या वाहिल्या Electric Scooter चे भारतात प्रोडक्शन सुरु
कंपनीने या एंट्री लेव्हल एक्स सिरीजमध्ये रोडस्टर एक्स आणि रोडस्टर एक्स प्लस हे दोन मॉडेल लाँच केले आहेत. मोठी गोष्ट म्हणजे ही बाईक एका चार्जवर 501 किलोमीटरची रेंज देईल. ओलाची ही बाईक Ola Gen 3 प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.
ओला रोडस्टर एक्स प्लस इलेक्ट्रिक बाईक 2 बॅटरी पॅकसह लाँच करण्यात आली आहे. यामध्ये 4.5 किलोवॅट प्रति तास आणि 9.1 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅकचा समावेश आहे. त्यात 11 किलोवॅटची पीक पॉवर असलेली मोटर आहे. ही बाईक 2.7 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठते.
कंपनीचा दावा आहे की मोठ्या बॅटरी पॅकसह,या इलेक्ट्रिक बाईकची IDC रेंज 501 किमी आहे. तीन रायडिंग मोडसह येणाऱ्या या बाईकच्या 4.5 किलोवॅट बॅटरी पॅकची किंमत 1 लाख 5 हजार रुपये आहे, तर 9.1 किलोवॅट बॅटरी पॅकची किंमत 1 लाख 55 हजार रुपये आहे.
रोडस्टर एक्स प्लस सोबत, ओलाने 3 बॅटरी पॅकसह रोडस्टर एक्स देखील लाँच केले आहे. यामध्ये 2.5 किलोवॅट, 3.5 किलोवॅट आणि 4.5 किलोवॅट बॅटरी पॅकचा समावेश आहे. यामध्ये 7 किलोवॅटची पीक पॉवर असलेली मोटर आहे. बाईकच्या टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक 118 किमी प्रति तास आहे आणि ती फक्त 3.1 सेकंदात 0 ते 40 किमी प्रति तासाचा वेग गाठते.
IPL 2025 मध्ये या क्रिकेटरला मिळू शकते Tata ची ‘ही’ अफलातून कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
ओला रोडस्टर एक्स बाईकबाबत, कंपनीचा दावा आहे की याची आयडीसी रेंज 252 किमी आहे. या बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, 2.5 किलोवॅट बॅटरी पॅकची किंमत 74 हजार 999 रुपये, 3.5 किलोवॅट बॅटरी पॅकची किंमत 84 हजार 999 रुपये आणि 4.5 किलोवॅट बॅटरी पॅकची किंमत 94 हजार 999 रुपये आहे.