फोटो सौजन्य: www.suzukimotorcycle.co.in
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चांगली डिमांड मिळताना दिसत आहे. हीच वाढती डिमांड लक्षात घेत आता अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रोडक्शनवर विशेष लक्ष देत आहेत. तसेच पूर्वी भारतीय रस्त्यांवर इंधनावर चालणारी वाहनं जास्त दिसायची. परंतु, आज रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. हेच चित्र EVs ची वाढती डिमांड दर्शवते.
भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे आणि हे लक्षात घेता, सुझुकीने त्यांच्या लोकप्रिय स्कूटर अॅक्सेसची इलेक्ट्रिक व्हर्जन – Suzuki e-Access लाँच करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे.
कंपनीने अलीकडेच माहिती दिली आहे की सुझुकी ई-अॅक्सेसचे प्रोडक्शन हरियाणातील गुडगाव येथील त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट प्रकल्पात सुरू झाले आहे. खरंतर, ही स्कूटर पहिल्यांदा इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. आता ती लवकरच भारतीय रस्त्यांवर दिसणार आहे.
IPL 2025 मध्ये या क्रिकेटरला मिळू शकते Tata ची ‘ही’ अफलातून कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
सुझुकी ई-अॅक्सेसमध्ये, कंपनीने 3.07kWh लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) बॅटरी वापरली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 95 किलोमीटरची रेंज देऊ शकते, जी दैनंदिन वापरासाठी खूप उपयुक्त ठरेल. परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर, या स्कूटरचा टॉप स्पीड 71 किलोमीटर प्रति तास आहे. ही स्कूटर 4.1 किलोवॅटची कमाल शक्ती आणि 15 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. या परफॉर्मन्सच्या आकडेवारीच्या आधारे, ही स्कूटर एक परवडणारी आणि शक्तिशाली ई-स्कूटर म्हणून उदयास येऊ शकते.
तीन रायडिंग मोड्स आणि स्मार्ट टेक्नॉलजीबद्दल बोलायचे झाले तर, सुझुकी ई-अॅक्सेस केवळ पॉवरफुल बॅटरीने सुसज्ज नाही तर त्यात अनेक आधुनिक टेक्नॉलजीचा वापर देखील करण्यात आला आहे. यात सुझुकी ड्राइव्ह मोड सिलेक्टर-ई नावाची सिस्टम आहे जी तीन वेगवेगळ्या रायडिंग मोड्सना सपोर्ट करते. पहिला इको मोड आहे आणि दुसरा राईड ए मोड आहे, जो सामान्य दैनंदिन वापराच्या रायडिंगसाठी डिझाइन केलेला आहे आणि तिसरा राईड बी मोड आहे, जो जास्त पॉवरची आवश्यकता असलेल्या परिस्थितीत चांगले कार्य करतो.
21 KM मायलेज, ADAS सेफ्टी, आणि पॅनोरॅमिक सनरूफ ! ‘या’ आहेत देशातील 5 सर्वात स्वस्त कार
याशिवाय, स्कूटरमध्ये आणखी काही स्मार्ट फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम आहे, जी ब्रेकिंग दरम्यान निर्माण होणारी एनर्जी बॅटरीमध्ये परत साठवण्यास मदत करते. तसेच, त्यात मेंटेनन्स फ्री बेल्ट ड्राइव्ह वापरण्यात आला आहे. याशिवाय, त्यात रिव्हर्स मोड देखील देण्यात आला आहे.
भारतीय मार्केटमध्ये ही स्कूटर लाँच झाल्यानंतर, सुझुकी ई-अॅक्सेस काही लोकप्रिय आणि आधीच स्थापित इलेक्ट्रिक स्कूटर्सशी थेट स्पर्धा करेल. हे एAther Rizta, Bajaj Chetak, TVS iQube आणि Ola S1 सारख्या स्कूटरशी स्पर्धा करेल. या ब्रँड्सनी इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये आधीच चांगली पकड मिळवली आहे, परंतु सुझुकी ई-अॅक्सेस देखील त्याच्या फीचर्स, परफॉर्मन्स आणि सुझुकीच्या विश्वासार्ह ब्रँड व्हॅल्यूमुळे एक मजबूत स्थान निर्माण करेल का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.