फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये अनेक कार्स उत्पादक कंपन्या आहेत, ज्या दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. यातीलच एक मोठे नाव म्हणजे Volkswagen. फोक्सवॅगनने देशात अनेक बेस्ट कार्स ऑफर केल्या आहेत. आता कंपनी प्रीमियम सेगमेंटमध्ये आपली नवीन कार लाँच करणार आहे.
जर्मन ऑटोमोबाईल उत्पादक फोक्सवॅगन भारतात विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर करते. आता कंपनी लवकरच प्रीमियम सेगमेंटमध्ये एक नवीन कार लाँच करण्याची तयारी करत आहे. ही कार भारतात कधी आणि कोणती असणार आहे. त्यात कोणत्या प्रकारचे फीचर्स आणि इंजिन दिले जाऊ शकते. याची किंमत किती आहे? त्याबद्दल आज जाणून घेणार आहोत.
फोक्सवॅगन लवकरच एक नवीन कार लाँच करणार आहे. कंपनी प्रीमियम सेगमेंटमध्ये Volkswagen Golf GTI औपचारिकपणे लाँच करण्याची तयारी करत आहे.
आपल्याच Wagon R आणि Baleno वर भारी पडली Maruti ची ‘ही’ कार, मार्केटमध्ये पाहायला मिळतेय वेगळीच क्रेझ
उद्यापासून म्हणजेच 5 मे 2025 पासून या वाहनाची प्री-बुकिंग सुरू होईल. यासाठी प्री-बुकिंग देशभरात ऑनलाइन आणि ऑफलाइन डीलरशिपद्वारे करता येणार आहे.
कंपनीकडून फोक्सवॅगन गोल्फ जीटीआयमध्ये दोन-लिटर टीएसआय इंजिन असेल. या इंजिनसह, कारला 0-100 किलोमीटरचा वेग गाठण्यासाठी फक्त 5.9 सेकंद लागतील. दोन लिटरचे इंजिन 265 हॉर्सपॉवर आणि 370 न्यूटन-मीटर टॉर्क निर्माण करेल. यासोबतच, त्यात 7 स्पीड डीएसजी ट्रान्समिशन दिले जाईल.
फोक्सवॅगन गोल्फ जीटीआयमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात येतील. यामध्ये 12.9 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सात स्पीकर्ससह ऑडिओ सिस्टम, वायरलेस चार्जर, अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, अँबियंट लाइट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, रियर एसी व्हेंट्स, की-लेस एंट्री, पुश बटण स्टार्ट, जीटीआय बॅजिंग, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, 18 इंचाचा अलॉय व्हील्स, 45 लिटर क्षमतेचा पेट्रोल टँक असेल.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी यामध्ये 7 एअरबॅग्ज, ABS, EBD, हिल होल्ड असिस्ट, ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक फ्रंट डिफरेंशियल लॉक, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन असिस्ट, फ्रंट असिस्ट, रियर व्ह्यू कॅमेरा यांसारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहे.
आपल्याच Wagon R आणि Baleno वर भारी पडली Maruti ची ‘ही’ कार, मार्केटमध्ये पाहायला मिळतेय वेगळीच क्रेझ
सध्या, या कारची प्री-बुकिंग 5 मे 2025 पासून सुरू होईल. या कारच्या लाँचिंगबाबत अद्याप कोणतीही माहिती कंपनीकडून आलेली नाही. परंतु मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला ही कार लाँच केली जाऊ शकते अशी अपेक्षा आहे.
या कारच्या नेमक्या किमतीची माहिती फक्त लाँचच्या वेळीच उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत, संभाव्य एक्स-शोरूम किंमत सुमारे 50 लाख रुपये असू शकते.