उद्या नवीन Hero Glamour 125 होणार लाँच
भारतात टू-व्हीलर सेगमेंटमध्ये बाईक्सची लोकप्रियता सातत्याने वाढताना दिसत आहे. रोजच्या प्रवासासाठी सोयीस्कर, इंधन बचत करणाऱ्या आणि किफायतशीर बाईकची मागणी ग्राहकांकडून सर्वाधिक होत आहे. बहुतांश लोक बजेट-फ्रेंडली बाईकला प्राधान्य देत असल्याने कंपन्या हेदेखील लक्षात ठेवून नवनवीन पर्याय बाजारात आणत आहेत.
स्वस्तात मस्त अशा बाईकद्वारे ग्राहकांना किफायतशीर दरात उत्तम फीचर्स, चांगली मायलेज आणि टिकाऊपणा दिला जातो. त्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत विश्वासार्ह बाईक मिळते. याच कारणामुळे भारतीय टू-व्हीलर मार्केटमध्ये लो-रेंज सेगमेंटच्या बाईक्सना नेहमीच प्रचंड मागणी असते. कंपन्या या मागणीला प्रतिसाद देत सतत नवी मॉडेल्स सादर करत आहेत.
नवीन Harley-Davidson Street Bob भारतात लाँच, नव्या इंजिनसह मिळणार दमदार फीचर्स
देशात अनेक बाईक लोकप्रिय आहेत. Hero Glamour 125 ही त्यातीलच बाईक जिला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता Hero MotoCorp याचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये लाँच करणार आहे. कंपनीने अपडेटेड ग्लॅमर 125 चा पहिला टीझर रिलीज केला आहे. नवीन ग्लॅमर 125 लाँच करून कंपनी आपला बाईक पोर्टफोलिओ पूर्वीपेक्षा चांगला बनवणार आहे. टीझरमध्ये, दिसणाऱ्या ग्लॅमरला भारतातील सर्वात फ्यूचरिस्टिक 125 सीसी बाईक बोलले जात आहे. ही नवीन ग्लॅमर येत्या 19 ऑगस्ट रोजी भारतात लाँच होणार आहे.
नवीन ग्लॅमरच्या टीझरमध्ये, Hero XMR 210 सारखे ग्राफिक्स दिसले आहेत. त्यात पूर्णपणे नवीन डिजिटल क्लस्टर दिसला आहे. याशिवाय, स्क्रीनवर ‘सेट स्पीड’ लिहिलेले आहे, जे सूचित करते की नवीन ग्लॅमर 125 मध्ये क्रूझ कंट्रोल फीचर्स मिळू शकतात. यासोबतच, ऑल-एलईडी लाईट सेटअप, यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी तसेच इतर अनेक उत्तम फीचर्स त्यात पाहता येतील.
Tata Nexon EV च्या बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?
नवीन ग्लॅमरमध्ये सध्याचे इंजिन पाहता येईल. पूर्वीप्रमाणेच, त्यात 124.7 सीसी सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन दिले जाऊ शकते, जे 10.39 एचपी पॉवर आणि 10.6 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
यामध्ये सध्याच्या मॉडेलसारखे स्पोर्टी डिझाइन असू शकते. यात स्लिम बॉडी, सिंगल-पीस सीट आणि नवीन ग्राफिक्ससह टँक श्रग्स असतील. यासोबतच, यात कम्युटर-स्टाईल फूट पेग्स, साडी गार्ड आणि फंक्शनल ग्रॅब रेल देखील दिली जाऊ शकते.