Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी हवेमुळे घसरते मायलेज, जास्त हवेमुळे सुटते ग्रिप; मग टायरसाठी ‘परफेक्ट’ हवा किती?

टायरमध्ये कमी हवा असल्यास घर्षण वाढून गाडीचे मायलेज घटते आणि टायर फुटण्याचा धोका निर्माण होतो; तर जास्त हवेमुळे रस्त्यावरील पकड सुटून अपघात होऊ शकतो. त्यामुळे गाडीचे मॅन्युअल तपासून नेहमी अचूक दाबाची हवा राखणे सुरक्षितता आणि इंधन बचतीसाठी अत्यंत गरजेचे आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 21, 2026 | 06:56 PM
कमी हवेमुळे घसरते मायलेज, जास्त हवेमुळे सुटते ग्रिप; मग टायरसाठी ‘परफेक्ट’ हवा किती?
Follow Us
Follow Us:

आपण गाडीच्या सर्व्हिसिंगवर हजारो रुपये खर्च करतो, चांगल्या ब्रँडचे पेट्रोल-डिझेल टाकतो, पण अनेकदा एका छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो—ती म्हणजे ‘टायरमधील हवेचा दाब’. टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा असणे हे केवळ गाडी स्मूथ चालण्यासाठी आवश्यक नाही, तर त्याचा थेट संबंध तुमच्या खिशाशी आणि तुमच्या जीवाशी असतो.

टायरमधील कमी किंवा जास्त हवेचा दाब गाडीवर कसा परिणाम करतो, हे सोप्या भाषेत समजून घेऊया,

१. कमी हवेचा दाब– खिशाला आणि टायरला फटका

अनेकदा आपण टायर पूर्णपणे पंक्चर होईपर्यंत त्यात हवा भरत नाही. पण हवेचा दाब ठरावीक मर्यादेपेक्षा कमी असल्यास खालील मोठे तोटे होतात,

  • मायलेज झपाट्याने घटते: जेव्हा टायरमध्ये हवा कमी असते, तेव्हा टायरचा रस्ताला टेकणारा भाग वाढतो. यामुळे घर्षण वाढते आणि इंजिनला गाडी ओढण्यासाठी जास्त ताकद लावावी लागते. परिणामी, गाडीचे मायलेज ५ ते ८ टक्क्यांनी कमी होते.
  • टायर फुटण्याचा धोका (Tyre Burst): कमी हवेमुळे टायरच्या बाजूच्या भिंती जास्त लवचिक होतात आणि ड्रायव्हिंग करताना त्या खूप गरम होतात. हायवेवर जास्त वेगात गाडी असताना अतिउष्णतेमुळे टायर अचानक फुटण्याचा मोठा धोका असतो.
  • टायर लवकर खराब होणे: कमी हवेमुळे टायर कडांनी  जास्त घासतात आणि त्यांचे आयुष्य ३0 ते ४0 टक्क्यांनी कमी होते.
टायरवरील आकड्यांचे रहस्य! सुरक्षेसाठी आणि चांगल्या मायलेजसाठी योग्य टायर कसा ओळखावा? जाणून घ्या योग्य टायर निवडण्याचे गणित

२. जास्त हवेचा दाब आणि अपघाताला आमंत्रण

काही जणांना वाटते की टायरमध्ये जास्त हवा भरली की मायलेज जास्त मिळेल, पण हा विचार अत्यंत धोकादायक ठरू शकतो:

  • रस्त्यावरील ग्रीप सुटते: जास्त हवेमुळे टायर मध्यभागी फुगतो आणि त्याचा रस्त्याशी असलेला संपर्क कमी होतो. यामुळे अचानक ब्रेक लावल्यास गाडी घसरण्याचा  मोठा धोका असतो.
  • खड्ड्यांचे जास्त धक्के: टायर कडक झाल्यामुळे गाडी सस्पेन्शन ऐवजी दगड किंवा विटेसारखी धावते. खड्ड्यांचे छोटे-छोटे धक्केही थेट गाडीत बसलेल्या प्रवाशांना जाणवतात.
  • मध्यभागाची झीज: यामुळे टायर फक्त मध्यभागातून खूप लवकर घासून खराब होतो.
इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरीचे आयुष्य संपल्यावर त्याचे काय होणार? पर्यावरणपूरक विल्हेवाट कशी लावली जाणार? जाणून घ्या

३. मग योग्य हवेचा दाब ठेवण्याचे फायदे काय?

कंपनीने शिफारस केलेला (उदा. 32 ते 35 PSI) अचूक दाब ठेवल्यास तुम्हाला ३ मोठे फायदे मिळतात,

१. उत्तम मायलेज: इंजिनवर ताण न पडल्यामुळे गाडी ठरवून दिलेले परफेक्ट मायलेज देते.

२. परफेक्ट ब्रेकिंग: ऐन वेळी ब्रेक लावल्यास गाडी न घसरता कमीत कमी अंतरावर सुरक्षितपणे थांबते.

३. टायरचे दीर्घायुष्य: टायर सर्व बाजूंनी समप्रमाणात घासल्यामुळे ते जास्त वर्षे टिकतात.

स्मार्ट ड्रायव्हिंग टीप: टायरमधील हवा नेहमी ‘कोल्ड कंडिशन’ मध्येच तपासावी. म्हणजेच गाडी सलग ३-४ किलोमीटर चालवण्यापूर्वी किंवा सकाळी प्रवासाला निघताना हवा चेक करावी. गाडी चालवून टायर गरम झाल्यावर हवा तपासल्यास नेहमी २-३ PSI दाब जास्त दाखवतो, जो चुकीचा असतो.

Web Title: Perfect tyre pressure for vehicles auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास
1

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास

₹1.50 लाखांच्या बजेटमध्ये 5 इलेक्ट्रिक बाइक्स! रेंजपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या
2

₹1.50 लाखांच्या बजेटमध्ये 5 इलेक्ट्रिक बाइक्स! रेंजपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच
3

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स
4

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.