Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच

पल्सर चाहत्यांसाठी मोठी बातमी! NS200, N250 आणि NS400Z या 3 बाइक्समध्ये 5-इंच TFT स्क्रीन येण्याची शक्यता आहे. पण NS200 मध्ये दिसलेले WP USD फोर्क्स या अपडेटला वेगळे महत्त्व देतात. बजाज या बाइक्समध्ये नेमके कोणते बदल करणार, याकडे आता लक्ष आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 24, 2026 | 05:39 PM
बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच
Follow Us
Follow Us:
  • Pulsar NS200, N250 आणि NS400Z मध्ये 5-इंच TFT डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.
  • NS200 टेस्ट मॉडेलमध्ये WP USD फोर्क्स आणि अॅडजस्टेबल लीव्हर्स दिसले आहेत.
  • NS400Z मध्ये नवीन TFT स्क्रीनसोबत किरकोळ कॉस्मेटिक बदल होण्याची शक्यता आहे.
बजाज ऑटोच्या पल्सर सीरिजमध्ये आणखी एक महत्त्वाचा अपडेट होण्याची शक्यता आहे. Pulsar NS200, N250 आणि NS400Z या 3 बाइक्स टेस्टिंगदरम्यान नव्या उपकरणांसह दिसल्या आहेत. तिन्ही मॉडेल्समध्ये 5-इंच TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळण्याची शक्यता असून, NS200 मध्ये सस्पेन्शनशी संबंधित जास्त मोठा बदल दिसत आहे.

तिन्ही बाइक्समध्ये 5-इंच TFT स्क्रीन

नवीन TFT स्क्रीन ही सध्या पल्सर रेंजमध्ये टप्प्याटप्प्याने आणली जात आहे. या कन्सोलमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, Google Maps मिररिंग, म्युझिक कंट्रोल्स, नोटिफिकेशन आणि डॉक्युमेंट स्टोरेजसारखी फीचर्स उपलब्ध होऊ शकतात. स्क्रीन नियंत्रित करण्यासाठी अपडेटेड स्विचगियर आणि 4-वे कंट्रोलरही मिळण्याची शक्यता आहे.

Triumph Bonneville 400 भारतात लवकरच होणार दाखल! क्लासिक 350 ला देणार टक्कर; पाहा हे स्पाय फोटोज

NS200 मध्ये सस्पेन्शनचा मोठा बदल

Pulsar NS200 च्या टेस्ट मॉडेलवर WP ब्रँडिंग असलेले USD फ्रंट फोर्क्स दिसले आहेत. याशिवाय अॅडजस्टेबल ब्रेक आणि क्लच लीव्हर्सही दिसतात. त्यामुळे NS200 मध्ये केवळ स्क्रीन अपडेट न राहता सस्पेन्शन आणि रायडिंग हार्डवेअरमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. मात्र इंजिनमध्ये मोठा बदल अपेक्षित नसल्याचे सध्याच्या रिपोर्ट्समधून समोर येते.

N250 आणि NS400Z मध्ये काय बदलणार?

Pulsar N250 देखील 5-इंच TFT स्क्रीनसह टेस्टिंगमध्ये दिसली आहे. या बाइकमध्ये आधीपासून 37 mm USD फ्रंट फोर्क, ट्रॅक्शन कंट्रोल आणि मल्टिपल ABS मोड्स आहेत. त्यामुळे नव्या अपडेटमध्ये प्रामुख्याने टेक्नॉलॉजी आणि स्विचगियरवर भर असण्याची शक्यता आहे.

Yamaha R2 डीलरशिपमध्ये दाखल; लवकरच सुरू होणार या नव्या स्पोर्ट्सबाइकची डिलिव्हरी

Pulsar NS400Z च्या अपडेटेड मॉडेलला डीलरशिपवर नव्या TFT स्क्रीनसह पाहण्यात आले आहे. या बाइकमध्ये 349.13 cc लिक्विड-कूल्ड इंजिन कायम राहण्याची शक्यता असून ते 40.6 PS पॉवर आणि 33.2 Nm टॉर्क देते. NS400Z मध्ये नव्या स्क्रीनसोबत किरकोळ कॉस्मेटिक बदल मिळू शकतात.

इंजिनमध्ये मोठा बदल अपेक्षित नाही

सध्याच्या माहितीनुसार NS200 मध्ये 199.5 cc इंजिन, N250 मध्ये 249.07 cc इंजिन आणि NS400Z मध्ये 349.13 cc इंजिन मिळते. या अपडेट्सचा मुख्य फोकस फीचर्स, कनेक्टिव्हिटी आणि हार्डवेअरवर असल्याचे दिसते. बजाज ऑटोने अद्याप अधिकृत लाँच तारीख किंवा अंतिम किंमत जाहीर केलेली नाही.

Web Title: Bajaj pulsar ns200 n250 ns400z new updates launch auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • automobile
  • Bajaj

संबंधित बातम्या

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स
1

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स

टीव्हीएसच्या स्कूटर्सची धूम! ज्युपिटरची विक्री 1.47 लाखांवर; आयक्यूबच्या विक्रीत 75.50% वाढ
2

टीव्हीएसच्या स्कूटर्सची धूम! ज्युपिटरची विक्री 1.47 लाखांवर; आयक्यूबच्या विक्रीत 75.50% वाढ

Triumph Bonneville 400 भारतात लवकरच होणार दाखल! क्लासिक 350 ला देणार टक्कर; पाहा हे स्पाय फोटोज
3

Triumph Bonneville 400 भारतात लवकरच होणार दाखल! क्लासिक 350 ला देणार टक्कर; पाहा हे स्पाय फोटोज

Yamaha R2 डीलरशिपमध्ये दाखल; लवकरच सुरू होणार या नव्या स्पोर्ट्सबाइकची डिलिव्हरी
4

Yamaha R2 डीलरशिपमध्ये दाखल; लवकरच सुरू होणार या नव्या स्पोर्ट्सबाइकची डिलिव्हरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.