Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात पेट्रोल कारची पकड कमी होतेय! CNG, हायब्रिड आणि EV कारची मागणी वाढली

भारतात पेट्रोल कारचा वाटा घसरतोय, तर इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार वेगाने लोकप्रिय होत आहेत! सप्टेंबर 2026 मधील आकडेवारीनुसार, EV कारचा वाटा 8.45% वर पोहोचला. सीएनजी आणि हायब्रिड कारची वाढही लक्षवेधी आहे. मग पेट्रोल कारच्या वर्चस्वाला खरोखरच आव्हान मिळत आहे का?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 12, 2026 | 05:23 PM
भारतात पेट्रोल कारची पकड कमी होतेय! CNG, हायब्रिड आणि EV कारची मागणी वाढली
Follow Us
Follow Us:
  • पेट्रोल कारचा नोंदणीतील वाटा सप्टेंबर 2026 मध्ये 41.27% झाला, जो मागच्या वर्षापेक्षा 5.91 टक्के पॉइंटने कमी आहे.
  • इलेक्ट्रिक कारचा वाटा 8.45% तर हायब्रिड कारचा वाटा 9.44% झाल्याने पर्यायी इंधनांची लोकप्रियता वाढत आहे.
  • मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई आणि महिंद्रा विविध पॉवरट्रेनच्या मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करत आहेत.

भारतातील कार मार्केटमध्ये फ्युलच्या निवडीबाबत मोठा बदल दिसू लागला आहे. पेट्रोल कारचा एकूण नोंदणीतील वाटा कमी होत असताना सीएनजी, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक कारचा वाटा वेगाने वाढत आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2026 मध्ये पेट्रोल कारचा वाटा 41.27% होता. मागच्या वर्षी याच महिन्यात तो 47.18% होता. म्हणजेच वर्षभरात पेट्रोलचा वाटा 5.91 टक्के पॉइंटने कमी झाला आहे.

इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कारची मोठी झेप

सप्टेंबर 2026 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा नोंदणीतील वाटा 8.45% झाला. सप्टेंबर 2025 मध्ये तो 5.74% होता. म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या वाट्यात 2.71 टक्के पॉइंटची वाढ झाली. हायब्रिड कारच्या वाट्यातही चांगली वाढ नोंदवण्यात आली. मागच्या वर्षी 7.30% असलेला हायब्रिड कारचा वाटा आता 9.44% वर पोहोचला आहे.

CNG आणि LPG वाहनांचाही वाटा वाढला आहे. सप्टेंबर 2025 मधील 22.02% वरून तो सप्टेंबर 2026 मध्ये 23.11% झाला. याउलट डिझेल वाहनांचा वाटा जवळपास स्टेबल राहिला. तो 17.76% वरून 17.74% झाला.

जुनी कार किंवा बाईक विकताय? RC ट्रान्सफर कसे कराल? कागदपत्रे, फी आणि डेडलाइन जाणून घ्या

ऑगस्टमध्ये पेट्रोलला पर्यायी इंधनांची आघाडी

ऑगस्ट 2026 मध्ये सीएनजी, एलपीजी, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांचा एकत्रित वाटा 41.95% होता. त्याच महिन्यात पेट्रोलचा वाटा 40.85% नोंदवण्यात आला. म्हणजे या पर्यायी इंधन प्रकारांनी एकत्रितपणे पेट्रोलला मागे टाकले. सप्टेंबरमध्ये दोन्ही गटांमधील अंतर कमी झाले; पर्यायी इंधनांचा एकत्रित वाटा 41% तर पेट्रोलचा 41.27% होता.

कार कंपन्यांच्या रणनीतीतही बदल

वाढती मागणी लक्षात घेऊन वाहन कंपन्या वेगवेगळ्या फ्युल प्रकारांतील मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करत आहेत. मारुती सुझुकीकडे सीएनजी कार आणि स्ट्रॉंग हायब्रिड मॉडेल्स आहेत. टाटा मोटर्स पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा विविध पर्यायांवर काम करत आहे. ह्युंदाई, किया आणि महिंद्रा यांच्याही पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळ्या पॉवरट्रेनचे मॉडेल्स आहेत.

व्हॉल्व्हो EX90 भारतात लाँच! 1.26 कोटी किंमत; मिळणार 625 किमी रेंज आणि जबरदस्त लक्झरी फीचर्स

या आकडेवारीवरून ग्राहकांची पसंती बदलत असल्याचे दिसते. पण पेट्रोल कारची नोंदणी कमी झाली म्हणजे तिची विक्री प्रत्येक महिन्यात घटलीच असे नाही. नोंदणीतील वाटा हा एकूण वाहन नोंदणीच्या तुलनेत मोजला जातो. त्यामुळे पुढील काळात फ्य्लचा खर्च, वाहनांची किंमत, चार्जिंग सुविधा आणि सरकारी धोरणे यांचा कार मार्केटवर मोठा प्रभाव राहू शकतो.

Web Title: Petrol car share declines india cng hybrid ev growth auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • automobile
  • Petrol Cars

संबंधित बातम्या

जुनी कार किंवा बाईक विकताय? RC ट्रान्सफर कसे कराल? कागदपत्रे, फी आणि डेडलाइन जाणून घ्या
1

जुनी कार किंवा बाईक विकताय? RC ट्रान्सफर कसे कराल? कागदपत्रे, फी आणि डेडलाइन जाणून घ्या

व्हिएतनामला फिरायला जाताय? 10 दिवस बाईक चालवण्यासाठी पेट्रोलच्या खर्चाचा हिशोब जाणून घ्या?
2

व्हिएतनामला फिरायला जाताय? 10 दिवस बाईक चालवण्यासाठी पेट्रोलच्या खर्चाचा हिशोब जाणून घ्या?

भारतात जपानी इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री 10,000 पार! होंडा आघाडीवर, सुझुकी-यामाहाचीही जोरदार कामगिरी
3

भारतात जपानी इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री 10,000 पार! होंडा आघाडीवर, सुझुकी-यामाहाचीही जोरदार कामगिरी

व्हॉल्व्हो EX90 भारतात लाँच! 1.26 कोटी किंमत; मिळणार 625 किमी रेंज आणि जबरदस्त लक्झरी फीचर्स
4

व्हॉल्व्हो EX90 भारतात लाँच! 1.26 कोटी किंमत; मिळणार 625 किमी रेंज आणि जबरदस्त लक्झरी फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.