
ऑटोमॅटिक कार खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा या महत्वपूर्ण गोष्टी! अन्यथा नंतर होईल पश्चाताप, जाणून घ्या फायदे आणि तोटे
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये कार, बाईक आणि इतर विविध वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. हल्ली प्रत्येक घरात एक किंवा दोन गाड्या असतात. घरात गाडी असेल तर कुठेही सहज बाहेर जाता येते. पण मागील काही वर्षांमध्ये भारतात ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेल्या कारची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. या गाडीचे मायलेज मॅन्युअल गिअरबॉक्सपेक्षा जास्त असून किंमत खूप जास्त आहे. लोक मॅन्युअल कारपेक्षा ऑटोमॅटिक कारला जास्त प्राधान्य देऊ लागल्यामुळे गाडीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. गिअरबॉक्सवर चालणाऱ्या गाड्यांपेक्षा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेल्या कार खूप जास्त सोईस्कर आहेत. गाडी खरेदी करायला गेल्यानंतर बऱ्याचदा मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. गिअरबॉक्स असलेली कार खरेदी करावी किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेल्या कारची खरेदी करावी? असे अनेक प्रश्न कायमच सगळ्यांना पडतात.(फोटो सौजन्य – istock)
Nissan Tekton की Kia Seltos? कोणती गाडी खरेदी करणं ठरेल फायद्याचा व्यवहार? जाणून घ्या दोन्हीमधील फरक
गाडीची खरेदी केवळ तिची किमतींपासून नाहीतर गाडीची वैशिष्ट्य आणि गाडीची कितपत फायदा होऊ शकतो इत्यादी गोष्टी पाहूनच गाडी खरेदी करावी. त्यामुळे तुम्ही सुद्धा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेली गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फायदे आणि तोटे नक्कीच पहा. अन्यथा गाडी खरेदी केल्यानंतर तुम्हाला पश्चताप होणार नाही. आज आम्ही तुम्हाला ऑटोमॅटिक कार खरेदी करताना कोणत्या गोष्टी पाहाव्यात, याचे फायदे आणि तोटे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
ऑटोमॅटिक कारमध्ये गीअर्स वारंवार बदलण्याची आवश्यकता भासत नाही. याशिवाय गाडी हायवेवर गेल्यानंतर चालवण्याचा अजिबात कंटाळा येत नाही. तर गिअरबॉक्स असलेली गाडी हायवेवर चालवायला खूप जास्त कंटाळा येतो. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये, गीअर्स स्पीडनुसार बदल होत असतात. ज्यामुळे ड्रायव्हरला कोणतीही काळजी न करता गीअर्स सहज बदलता येतात. खराब रोडवर रोजच्या गाड्यांपेक्षा ऑटोमॅटिक गाड्या चालवणे अधिक सोपे आहे. कारण खड्यात गाडी गेल्यानंतर जास्त धक्के लागत नाही.
मॅन्युअल कारपेक्षाऑटोमॅटिक वाहने चालवणे कायमच सुरक्षित मानले जाते. मॅन्युअल ट्रान्समिशन असलेले वाहनचालवताना, चालकानेगीअर्स बदलण्यासाठी उजवा हात आणि डावा पाय जास्त प्रमाणात वापरला जातो. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे सेफ आणि चांगली ड्रायव्हिंग करता येते. जर तुम्ही पहिल्यांदाच मॅन्युअल कारपेक्षा ऑटोमॅटिक कार चालवणे खूप जास्त सोपे वाटेल. क्लच आणि गिअर आपोआर चेंज होतात, ज्यामुळे गाडी चालवणे सोपे होते.
भारतात लवकरच लाँच होणार ३ नवीन ‘प्लग्ड-इन हायब्रिड’ SUV कार! जाणून घ्या
मॅन्युअल आणि एएमटीच्या तुलनेत ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये गियर बदलण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. जेव्हा गीअर्स बदलतात तेव्हा त्यांचे शिफ्टिंग सहज दिसून येते. मॅन्युअल ट्रान्समिशनपेक्षा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा Maintance खूप जास्त असतो. सर्व्हिस कॉस्ट जास्त असल्यामुळे अनेक लोक ऑटोमॅटिक कार खरेदी करणे टाळतात. मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या कारपेक्षा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली गाडी जास्त इंधन खाते. सिस्टीममध्ये इंजिनच्या स्पीडनुसार गीअर बदललेले जातात.