फोटो सौजन्य: @MKBHD (X.com)
भारतात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हीच मागणी अनेक विदेशी ऑटो कंपन्यांना सुद्धा भारतात आपल्या कार्स लाँच करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. नुकतेच लोकप्रिय टेस्ला कार भारतात लाँच झाली आहे.
Elon Musk यांची टेस्ला मॉडेल वाय भारतात 15 जुलै 2025 रोजी लाँच झाली. तसेच कंपनीने मुंबईतील BKC येथे स्थित शोरूमचे देखील उद्घाटन केले आहे. ही कार देशातील ठराविक शहरांमध्येच खरेदी करता येणार आहे.
टेस्ला मॉडेल Y RWD ची ऑन-रोड सुरुवातीची किंमत 61.07 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, तर तिच्या लांब पल्ल्याच्या RWD व्हेरिएंटची किंमत 69.15 लाख रुपये आहे.
पेट्रोल-डिझेलला म्हणा राम राम ! ‘या’ 5 Electric Scooters ची किंमत 1 लाखापेक्षा कमी
आता तुम्ही ही टेस्ला कार भारतात कुठेही बुक करू शकता, टेस्लाने स्वतः यासंदर्भातील वेबसाइट लिंक शेअर केली आहे. ही कार 6 रंगांमध्ये आणण्यात आली आहे. यामध्ये स्टील्थ ग्रे, पर्ल व्हाइट मल्टी कोट, डायमंड ब्लॅक, ग्लेशियर ब्लू, क्विक सिल्व्हर आणि अल्ट्रा रेड कलर यांचा समावेश आहे.
दिल्लीमध्ये टेस्ला मॉडेल वायच्या स्टील्थ ग्रे मॉडेलची ऑन-रोड किंमत 61,06,690 रुपये आहे. जर ही कार मुंबईत खरेदी केली तर तिला ऑन-रोड 61.07,190 रुपये द्यावे लागतील. याशिवाय, गुरुग्रामसाठी ऑन-रोड किंमत 66 लाख 76 हजार 831 रुपये असेल.
वरील माहितीवरून समजते की दिल्लीमध्ये टेस्ला मॉडेल वाय सर्वात स्वस्त आहे. खरंतर, दिल्ली आणि मुंबईच्या किमतींमध्ये फक्त एक हजार रुपयांचा फरक आहे. गुरुग्रामसाठी त्याची नोंदणी सर्वात महाग आहे. त्याचा स्टील्थ ग्रे रंगाचा व्हेरिएंट सर्वात स्वस्त आहे. उर्वरित व्हेरिएंटसाठी जास्त पैसे द्यावे लागतील.
टेक्नॉलॉजीच्या बाबतीत सर्व टेस्ला कार नेहमीच पुढे राहिल्या आहेत आणि मॉडेल वाय देखील यावर आधारित आहे. यात 15 इंचाचा मोठा टचस्क्रीन डिस्प्ले आहे, जो टेस्लाच्या स्वतःच्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
या कारमध्ये ओव्हर-द-एअर सॉफ्टवेअर अपडेट्स, प्रीमियम साउंड सिस्टम, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल आणि टेस्ला मोबाईल ॲपवरून रिअल-टाइम कंट्रोल सारखी आधुनिक फीचर्स देखील आहेत. टेस्ला कारच्या लाँग रेंज RWD व्हेरिएंटमध्ये 81 kWh LFP बॅटरी पॅक आहे, जो एका चार्जवर 600 किमी पेक्षा जास्त रेंज देतो.