फोटो सौजन्य: iStock
भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे ग्राहकांची वाढती मागणी. भारतीय रस्त्यांवर सुद्धा इलेक्ट्रिक बाईक, कार आणि स्कूटरचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी देत आहेत. मात्र, मार्केटमध्ये काही अशा देखील इलेक्ट्रिक स्कूटर आहेत, ज्यांच्या किंमती सर्वसामान्यांच्या बजेटबाहेर जातात.
भारतात काही अशा कंपन्या देखील आहेत, ज्या उत्तम स्टाइलसह कमी बजेटच्या स्कूटर देखील ऑफर करतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अलीकडेच हिरो मोटोकॉर्पने भारतीय मार्केटमध्ये Hero Vida VX2 Go इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर 2.2 किलोवॅट ते 3.4 किलोवॅट प्रति तास बॅटरीसह उपलब्ध आहे. यामुळे ही 92 ते 142 किमीची रेंज देते. कंपनीकडून ही स्कूटर 99490 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.
बजाज इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये चेतक 3001 ऑफर करते, ज्यामध्ये उत्तम स्टाइल आणि मेटल बॉडी आहे. या स्कूटरला 3 किलोवॅट प्रति तास बॅटरी दिली जात आहे. त्यानंतर एकदा चार्ज केल्यानंतर 127 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते. त्याची एक्स-शोरूम किंमत 99990 रुपये आहे.
टीव्हीएस मोटर इंडियाने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर केली आहे. कंपनीने ऑफर केलेल्या या स्कूटरचा बेस व्हेरिएंट, 2.2 किलोवॅट प्रति तास, एका चार्जवर 94 किलोमीटरपर्यंत चालवता येतो. त्याची एक्स-शोरूम किंमत 91655 रुपये आहे.
इलेक्ट्रिक टू- व्हीलर सेगमेंटमध्ये ओला इलेक्ट्रिकने आपले वर्चस्व निर्माण केले आहेत. कंपनीची एस1झेड स्कूटर लोकप्रिय स्कूटर ठरली आहे. यात 3 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह सादर केली आहे. ही स्कूटर एका चार्जवर 146 किमी पर्यंतच्या रेंजसह उपलब्ध आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 64999 रुपये आहे.
वाहतूक पोलिसांना Saiyaara ची भुरळ! खास चेतावणी देत म्हटलं, “अन्यथा तुमचं प्रेम ही अर्धवट राहील…”
भारतीय मार्केटमध्ये अथर रिझ्टा एस देते. या स्कूटरला एका चार्जनंतर 123 किमीची रेंज मिळते. ही स्कूटर 99999 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. ही किंमत जवळच्या शोरूमनुसार बदलू देखील शकते.