फोटो सौजन्य: YouTube
महिंद्रा कंपनीच्या कार्स या नेहमीच ग्राहकांच्या अपेक्षांवर खऱ्या उतरल्या आहेत. त्यामुळेच कंपनी सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी आकर्षित एसयूव्ही मार्केटमध्ये लाँच करत असते. नुकतेच स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवसा आधी म्हणजेच १४ ऑगस्टला महिंद्रा थार रॉक्स लाँच करण्यात आली. त्यामुळे नक्कीच अनेकांची नजर या कारवर रोखली गेली आहे. पण महिंद्रा कंपनी आपल्या XUV 700 मोठे डिस्काउंट देत आहे. चला जाणून घेऊया या ऑफरबद्दल.
Mahindra XUV 700 भारतीय बाजारपेठेत जोरदार चर्चा आहे. गेल्या महिन्यात या SUV ला 7 हजार 769 ग्राहक मिळाले आणि Scorpio आणि XUV 3X0 नंतर या एसयूव्हीची विक्री तिसऱ्या क्रमांकावर आहे. तुम्ही देखील Mahindra XUV 700 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एक आनंदाची बातमी आहे. या कारची विक्री वाढवण्यासाठी, कंपनी ऑगस्ट महिन्यात XUV 700 च्या AX5 आणि AX3 व्हेरियंटवर मोठी सूट देत आहे.
तुम्ही हे दोन्ही व्हेरियंट विकत घेतल्यास तुमची 70 हजार रुपयांपर्यंत बचत होणार आहे. महिंद्रा XUV 700 वर चालू असलेल्या डिस्काउंटबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशीपशी संपर्क साधू शकता.
हे देखील वाचा: Mahindra Thar ROXX लाँच तर झाली पण बुकिंगच काय? जाणून घ्या बुकिंग डेट
या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 0.25-इंच स्क्रीन (एक इंफोटेनमेंट के लिए और एक इंस्ट्रूमेंट फंक्शन के लिए), वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, एड्रेनोएक्स कनेक्ट,अॅमेझॉन एलेक्सा, स्काईरूफ, क्रूज कंट्रोल, ड्राइव मोड, इंजन स्टार्ट आणि स्टॉप बटण, एलईडी डीआरएलसह फॉलो-मी-होम हेडलॅम्प, कॉर्नरिंग लॅम्प्स, फुल-साईज व्हील कव्हर्स आणि एलईडी टेललाइट्स देण्यात आले आहेत.
ही कार 5 आणि 7-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये आणि 2-लिटर टर्बोचार्ज्ड mStallion पेट्रोल इंजिनसह 200hp पॉवर आणि 380Nm टॉर्क निर्माण करून अनेक पॉवरट्रेन पर्यायांमध्ये ऑफर केली जाते.
डिझेल व्हर्जनमध्ये 2.2-लिटर mHawk डिझेल इंजिन वापरते, जे दोन वेगवेगळ्या ट्यूनसह उपलब्ध आहे. ज्यामध्ये 360Nm टॉर्कसह 155hp पॉवर आणि 420Nm टॉर्कसह 180hp पॉवर आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये 450Nm टॉर्क आहे.