फोटो सौजन्य: ub1ub2 (Instagram)
भारतीय मार्केटमध्ये दमदार आणि हाय परफॉर्मन्स बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. ग्राहकांमध्ये असणारी हीच क्रेझ पाहता अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या बेस्ट बाईक्स लाँच करत असतात. यातीलच एक आघाडीची कंपनी म्हणजे रॉयल एन्फिल्ड.
भारतात अनेक असे जण आहेत, ज्यांच्यासाठी बाईक हे फक्त एक दुचाकी नसून त्याही पेक्षा खूप काही आहे. हीच बाब आता समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की एका पंजाबी कुटुंबाने त्यांचा शौक पूर्ण करण्यासाठी रॉयल एनफील्डची बुलेट थेट पंजाबहून ब्रिटनला नेली आहे. हा ट्रान्सपोर्ट खर्च इतका जास्त होता की या रक्कमेत नवीन बुलेट खरेदी केली जाऊ शकली असती. हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Mercedes कडून भन्नाट कार लाँच, फक्त 30 ग्राहकच बानू शकतील याचे मालक
एका पंजाबी कुटुंबाने त्यांची रॉयल एनफील्ड बुलेट बाईक आणि घरगुती फर्निचर भारतातून इंग्लंडमधील त्यांच्या नवीन घरी पाठवण्यासाठी 4.5 लाख रुपयांहून अधिक खर्च केला. या व्हायरल व्हिडिओमध्ये युनायटेड किंग्डममधील Wolverhampton मध्ये एक कंटेनर ट्रक सामान उतरवत असल्याचे दाखवले आहे.
व्हिडिओमध्ये पंजाब नंबर प्लेट असलेली काळी रॉयल एनफील्ड बुलेट कंटेनरमधून बाहेर काढताना दाखवण्यात आली आहे. त्यानंतर पगडी घातलेला एक शीख माणूस बाईकवर बसलेला दिसत आहे. बाईकसोबत, कंटेनरमध्ये सोफा सेट, डायनिंग टेबल, विंग खुर्च्या आणि बेडसारखे फर्निचर देखील आहे, जे बाईकसोबत भारतातून पाठवण्यात आले आहेत.
या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील काही निवडक आणि मजेदार कमेंट्सबद्दल आपण जाणून घेऊयात. या व्हिडिओवर एका युजरने लिहिले की हे पूर्णपणे बॉसचे वर्तन आहे, भाऊ त्याच्या नवीन घरात त्याचे घर घेऊन आला.
एका युझरने लिहिले की हे तिसऱ्या जगातील वर्तन आहे, हे युके आहे, पंजाब नाही. यासोबतच एका युझरने लिहिले की जर शिपिंग स्वस्त असते तर त्यांनी त्यांचे ट्रॅक्टर देखील आणले असते.