Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : पाण्यासाठी वणवण ; पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा… प्रशासनाविरोधात गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

कोल्हापूर जिल्ह्यातील मानेवाडी गावात गेले कित्येक दिवस गावकरी पाण्यासाठी वणवण भटकत आहे. रोजच्या पिण्यासाठी पाणीपुरवठा होत नसल्याने गावकी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 20, 2026 | 12:59 PM
Kolhapur News : पाण्यासाठी वणवण ; पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा… प्रशासनाविरोधात गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
Follow Us
Close
Follow Us:

 

  • पाण्यासाठी वणवण ; पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा…
  • प्रशासनाविरोधात गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
कोल्हापूर :   कोते (ता. राधानगरी) मधील मौजे मानेवाडी येथे मागील दोन ते अडीच महिन्यांपासून तीव पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गावात उपलब्ध होणारे पाणी अपुरे व दूषित असल्याने साथीचे रोग पसरण्याचा धोका वाढला आहे. वारंवार सरपंच व ग्रामसेवक यांना सूचना देऊनही ग्राम प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.गावासाठी अंदाजे ९५ लाख रुपयांची पेयजल योजना तसेच सुमारे १६ लाख रुपयांची ग्रॅव्हिटी पाणी योजना मंजूर असूनही प्रत्यक्षात गावाला पुरेसे व स्वच्छ पाणी मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावात दोन विहिरी असतानाही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. काही ठिकाणी पाणी तपासणी न करता थेट विहिरीत सोडण्यात आल्याचा आरोप असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील महिला पाण्यासाठी व्याकुळ असून लवकरच ‘घागर मोर्चा’ काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.

पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्रामस्थांची मागणी
काही महाभाग मंडळींनी तर पाणी योजनेच्या पाईपला चार ठिकाणी शेतीत पाणी सोडण्याचा प्रयत्न केला आहे. राधानगरी तालुका हा तलावांचा तालुका म्हणून ओळखला जातो, पण या तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कोते पैकी माणेवाडी गावच्या ग्राम प्रशासनाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कडक शब्दात ताकीद द्यावी व गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

ओढ्याचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक
कोते गावाला तुळशी नदीतून पाणी येते, तेथून माणेवाडी गावाला पाणी आणले जाते, तर नैसर्गिक मिळणारे झऱ्याचे पाणी आटल्याने त्या ठिकाणी ओढ्याचे पाणी आणून पिण्याच्या पाण्यात सोडले आहे हा प्रकार आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे बोलले जात आहे. माणेवाडी गावच्या दोन्ही पाणीपुरवठा योजना कमकुवत झाल्या आहेत. या पाणीटंचाईवर कहर म्हणून ग्राम प्रशासनाने पेयजल योजनेवर ७ लाख रुपये नुकतेच खर्च केले आहे. तरीसुद्धा अपुरा व दूषित पाणीपुरवठा माणेवाडी गावाला मिळत असल्याने नेमके ७ लाख रुपये गेले कोठे, याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

८८ उन्हाळ्याचा पूर्वसंध्येलाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवू लागली आहे, तर ऐन उन्हाळ्यात गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल, असे दिसते. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करुन गावाला स्वच्छ व पुरेसे पाणी मिळावे यासाठी सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अन्यथा तीव्र आंदोलन
– प्रकाश केरबा माने, ग्रामस्थ, माणेवाडी

Kolhapur News : शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल

 

Web Title: Kolhapur news villagers are facing severe water shortage in malewadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती
1

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश
2

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर
3

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Karjat News : कर्जत चौक राज्यमार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा; वाढत्या अपघातांना जबाबदार कोण ?
4

Karjat News : कर्जत चौक राज्यमार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा; वाढत्या अपघातांना जबाबदार कोण ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.