Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिनेमागृहात धमाका केल्यानंतर आता “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम” OTT साठी सज्ज; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

"क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम" हा चित्रपट आता लवकरच ओटीटीवर कब्जा करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आता घर बसल्या पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 20, 2026 | 12:44 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम” OTT साठी सज्ज
  • जाणून घ्या चित्रपात कधी होणार प्रदर्शित?
  • कलाकारांनी व्यक्त केल्या भावना
 

या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा आशयघन मराठी चित्रपट आता जागतिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 27 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ZEE5 वर होणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि क्षिती जोग यांच्यासह विराज गवस, उर्फी काझमी आणि अजिंक्य धमाल निर्मित या चित्रपटातून मराठी माध्यमातील शिक्षणाचा अभिमान, जिद्द, सांस्कृतिक ओळख आणि बदलत्या काळातील आव्हानांचा भावनिक वेध घेतला आहे.

एका मराठी शाळेचा आणि तिच्याशी जोडलेल्या माणसांचा हृदयस्पर्शी प्रवास प्रभावीपणे मांडणारा हा चित्रपट आता डिजिटल माध्यमातून अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. मराठी भाषा गौरव दिनी या चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर होणार असल्यामुळे या प्रसंगाला अधिक अर्थ प्राप्त झाला आहे. मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व आजही तितकेच कायम असल्याचा संदेश या निमित्ताने अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यात आला आहे.

TOXIC Teaser Out: यशचा खतरनाक अवतार; ‘राया’च्या दमदार अ‍ॅक्शनसमोर KGF ही मागे, टीझरने वेधले लक्ष

क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचे भरभरून प्रेम जिंकले असून आता तो डिजिटल प्रीमियरसाठी सज्ज झाला आहे. सचिन खेडेकर, अमेय वाघ, प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि कादंबरी कदम यांच्या प्रभावी अभिनयामुळे चित्रपट अधिक समृद्ध झाला आहे. सशक्त कथानक, भावनिक आशय आणि मराठी माध्यम शिक्षणसंस्थांना दिलेली मानवंदना यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास तयार आहे. 27 फेब्रुवारी 2026 पासून हा चित्रपट केवळ ZEE5 वर पाहता येणार आहे.

ZEE5 वर ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ प्रदर्शित करताना झी मराठीच्या मुख्य चॅनल अधिकारी आणि मराठी ZEE5च्या बिझनेस हेड हेमा व्ही. आर. यांनी मराठी भाषा दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी भाषेची परंपरा, सांस्कृतिक जडणघडण आणि मराठी शाळांचे योगदान प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लँग्वेज पॅक’ उपक्रमाद्वारे मराठी प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत दर्जेदार कंटेंट सहज उपलब्ध करून देण्याची बांधिलकीही त्यांनी व्यक्त केली.

दिग्दर्शक हेमंत ढोमे हे पुढे म्हणाले, “हा चित्रपट मराठी माध्यम शाळांचा आणि त्यांच्याशी जोडलेल्या भावनिक विश्वाचा उत्सव आहे. अभिमान, आपलेपणा आणि आपला भाषिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्व या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. चित्रपटगृहांत प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम भारावून टाकणारे होते. आता मराठी ZEE5 च्या माध्यमातून असंख्य घरांपर्यंत आणि मनांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे.”

कृतिका कामरा आणि गौरवची अखेर ठरली लग्नाची तारीख; ‘या’ ठिकाणी रंगणार भव्य Wedding सेलिब्रेशन!

मुख्य अभिनेता सचिन खेडेकर म्हणाले, “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो आपल्या सामूहिक स्मृतींचे प्रतिबिंब आहे. आपल्यापैकी अनेकांनी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेतले असून, त्या शाळांनी आपली मूल्ये आणि व्यक्तिमत्त्व घडवले आहे. त्या परंपरेचा सन्मान करणाऱ्या या कथेत सहभागी होता आले, याचा मला मनापासून आनंद आहे. आता जगभरातील प्रेक्षकांना हा प्रवास मराठी ZEE5वर अनुभवता येणार आहे, याबद्दल मी विशेष उत्साहात आहे.”

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना प्राजक्ता कोळी हिने हा अनुभव अत्यंत भावनिक आणि समाधान देणारा असल्याचे सांगितले. मराठी भाषा आपल्या बालपणाशी आणि आठवणींशी घट्ट जोडलेली असल्याचे नमूद करत, या समकालीन आणि अर्थपूर्ण कथेतून पहिले पाऊल टाकण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली. OTT प्रीमियरमुळे चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असल्याचा आनंदही तिने व्यक्त केला.

 

Web Title: Hemant dhome marathi movie krantijyoti vidyalay marathi madhyam zee5 digital premiere

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

ZEE5 वर ‘बंदर’ची एंट्री! २८ ऑगस्टला पाहता येणार समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट
1

ZEE5 वर ‘बंदर’ची एंट्री! २८ ऑगस्टला पाहता येणार समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट

Tujhya Aayla Movie: ‘तुझ्या आयला’चं मोशन पोस्टर प्रदर्शित; टॅगलाइनने वेधलं लक्ष, सुजय डहाकेच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता वाढली
2

Tujhya Aayla Movie: ‘तुझ्या आयला’चं मोशन पोस्टर प्रदर्शित; टॅगलाइनने वेधलं लक्ष, सुजय डहाकेच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता वाढली

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज
3

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज

Amaravati News: अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची चाहूल; दिग्गजांच्या वारसदारांची होणार एंट्री?
4

Amaravati News: अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची चाहूल; दिग्गजांच्या वारसदारांची होणार एंट्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.