फोटो सौजन्य: @porquettfin (X.com)
“आपली स्वतःची कार” हे वाक्यच किती सुखावह आहे ना! अनेक जण हे स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र मेहनत करत असतात. मात्र, कमी पगार किंवा आर्थिक अडचणीमुळे हे स्वप्न लांबच राहतं. अशावेळी कार लोन हा उत्तम पर्याय ठरतो. कार लोनच्या सहाय्याने आपण सहज कार खरेदी करू शकतो आणि नंतर ठराविक कालावधीसाठी EMI भरत जातो. यामुळे एकाच वेळी मोठी रक्कम खर्च न करता आपल्या बजेटमध्ये राहून कार घेता येते. अनेक बँका आणि फायनान्स कंपन्या कमी व्याजदरात लोन देतात. त्यामुळे कार खरेदी करणं आज सहज शक्य झालं आहे. लोनमुळे अनेकांचे फॉर व्हीलरचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागले आहे.
जर तुमचाही पगार 30 हजारांपर्यंत असेल आणि याच पगारात तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या बजेटमध्ये Renault Kwid ही तुमच्यासाठी परफेक्ट कार ठरू शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही 1 लाखांचे डाउन पेमेंट करून ही कार घरी आणू शकता.
फेब्रुवारी 2025 मध्ये मिळाला फक्त 1 ग्राहक, अखेर Honda ला 11 वर्षांनंतर बंद केली ‘ही’ बाईक
रेनॉल्ट क्विड ही कार तुमच्या कुटुंबासाठी परफेक्ट चॉईस ठरू शकते. ज्याच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख रुपये आहे. त्याच वेळी, राजधानी दिल्लीमध्ये त्याची ऑन-रोड किंमत सुमारे 5.24 लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत, आता जर तुम्ही 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट देऊन ही कार खरेदी केली तर तुम्हाला बँकेकडून 4.24 लाख रुपयांचे कर्ज मिळेल.
जर तुम्ही ही कार 5 वर्षांसाठी घेतली तर 9 टक्के व्याजदराने तुम्हाला दरमहा 9 हजार रुपये हप्ता भरावा लागेल. अशा प्रकारे, 60 हप्त्यांमध्ये रेनॉल्ट क्विड खरेदी केल्यावर तुम्हाला सुमारे 1.25 लाख रुपये व्याज द्यावे लागेल.
फुल्ल टॅंकवर 500 KM ची रेंज ! Royal Enfield च्या ‘या’ लोकप्रिय बाईकसाठी किती करावे डाउन पेमेंट?
कंपनीने रेनॉल्ट क्विड 1.0 आरएक्सई व्हेरियंटमध्ये 999 सीसी इंजिन दिले आहे. हे इंजिन 67 बीएचपीच्या कमाल पॉवरसह 9 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच, यात 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय आहे. कंपनीच्या मते, ही कार प्रति लिटर सुमारे 21 किमी मायलेज देते. यामध्ये 28 लिटरचे फ्युएल टॅंक देखील आहे.
फीचर्सनुसार, कंपनीने रेनॉल्ट क्विडमध्ये पॉवर स्टिअरिंग, लेन चेंज इंडिकेटर, टॅकोमीटर, रियर स्पॉयलर, एलईडी डीआरएल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ब्रेक असिस्ट, चाइल्ड सेफ्टी लॉक, ड्युअल एअरबॅग्जसह ट्रॅक्शन कंट्रोल असे अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. बाजारात ही कार Maruti Suzuki Alto K10 ला थेट स्पर्धा देते.