Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप

नुकतेच ऑडी या देशातील आघाडीच्या ऑटो कंपनीने भारतात 'माय ऑरास' नावाचे एक खास ॲप लाँच केले आहे. यामुळे प्रवाशांना एक वेगळाच आणि लक्षात राहणारा ड्रायव्हिंग अनुभव मिळणार आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 04, 2026 | 06:53 PM
कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले 'माय ऑरास' ॲप

कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले 'माय ऑरास' ॲप

Follow Us
Follow Us:
  • Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप
  • प्रवाशांचा ड्रायव्हिंग अनुभव सुखद होणार
  • तुमच्या मूडनुसार कारमधील वातावरण बदलणार
जर्मन लक्झरी कार निर्माता Audi इंडियाने आज ‘माय ऑरास’ (MyAuras) हा अत्याधुनिक इन-व्हेईकल डिजिटल अनुभव भारतात सादर केला आहे. या नव्या सुविधेमुळे ऑडी ग्राहकांना अधिक वैयक्तिकृत, आरामदायी आणि भावनिक पातळीवर जोडणारा ड्रायव्हिंग अनुभव मिळणार असून, लक्झरी वाहन मालकीचा संपूर्ण अनुभव नव्या उंचीवर पोहोचणार आहे. कंपनीच्या ‘वोरस्प्रुंग डर्च टेक्निक’ या तत्त्वज्ञानानुसार, माय ऑरासमध्ये प्रगत तंत्रज्ञानासोबतच ड्रायव्हिंगच्या भावनिक पैलूंनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

ऑडी इंडियाच्या माहितीनुसार, माय ऑरास हे मायऑडी कनेक्ट ॲपमध्ये एकत्रित करण्यात आले असून, वापरकर्ते आपल्या आयफोनद्वारे किंवा थेट वाहनातील इन्फोटेन्मेंट सिस्टिममधून या सुविधेचा वापर करू शकतात. या फीचरच्या माध्यमातून लायटिंग, संगीत, केबिन तापमान, सीट कम्फर्ट, सुगंधित वातावरण, मेसेज फंक्शन आणि केबिनमधील हवेचे नियंत्रण एका क्लिकमध्ये करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक ड्राइव्ह चालकाच्या मूडनुसार बदलत जाईल.

TAFE कडून ‘मॅसे डायनास्टार स्पर्धा’ सीझन 3 ची घोषणा; शेती नवकल्पनांसाठी राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ

ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्टर बलबीर सिंग धिल्लों यांनी सांगितले की, “ऑडी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण आणि अर्थपूर्ण अनुभव निर्माण करत आली आहे. माय ऑरास हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आजच्या ग्राहकांना त्यांच्या जीवनशैलीशी सुसंगत, वैयक्तिकृत अनुभव हवा असतो आणि माय ऑरास ॲपद्वारे आम्ही शांत, उत्साहवर्धक, आनंददायी आणि प्रेरणादायी मूड्स उपलब्ध करून देत आहोत.”

माय ऑरासमधील वन-क्लिक मल्टी-सेन्सरी कंट्रोलमुळे वापरकर्त्यांना विविध सेटिंग्ज स्वतंत्रपणे बदलण्याची गरज भासत नाही. एका क्लिकमध्ये संपूर्ण केबिन वातावरण बदलण्याची सुविधा उपलब्ध असल्याने ड्रायव्हिंग अधिक सोयीस्कर आणि त्रासमुक्त ठरणार आहे. तसेच रोडसाइड असिस्टन्स, वाहन सर्विस बुकिंग आणि इतर महत्त्वाची फीचर्स एकाच ॲपमध्ये उपलब्ध असल्याने ग्राहकांचा वेळ वाचणार आहेत.

याशिवाय, माय ऑरासमध्ये सण-उत्सवांसाठी साजेशी थीम्स, हंगामी सजावट आणि बर्थडे मोडसारख्या विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. वापरकर्त्यांच्या वाढदिवशी वाहन आपोआप खास सेटिंग्जसह सज्ज होऊन प्रवास अधिक संस्मरणीय बनवेल.

Electric Cars च्या मागणीत ‘छप्परफाड़’ मागणी! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top 5 वाहनांनी अख्ख मार्केट हलवलंय

माय ऑरास हे फीचर ऑडी इंडियाच्या ए४, क्यू३, क्यू३ स्पोर्टबॅक, क्यू५, ए६, क्यू७, क्यू८, आरएस क्यू८ आणि क्यू८ ई-ट्रॉन मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. हे फीचर My24 आणि त्यानंतरच्या ऑडी वाहनांमध्ये देण्यात आले आहे.

ऑडी इंडियाने स्पष्ट केले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्राहकांचा ड्रायव्हिंग अनुभव अधिक भावनिक, वैयक्तिकृत आणि लक्झरी बनवणे हा कंपनीचा प्रमुख उद्देश आहे. माय ऑरासच्या माध्यमातून ऑडीने पुन्हा एकदा स्मार्ट आणि प्रीमियम मोबिलिटीच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे.

Web Title: Audi india launches my auras app to uplift car driving experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 06:53 PM

Topics:  

  • Audi
  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.