Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेनॉल्ट-निसानचा मोठा धमाका! पुढील वर्षापर्यंत भारतात येणार ४ नवीन SUV! पाहा झलक

रेनॉल्ट आणि निसान भारतात लवकरच चार नवीन SUV लाँच करणार असून यातील तीन गाड्यांचे उत्पादन स्थानिक पातळीवर केले जाईल. यात रेनॉल्टची नवीन ७-सीटर व 'ब्रिज्जर' सब-४ मीटर SUV, तसेच निसानची फ्लॅगशिप 'Patrol' आणि ७-सीटर SUV चा समावेश आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 22, 2026 | 08:30 AM
रेनॉल्ट-निसानचा मोठा धमाका! पुढील वर्षापर्यंत भारतात येणार ४ नवीन SUV! पाहा झलक
Follow Us
Follow Us:
  • रेनॉल्ट आणि निसानच्या ४ नव्या SUV कंपन्या भारतात ४ नव्या SUV लाँच करणार असून, यातील ३ गाड्यांचे उत्पादन भारतातच केले जाईल.
  • रेनॉल्ट टाटा सफारीला टक्कर देणारी ३-रो (7-Seater) SUV आणि २०२७ मध्ये ‘ब्रिज्जर’ (Sub-4m) कॉम्पॅक्ट SUV लाँच करेल.
  • निसान २०२७ च्या सुरुवातीला लँड क्रूझरला टक्कर देणारी फ्लॅगशिप ‘Patrol’ (CBU) आणि नंतर रेनॉल्टवर आधारित स्वतःची ७-सीटर SUV आणेल.

रेनॉल्ट आणि निसान या दोन्ही भागीदार कंपन्यांनी भारतीय ऑटोमोबाईल बाजारावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला Hyundai Creta ला टक्कर देणाऱ्या गाड्या लाँच केल्यानंतर, आता पुढील वर्षापर्यंत या दोन्ही कंपन्या एकत्र मिळून भारतीय बाजारात चार नवीन SUV लाँच करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे, यातील तीन गाड्यांचे उत्पादन भारतातच केले जाणार असून त्यांची किंमतही अत्यंत स्पर्धात्मक ठेवली जाईल.

१. रेनॉल्टची नवीन ३-रो SUV

रेनॉल्ट सध्या एका नवीन ७-सीटर SUV वर काम करत असून तिची चाचणी भारतीय रस्त्यांवर सुरू आहे. ही गाडी टाटा सफारी ,ह्युंडाई अल्काझार आणि महिंद्रा XUV7XO ला थेट टक्कर देईल.

  • डिझाईन आणि साईज: ही SUV तिसऱ्या जनरेशनच्या डस्टरवर आधारित असेल, परंतु कौटुंबिक आणि प्रीमियम लूक देण्यासाठी हिचे डिझाईन थोडे कमी रफ-ॲंड-टफ ठेवले जाईल. दुसऱ्या रांगेत जास्त जागा मिळण्यासाठी हिचा व्हीलबेस ५० मिमीने मोठा असेल, तसेच तिसऱ्या रांगेसाठी मागचा भाग लांब केला जाईल.
  • इंजिन: ही गाडी १.३-लीटर टर्बो पेट्रोल आणि १.८-लीटर पेट्रोल-इलेक्ट्रिक हायब्रिड व्हेरियंटमध्ये लाँच केली जाऊ शकते.
नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!

२. रेनॉल्ट ब्रिज्जर

२०२७ च्या उत्तरार्धात रेनॉल्ट आपल्या ‘ब्रिज्जर’ कॉन्सेप्ट मॉडेलची प्रॉडक्शन व्हर्जन लाँच करेल. ही ४-मीटरपेक्षा लहान (Sub-4m) SUV असेल, जी महिंद्राच्या ‘Vision.S’ संकल्पनेवर आधारित गाडी आणि टाटाच्या आगामी ‘Scarlet’ ला आव्हान देईल.

  • वैशिष्ट्ये: रेनॉल्ट ब्रिज्जरचा लूक बॉक्सी/चौरस असेल, ज्यामध्ये १७-इंचाचे व्हील्स आणि २०० मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स मिळेल. गाडीच्या केबिनमध्ये २०० मिमीची क्लास-लीडिंग नी-रूम आणि ४०० लीटरची डिग्गी मिळण्याची शक्यता आहे.
  • इंजिन पर्याय: यात १.२-लीटर पेट्रोल इंजिन  दिले जाईल. भविष्यात याचे हायब्रिड आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक मॉडेलही लाँच केले जाऊ शकते.
Nissan Tekton : ‘वन कार, वन वर्ल्ड’ संकल्पनेत आणली नवीन गाडी! भारतात झाली लाँच, फीचर्समध्ये A1

३. निसान पेट्रोल (Nissan Patrol)

नुकत्याच लाँच झालेल्या निसान टेकटॉन नंतर, निसानची पुढील सर्वात मोठी गाडी ‘Patrol’ असू शकते. कंपनी २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ही फ्लॅगशिप SUV भारतात थेट जपानमधून आयात करून लाँच करू शकते.

  • स्पर्धा आणि इंजिन: ही गाडी टोयोटा लँड क्रूझर ३०० ला टक्कर देईल. जागतिक बाजारात ही ३.८-लीटर V6 आणि ३.५-लीटर ट्विन-टर्बो V6 पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. भारतात निसान याचे सर्वाधिक फीचर्स असलेले एकच टॉप व्हेरियंट ट्विन-टर्बो इंजिनसह आणण्याची शक्यता आहे.
४. निसानची नवीन ३-रो SUV

२०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत निसान, रेनॉल्टच्या आगामी ३-रो SUV वर आधारित स्वतःची नवीन ७-सीटर SUV लाँच करेल.

  • वैशिष्ट्ये: या गाडीचे डिझाईन निसानच्या ‘Patrol’ SUV पासून प्रेरित असेल, ज्यामुळे ती अधिक शार्प आणि आक्रमक दिसेल. गाडीचे इंटीरियर, फीचर्स आणि इंजिनचे पर्याय मात्र रेनॉल्टच्या ३-रो SUV सारखेच असतील.

Web Title: Renault nissan four upcomoing suv cars in next year auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • automobile
  • nissan
  • Renault

संबंधित बातम्या

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
1

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
2

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
3

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स
4

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.