
Royal Enfield 250cc Hybrid Motorcycle Launch (फोटो सौजन्य-AI एआय)
Royal Enfield 250cc Hybrid Motorcycle लवकरच भारतीय दुचाकी मार्केटमध्ये एन्ट्री करू शकते. रॉयल एनफिल्ड आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक नवीन एंट्री-लेव्हल 250cc हायब्रीड बाईक आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाईक आर्थिक वर्ष 2027-28 (FY28) मध्ये लाँच होण्याची शक्यता असून, तिचे मायलेज 50 kmpl पेक्षा जास्त असू शकते. विशेष म्हणजे, ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात स्वस्त मोटरसायकल ठरू शकते.
गेल्या वर्षीही Royal Enfield 250cc Hybrid Motorcycle संदर्भात चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी कंपनी चीनमधील CFMoto कडून 250cc इंजिन घेणार असल्याची माहिती समोर आली होती. ही बाईक हंटर 350 पेक्षा कमी किमतीत आणली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. सुरुवातीला या बातमीला केवळ अफवा मानले जात होते. पण आता ET Auto च्या रिपोर्टनुसार हा प्रोजेक्ट पुन्हा मार्गावर आला असून FY28 मध्ये बाईक सादर होऊ शकते.
कंपनीचा या नवीन मॉडेलमागे तरुण कस्टमर्सना आकर्षित करण्याचा विचार आहे. सध्या 100cc आणि 125cc कम्युटर बाईक वापरणारे अनेक रायडर्स जास्त पॉवरफुल मोटरसायकलकडे वळत आहेत. अशा कस्टमर्सना परवडणाऱ्या किमतीत 250cc बाईक देण्याची रॉयल एनफिल्डची योजना असल्याचे सांगितले जात आहे. वाढत्या महत्त्वाकांक्षा आणि सहज उपलब्ध होणाऱ्या फायनान्स सुविधांमुळे या सेगमेंटमध्ये नवीन संधी निर्माण होत आहेत.
रिपोर्टनुसार, नवीन बाईकमध्ये हायब्रीड टेक्नोलॉजीचा वापर केला जाईल. तिचे मायलेज 50 kmpl पेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. तसेच इंजिन BS7 (CAFE) उत्सर्जन नियमांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने विकसित केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे चांगले मायलेज आणि कमी उत्सर्जन यांचा समतोल साधण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.
Triumph Bonneville T4 Vs Royal Enfield Classic 350: किंमत, इंजिन आणि फीचर्समध्ये कोणती बाइक वरचढ?
दरम्यान, रॉयल एनफिल्ड चेन्नई येथील प्रोडक्शन प्लांटची कॅपसिटी 1.5 दशलक्षवरून 2 दशलक्ष मोटरसायकलपर्यंत वाढवण्यासाठी 958 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. याशिवाय आंध्र प्रदेशात 230 दशलक्ष डॉलरच्या गुंतवणुकीतून नवीन प्लांट उभारला जात आहे. 2032 पर्यंत हा प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर वर्षाला 9 लाख युनिट्स तयार करू शकेल. त्यामुळे भविष्यातील नवीन मॉडेल्ससाठी कंपनीची प्रोडक्शन सिस्टम मजबूत होणार आहे.
Ans: मिळालेल्या रिपोर्टनुसार, ही नवीन मोटरसायकल आर्थिक वर्ष 2027-28 (FY28) मध्ये भारतीय मार्केटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
Ans: या बाईकमधून 50 kmpl पेक्षा जास्त मायलेज मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण कंपनीकडून प्रत्यक्ष मायलेजची माहिती जाहीर झालेली नाही.
Ans: सध्या कंपनीने किंमत जाहीर केलेली नाही. सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये सुमारे 1.20 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे ही कंपनीची सर्वात स्वस्त बाईक ठरू शकते. Ad Ad options Learn more