Honda Rebel 500 Launched In India With E-Clutch (फोटो सौजन्य-AI एआय)
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने आज नवीन होंडा रेबेल ५०० च्या किमती जाहीर केल्या आणि बुकिंग सुरू केले. जुलै २०२६ मध्ये एचएमएसआय च्या विस्तारित १०-उत्पादनांच्या पोर्टफोलिओचा भाग म्हणून अनावरण करण्यात आलेली रेबेल ५००, भारतातील होंडाच्या स्थानिकीकरणाच्या प्रवासातील आणखी एक पाऊल आहे, तसेच भारतीय ग्राहकांसाठी कंपनीच्या लाइफस्टाइल मोटरसायकलच्या श्रेणीला अधिक मजबूत करते.
होंडा रेबेल ५०० च्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत ₹४,४९,९०० (एक्स-शोरूम, बंगळूर) आणि ई-क्लच व्हेरिएंटची किंमत ₹४,८९,९०० (एक्स-शोरूम, बंगळूर) ठेवण्यात आली आहे. भारतात उत्पादित, नवीन रेबेल ५०० होंडाच्या जागतिक स्तरावर प्रस्थापित क्रूझर प्लॅटफॉर्मला भारतीय ग्राहकांसाठी अधिक सुलभ बनवते, त्याच वेळी तिचे अस्सल रेबेल वैशिष्ट्य आणि जागतिक स्तरावर सिद्ध झालेला रायडिंगचा अनुभव कायम ठेवते.
रेबेल 500 देशभरातील केवळ अधिकृत होंडा बिगविंग डीलरशिप्समार्फत उपलब्ध असेल. एचएमएसआय वेबसाइट आणि होंडा बिगविंग डीलर नेटवर्कद्वारे ₹5,000 मध्ये बुकिंग आता सुरू झाले आहे.
Honda Rebel 500 भारतात लाँच; 4.50 लाखांपासून किंमत, E-Clutch ऑप्शनही दाखल!
Honda Rebel 500 – Lifestyle Cruiser
आपल्या लो-स्लंग स्टान्स, मिनिमलिस्ट स्टायलिंग आणि वैशिष्ट्यपूर्ण क्रूझर कॅरॅक्टरसह, होंडा रेबेल 500 होंडाची जागतिक क्रूझर ओळख भारतीय रायडर्सपर्यंत पोहोचवते. 471cc लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिनद्वारे समर्थित, ही बाईक शहरी राइड्स, वीकेंड टूरिंग आणि लांबच्या प्रवासांसाठी दमदार टॉर्क आणि सुरळीत परफॉर्मन्स देते.
ई-क्लच व्हेरिएंट रेबेल ५०० मध्ये होंडाचे प्रगत क्लच-कंट्रोल तंत्रज्ञान सादर करते. यामुळे रायडर्सना क्लच लिव्हर न वापरता गाडी सुरू करणे, थांबवणे आणि गिअर बदलणे शक्य होते, तसेच गरजेनुसार पारंपरिक क्लच-लिव्हर वापरण्याचा पर्यायही उपलब्ध राहतो.
रेबेल ५०० मध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, होंडा रोडसिंकसह टीएफटी डिस्प्ले, टर्न-बाय-टर्न नॅव्हिगेशन आणि होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल देण्यात आले आहेत. ड्युअल-चॅनल एबीएससह असलेले पुढचे आणि मागचे डिस्क ब्रेक चालकाचा आत्मविश्वास आणखी वाढवतात.
वैशिष्ट्ये
होंडा रेबेल 500 स्टँडर्ड व्हेरिएंट मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक आणि मॅट ड्यून ब्राउन या 2 रंगांमध्ये उपलब्ध असेल. या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 4,49,900 रुपये आहे. तर होंडा रेबेल 500 E-Clutch व्हेरिएंटसाठीही हेच 2 रंगांचे ऑप्शन मिळतील. या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 4,89,900 रुपये निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही व्हेरिएंटच्या किमती बंगळूर येथील एक्स-शोरूम दरानुसार आहेत. सर्व किमती बंगळूरु येथील एक्स-शोरूम दराच्या असून, त्या १९ नोव्हेंबर २०२६ पासून लागू आहेत.
एचएमएसआय बद्दल:
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. (एचएमएसआय) ही जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. १९४८ मध्ये स्थापित, होंडा मोटर ही दुचाकींच्या क्षेत्रातील एक जागतिक अग्रणी कंपनी असून, तिचा ऑटोमोबाईल्स, मोटरसायकल्स, पॉवर प्रॉडक्ट्स, सागरी आणि विमानचालन असा विविध पोर्टफोलिओ आहे आणि जगभरात तिची मजबूत उपस्थिती आहे.
‘गतिशीलतेचा आनंद’ देण्याच्या होंडाच्या तत्त्वज्ञानावर आधारित, एचएमएसआय भारतात जागतिक दर्जाचे अभियांत्रिकी आणि नावीन्य आणते. ही कंपनी देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठांसाठी मोटरसायकल्स आणि स्कूटर्सचे उत्पादन करते. तिचे मानेसर, तापुकरा, नरसपुरा आणि विठ्ठलपूर येथे चार प्लांट आहेत आणि ७,००० हून अधिक टचपॉइंट्सच्या नेटवर्कद्वारे ती ७६ दशलक्षाहून अधिक ग्राहकांना सेवा देते.
होंडाच्या जागतिक उद्दिष्टांशी सुसंगत राहून, एचएमएसआय २०५० पर्यंत उत्पादने आणि कामकाजामध्ये कार्बन तटस्थता प्राप्त करण्याच्या दिशेने काम करत आहे, तसेच वाहतूक अपघातातील मृत्यूंची संख्या शून्य करण्याचे ध्येयही तिने ठेवले आहे.
Ans: होंडा रेबेल 500 स्टँडर्ड व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 4,49,900 रुपये आहे. तर E-Clutch व्हेरिएंटची किंमत 4,89,900 रुपये आहे. या किमती बंगळूर येथील एक्स-शोरूमनुसार आहेत.
Ans: या बाइकला 471cc लिक्विड-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिन मिळते. हे इंजिन 46.2 PS पॉवर आणि 43.3 Nm टॉर्क निर्माण करते.
Ans: E-Clutch सिस्टममुळे रायडरला क्लच लीव्हर न वापरता बाइक सुरू करणे, थांबवणे आणि गिअर बदलणे शक्य होते. गरजेनुसार पारंपरिक क्लच लीव्हर वापरण्याची सुविधाही यात कायम ठेवण्यात आली आहे.






