
फोटो सौजन्य: X.com
Royal Enfield Classic 350 ही तिच्या सेगमेंटमध्ये अनेक वर्षांपासून लोकप्रिय बाईक आहे. त्यात GST 2.0 नंतर याची किंमत आणखी कमी झाली आहे. दोन्ही बाईकमध्ये रेट्रो लूक आहे, परंतु त्यांची स्टाइल वेगळी आहे. क्लासिक 350 मध्ये अधिक रेट्रो आणि साधे डिझाइन आहे, तर हार्ले X440 T मध्ये रेट्रो लूक आधुनिक डिझाइन आणि नवीन फीचर्ससह एकत्रित केला आहे.
तुमच्या Electric Car ची Range वाढवायची असेल तर मग ‘या’ चुका टाळाच!
Harley X440 T ची सुरुवातीची किंमत 2.79 लाख रुपयांपासून सुरु होते, तर Classic 350 ची किंमत कमी आहे. टॉप मॉडेल्सच्या तुलनेत, Harley सुमारे 63,000 रुपयांनी महाग झाली आहे. यामुळे Classic 350 अधिक परवडणारी बाईक बनते. Harley X440 T ही प्रीमियम बाईक म्हणून डिझाइन केलेली आहे, तर Classic 350, तिच्या किंमती आणि साध्या डिझाइनमुळे, रायडर्समध्ये लोकप्रिय आहे.
Harley X440 T मध्ये 440cc चे इंजिन आहे, जे 27 hp पॉवर आणि 38 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. कमी RPM वरही चांगला टॉर्क मिळत असल्यामुळे ही बाईक हायवेवर स्मुथ, फास्ट आणि पावरफुल फील देते. दुसरीकडे, Classic 350 मध्ये 349cc इंजिन आहे, जे 20.2 hp पॉवर आणि 27 Nm टॉर्क देते. यात 5-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. ही शहरातील ट्रॅफिकमध्ये आरामात चालते, पण हायवेवर Harley इतकी वेगवान किंवा पावरफुल वाटत नाही.
2 लाखांचं Down Payment आणि नवी कोरी Tata Sierra ची थेट होम डिलिव्हरी, जाणून घ्या EMI?
Harley X440 T च्या फ्रंटमध्ये 43mm USD फोर्क दिले आहेत, जे साधारणपणे स्पोर्ट्स बाईक्समध्ये मिळतात. त्यामुळे बाईक अधिक स्थिर राहते आणि ब्रेकिंगदरम्यान चांगला कंट्रोल देते. याचे रुंद टायर्स हायवेवर उत्कृष्ट ग्रिप देतात. Classic 350 मध्ये 41mm टेलिस्कोपिक फोर्क आहेत, हा बेसिक सेटअप आहे. वजनात दोन्ही जवळजवळ सारखेच आहेत Classic 350: 195 kg, Harley X440 T: 192 kg. त्यामुळे दोन्ही बाइक्स रस्त्यावर मजबूत आणि स्टेबल फील देतात.
Harley X440 T टेक्नॉलॉजीच्या बाबतीत Classic 350 च्या तुलनेत खूपच पुढे दिसते. यात दोन Ride Modes, Traction Control आणि Switchable ABS सारखी महत्त्वाची फीचर्स मिळतात, ज्यामुळे राइडिंग अधिक सुरक्षित होते. Classic 350 मध्येही चांगले फीचर्स आहेत, पण टेक्नोलॉजीच्या दृष्टीने ती Harley इतकी ॲडव्हान्स्ड नाही. यात Dual-Channel ABS आणि Tripper Navigation मिळते, तर याचा मीटर क्लस्टर रेट्रो स्टाइलमध्ये असलेला सेमी-डिजिटल युनिट आहे.