Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

भारतात अनेक ऑटो कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. अशाच दोन कार म्हणजे Tata Punch EV की MG Comet. चला दोन्ही कारच्या फीचर्स, रेंज आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 07, 2026 | 09:47 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • ग्राहकांचा इलेक्ट्रिक कारला चांगला प्रतिसाद
  • इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये Tata Punch EV आणि MG Comet ला चांगली मागणी
  • जाणून घ्या दोन्ही कारचे वैशिष्ट्य
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असतानाच ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहेत. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्यांनी त्यांच्या उत्तमोत्तम इलेक्ट्रिक कार आहे. नुकतेच Tata Motors ने देखील टाटा पंच ईव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच केले होते. याच कारचा थेट सामना MG Comet EV सोबत होत आहे.

भारतात परवडणाऱ्या बजेट इलेक्ट्रिक कारच्या विभागात, दोन नावे लक्ष वेधून घेत आहेत: एमजी कॉमेट ईव्ही आणि टाटा पंच ईव्ही. दोन्ही परवडणाऱ्या ईव्ही BaaS पर्यायांसह येतात आणि वेगवेगळ्या ग्राहक वर्गांना लक्ष्य करतात. जर तुम्ही यापैकी एखादे वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर किंमत आणि फीचर्सच्या बाबतीत कोणती कार चांगली आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.

50 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Ertiga खरेदी केली जाऊ शकते का? किती असेल EMI?

दोन्ही EV ची किंमत

पहिली कार म्हणजे MG Comet EV, जी तुलनेने अधिक स्वस्त मानली जाते. BaaS (Battery as a Service) मॉडेलमध्ये याची सुरुवातीची किंमत सुमारे 4.99 लाख रुपये आहे. तर बॅटरीसह या कारची किंमत साधारण 7.62 लाख रुपयांपासून सुरू होते.

दुसरीकडे Tata Punch EV बाबत बोलायचे झाल्यास, BaaS मॉडेलमध्ये तिची सुरुवातीची किंमत सुमारे 6.49 लाख रुपये आहे, तर बॅटरीसह किंमत जवळपास 9.69 लाख रुपयांपासून सुरू होते. मात्र, पंच EV साठी बॅटरी भाडे सुमारे 2.60 रुपये प्रति किलोमीटर आहे, जे कॉमेट EV च्या सुमारे 3.20 रुपये प्रति किलोमीटर भाड्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे जास्त अंतर चालवणाऱ्यांसाठी दीर्घकाळात Punch EV अधिक किफायतशीर ठरू शकते.

डिझाइन आणि साइझ

डिझाइन आणि साइजच्या बाबतीत Tata Punch EV ही एक मायक्रो SUV असल्यामुळे तिची साइझ मोठी आहे. त्यामुळे यात अधिक स्पेस आणि चांगली रोड प्रेझेन्स मिळते. तर MG Comet EV ही एक छोटी सिटी कार आहे, जी खास करून शहरातील गर्दी आणि सोपी पार्किंग लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. जर एखादा व्यक्ती कुटुंबासोबत जास्त प्रवास करत असेल, तर Punch EV अधिक प्रॅक्टिकल पर्याय ठरू शकते.

घरी EV चार्ज करताना चुकूनही करू नका ‘या’ चुका! अन्यथा खिसा होईल चांगलाच रिकामा

दोन्ही कारची रेंज

रेंजच्या बाबतीतही Tata Punch EV आघाडीवर दिसते. ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर साधारण 315 ते 421 किमी पर्यंत रेंज देऊ शकते. तर MG Comet EV सुमारे 230 किमी पर्यंत चालण्याचा दावा करते.

म्हणूनच, जर तुमचा बजेट कमी असेल आणि शहरात कमी अंतरासाठी इलेक्ट्रिक कार हवी असेल, तर MG Comet EV चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, जास्त रेंज, मोठा आकार आणि कुटुंबासाठी अधिक स्पेस हवी असेल, तर Tata Punch EV अधिक व्हॅल्यू-फॉर-मनी पर्याय ठरू शकते.

Web Title: Tata punch ev vs mg comet ev which electric car is best in features range price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 09:47 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • MG
  • tata punch

संबंधित बातम्या

Maruti, Hyundai की Tata? ५ वर्षांनंतर कोणाची रीसेल व्हॅल्यू असेल सर्वोत्तम? जाणून घ्या तुलनात्मक विश्लेषण
1

Maruti, Hyundai की Tata? ५ वर्षांनंतर कोणाची रीसेल व्हॅल्यू असेल सर्वोत्तम? जाणून घ्या तुलनात्मक विश्लेषण

पल्सर प्रेमींसाठी मोठी बातमी! बजाज लवकरच लाँच करणार १२५ ते १६० सीसी सेगमेंटमधील नवीन बाइक्स; जाणून घ्या डिटेलमध्ये
2

पल्सर प्रेमींसाठी मोठी बातमी! बजाज लवकरच लाँच करणार १२५ ते १६० सीसी सेगमेंटमधील नवीन बाइक्स; जाणून घ्या डिटेलमध्ये

Triumph: ट्रायम्फकडून रायडर्ससाठी मोठे सप्राईझ! 2026 Trident, Daytona आणि Tiger Sport नव्या दमदार फीचर्ससह लाँच
3

Triumph: ट्रायम्फकडून रायडर्ससाठी मोठे सप्राईझ! 2026 Trident, Daytona आणि Tiger Sport नव्या दमदार फीचर्ससह लाँच

ऑफिशल लाँच आधीच ‘न्यु मारुती ब्रेझा टर्बो पेट्रोल’ डीलरशिपमध्ये पोहोचली! समोर आला व्हिडीओ
4

ऑफिशल लाँच आधीच ‘न्यु मारुती ब्रेझा टर्बो पेट्रोल’ डीलरशिपमध्ये पोहोचली! समोर आला व्हिडीओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.