Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

धार्मिक पर्यटन वाढावे म्हणून राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. मात्र, याच रेल्वे मार्गाला सोनाई परिसरातील शेतकरी विरोध करत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 07, 2026 | 09:04 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:

केंद्र सरकारने धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी Rahuri ते Shani Shingnapur या 21.84 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वेमार्गाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भात Central Railway चे मुख्य प्रशासनिक अधिकारी अवनीशकुमार पांडे यांनी गुरुवारी (दि. 5) अधिसूचना प्रसिद्ध केली.

या अधिसूचनेनुसार नेवासा तालुक्यातील सोनई आणि शनिशिंगणापूर परिसरातील सुमारे 43.469 हेक्टर (हे.आर) शेतीजमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून शेतकऱ्यांना हरकती नोंदवण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

सोनाई परिसरातील शेतकऱ्यांची नावे, गट क्रमांक आणि संपादन क्षेत्रासह अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर परिसरात चलबिचल आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील बहुतांश जमीन बागायती असल्याने भूसंपादनामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली उपजीविका धोक्यात येणार असल्याची भावना व्यक्त केली आहे.

Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

रेल्वेमार्ग जिरायती भागातून न्यावा, शेतकऱ्यांची मागणी

सोनई परिसर हा बागायती पट्टा असून येथे मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते. त्यामुळे या भागातून रेल्वेमार्ग नेण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. अनेक शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, भूसंपादनाच्या वेळी मिळणारा सरकारी मोबदला सध्याच्या बाजारभावापेक्षा कमी असतो. त्यामुळे बागायती जमीन जाणे म्हणजे त्यांच्यासाठी मोठा आर्थिक फटका ठरणार आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग बागायती क्षेत्राऐवजी जिरायती भागातून नेण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

आधी 18 किमी मार्गाचे सर्वेक्षण

रेल्वे मंत्रालयाने सुरुवातीला खडांबे, कात्रड, मोरेचिंचोरा आणि राऊतवस्ती मार्गे सोनई–शनिशिंगणापूर असा सुमारे 18 किलोमीटर रेल्वेमार्गाचा पर्याय तपासला होता. या भागातील जमीन खडकाळ आणि मुरमाची असल्याने रेल्वेचे फाउंडेशन मजबूत होऊ शकते, असेही सांगितले जात होते. तसेच जवळील घोडेगाव एमआयडीसीमधील उद्योगांनाही या मार्गाचा फायदा होऊ शकला असता. मात्र हा पर्याय पुढे रद्द करण्यात आला.

Buldhana Crime: भावाने केली भावाची हत्या! मद्यधुंद अवस्थेत आणले मित्राला घरी, संतापाच्या लाटेत झाला खून

ऑक्टोबर 2023 मध्ये प्रस्तावित राहुरी–शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाचे जमिनीवरून आणि हवाई सर्वेक्षण करण्यात आले होते. प्रस्तावित मार्ग तांदूळवाडी, देसवंडी, कोंढवड, तमनर आखाडा, उंबरे, ब्राह्मणी, बेल्हेकरवाडी, श्रीरामवाडी, सोनई, लांडेवाडी रोड, गणेशवाडी रोड, खरवंडी रस्ता आणि कांगोणी रस्ता या भागांतून जाणार असून शनिशिंगणापूर येथे रेल्वे स्थानक उभारले जाणार आहे.

शेतकरी हरकती नोंदवणार

सोनई परिसरातील शेतकऱ्यांनी या रेल्वेमार्गाला विरोध दर्शवला असून 30 दिवसांच्या आत प्रांताधिकाऱ्यांकडे हरकती नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी अनिल बाबासाहेब निमसे (श्रीरामवाडी, सोनई) म्हणाले, “धार्मिक पर्यटन वाढावे याला आमचा विरोध नाही. मात्र त्यासाठी गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी जाणे योग्य नाही. अनेक पिढ्यांची उपजीविका या जमिनीवर अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही या प्रकल्पाविरोधात हरकती नोंदवणार आहोत.”

तर संदीप दरंदले (सोनई) यांनी सांगितले की, “सोनई परिसर हा बागायती पट्टा आहे. त्यामुळे रेल्वेमार्ग जिरायती भागातून नेण्याचा विचार सरकारने करावा. आम्हाला रेल्वे प्रकल्पाला विरोध नाही; मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी.”

Web Title: Ahilyanagar news sonai farmers protest against rahuri shanishinganapur railway line

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • automobile
  • Indian Railways
  • Shani Shingnapur

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.