Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रॉयल एनफिल्डची हेल्मेट्सच 2.68 लाखांची! फक्त 16 युनिट्स, जाणून घ्या काय आहे खास

रॉयल एनफिल्ड आणि Hedonने 2 खास लिमिटेड एडिशन हेल्मेट्स सादर केली आहेत. Hedonist हाफ-फेस हेल्मेटची किंमत 2.11 लाख, तर Heroine Racer फुल-फेस हेल्मेटची किंमत 2.68 लाख रुपये आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 09, 2026 | 08:15 AM
रॉयल एनफिल्डची हेल्मेट्सच 2.68 लाखांची! फक्त 16 युनिट्स, जाणून घ्या काय आहे खास
Follow Us
Follow Us:
  • रॉयल एनफिल्ड आणि Hedonने मिळून फक्त 16 युनिट्सची खास लिमिटेड एडिशन हेल्मेट कलेक्शन सादर केली.
  • Hedonist हाफ-फेस हेल्मेटची किंमत अंदाजे 2.11 लाख रुपये असून 6 साइजमध्ये मिळणार आहे.
  • Heroine Racer फुल-फेस हेल्मेटमध्ये प्रीमियम फिनिशसोबत ECE 22.06 आणि DOT सर्टिफिकेशन मिळते.
रॉयल एनफिल्डने प्रीमियम ब्रिटिश हेल्मेट ब्रँड Hedon सोबत खास पार्टनरशिप करत लिमिटेड एडिशन हेल्मेट्सची कलेक्शन सादर केली आहे. या कलेक्शनची सर्वात खास गोष्ट म्हणजे जगभरात याची फक्त 16 युनिट्स तयार केली जाणार आहेत. यामध्ये 8 हाफ-फेस आणि 8 फुल-फेस हेल्मेट्सचा समावेश असून, Hedonist आणि Heroine Racer अशा 2 स्टाइलमध्ये ही कलेक्शन देण्यात आली आहे. दोन्ही हेल्मेट्स ऑर्डर मिळाल्यानंतर हाताने तयार केली जाणार आहेत.

Hedonist हेल्मेटची किंमत 2.11 लाख

Hedonist हे हाफ-फेस हेल्मेट असून त्याची किंमत £1,650 म्हणजेच अंदाजे 2.11 लाख रुपये आहे. हे हेल्मेट XS, S, M, L, XL आणि XXL अशा 6 साइजमध्ये मिळते. सुरक्षेच्या दृष्टीने याला ECE 22.06 आणि DOT सर्टिफिकेशन मिळाले आहे. त्यामुळे प्रीमियम लूकसोबत आधुनिक सुरक्षा मानकांवरही भर देण्यात आला आहे.

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

या हेल्मेटमध्ये फायबरग्लास आणि कार्बन फायबरपासून तयार केलेले कंपोझिट फायबर शेल वापरण्यात आले आहे. आतमध्ये Hed Armour लाइनिंग, 360-डिग्री कुशन पॅडिंग आणि Merlin अँटी-बॅक्टेरियल फॅब्रिक देण्यात आले आहे. ब्लॅक लेदर लाइनिंग, व्हाइट लेदर ट्रिम आणि 3-चॅनेल व्हेंटिलेशन सिस्टमसह 7 इंटरचेंजेबल रंगीत व्हायझर्सही मिळतात.

Heroine Racer ची किंमत 2.68 लाख

Heroine Racer हे फुल-फेस हेल्मेट असून त्याची किंमत £2,100 म्हणजे अंदाजे 2.68 लाख रुपये आहे. हे S, M, L, XL, XXL आणि XXXL अशा 6 साइजमध्ये ऑर्डर करता येते. Hedonist प्रमाणे यालाही ECE 22.06 आणि DOT सर्टिफिकेशन तसेच 1 वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी मिळते.

हेल्मेट बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरतात आणि ते डोक्याला गंभीर दुखापतीपासून कसे वाचवते? समजून घ्या

या मॉडेलमध्ये अल्ट्रा-लाइट आणि लो-प्रोफाइल शेल, स्टेनलेस स्टील DD बकल, स्टेनलेस स्टील हार्डवेअर आणि अनोडाइज्ड स्टील-कलर्ड ब्रास HEDON प्लेट देण्यात आली आहे. ECE-होमोलोगेटेड क्लिअर व्हायझरसह अतिरिक्त रेड व्हायझरही मिळतो. क्रीम आणि रेड ऑटोमोटिव्ह पेंटला क्रोम पॅटिना शेल आणि ग्लॉस फिनिश देण्यात आले आहे.

ही कलेक्शन रॉयल एनफिल्डच्या क्लासिक मोटरसायकल संस्कृतीला Hedonच्या प्रीमियम क्राफ्टमॅनशिपशी जोडते. त्यामुळे सामान्य रायडिंग हेल्मेटपेक्षा कलेक्टर्स आणि प्रीमियम मोटरसायकल संस्कृतीची आवड असलेल्या रायडर्ससाठी ही कलेक्शन खास ठरते.

Web Title: Royal enfield hedon limited edition helmets price features auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • automobile
  • royal enfield

संबंधित बातम्या

मॉन्ट्रा इलेक्ट्रिकचा मोठा टप्पा! Rhino इलेक्ट्रिक ट्रकची 1,000 वी गाडी तयार
1

मॉन्ट्रा इलेक्ट्रिकचा मोठा टप्पा! Rhino इलेक्ट्रिक ट्रकची 1,000 वी गाडी तयार

महिंद्रा रेसिंग आणि व्हॅलिओची भागीदारी; Formula E Gen4 कारसाठी मिळणार मोठी टेक्नोलॉजी मदत!
2

महिंद्रा रेसिंग आणि व्हॅलिओची भागीदारी; Formula E Gen4 कारसाठी मिळणार मोठी टेक्नोलॉजी मदत!

ह्युंदाई व्हर्नाला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग; सेफ्टीमध्ये मारली बाजी! पाहा तुमच्यासाठीही आहे का सेफ?
3

ह्युंदाई व्हर्नाला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग; सेफ्टीमध्ये मारली बाजी! पाहा तुमच्यासाठीही आहे का सेफ?

Tata Aeris Sales: टाटा एरिसची पहिल्याच महिन्यात 4,000 कारची विक्री; ग्राहकांकडून चिक्कार प्रतिसाद प्रोडक्शन वाढवण्याची तयारी!
4

Tata Aeris Sales: टाटा एरिसची पहिल्याच महिन्यात 4,000 कारची विक्री; ग्राहकांकडून चिक्कार प्रतिसाद प्रोडक्शन वाढवण्याची तयारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.