फोटो सौजन्य: @bikeindia (X.com)
सध्या इलेक्ट्रिक वाहनांना भारतात चांगली मागणी मिळत आहे. याचे कारण म्हणजे वाढत्या इंधनाच्या किंमती, ज्यामुळे अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे वळताना दिसत आहे. इलेक्ट्रिक कार प्रमाणेच ई-बाईक देखील मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे. हीच मागणी पाहता, अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आपल्या बाईक भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यास सज्ज होत आहे.
रॉयल एन्फिल्डचा देशात एक वेगळाच चाहता वर्ग आहे. आजही रॉयल एन्फिल्डच्या बाईक विकत घेण्याचे स्वप्न अनेक जणांचे असते. कंपनी देखील नवनवीन तंत्रज्ञान आपल्या बाईक आणत आहे. आता कंपनीने आपली पहिली वाहिली इलेक्ट्रिक बाईक भारतात सादर केली आहे.
रॉयल एनफील्डने भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार Flying Flea सादर केली आहे. ही इलेक्ट्रिक बाईक पहिल्यांदा इटलीतील मिलान येथे झालेल्या EICMA २०२४ मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती. रॉयल एनफील्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक खूपच आकर्षक दिसते. पण ही बाईक त्याच्या लूकसारखेच परफॉर्मन्स देईल का? चला जाणून घेऊया.
रॉयल एनफील्ड Flying Flea C6 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील फ्लाइंग फ्ली बाईकपासून प्रेरित एक उत्तम रेट्रो-रोडस्टर डिझाइन आहे. बाईकमध्ये गोल एलईडी इंडिकेटरसह एलईडी हेडलाइट आहे. रॉयल एनफील्ड शॉटगन 650 प्रमाणेच याची मागील सीट माउंट केली जाऊ शकते. यामध्ये बॅटरी पॅक टाकीखाली दिला आहे आणि त्यात कूलिंग फिन देखील दिले आहेत. मागील बाजूस, ब्रेस्ड रियर फेंडर, फेंडर-माउंटेड टेल लाईट आणि इंडिकेटर्ससह एक उत्तम लूक देण्यात आला आहे.
रॉयल एनफिल्डने त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकचे स्पेसिफिकेशन्स उघड केलेले नाहीत. पण अपेक्षा आहे की ही इलेक्ट्रिक बाईक 250-300 सीसी आयसीई बाईक इतकी परफॉर्मन्स देण्याची क्षमता ठेवेल. त्याच्या सस्पेंशन युनिटमध्ये गर्डर फोर्क आणि मोनोशॉकचा समावेश आहे. बाईकच्या दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक आणि 19-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. त्याचे मागील चाक चेन ड्राईव्हद्वारे चालवले जाते.
तीन नव्या व्हेरियंट्ससह 2025 Kia Seltos दणक्यात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Royal Enfield Flying Flea C6 मध्ये रॉयल एनफील्ड हिमालयन 450 प्रमाणेच एक गोल टीएफटी इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे, जो वेग, ओडोमीटर, ट्रिप मीटर, चार्ज स्थिती, रेंज आणि बरेच काही दर्शवितो. त्याचा कन्सोल स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीला देखील सपोर्ट करतो. फ्लाइंग फ्लीमध्ये चावीशिवाय इग्निशन आणि टाकीवर स्थित आपत्कालीन सुरक्षा स्विच देखील आहे.
रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली C6 ची भारतीय बाजारपेठेत एक्स-शोरूम किंमत सुमारे 2.5 लाख रुपये असण्याची अपेक्षा आहे. ही बाईक तामिळनाडूतील वल्लम वडागल येथील रॉयल एनफील्डच्या ईव्ही कारखान्यात तयार केली जाईल. या इलेक्ट्रिक बाईकसाठी थेट स्पर्धा नाही, परंतु लाँच झाल्यानंतर, ही बाईक Ola Roadster Pro आणि Ultraviolette F77 शी स्पर्धा करू शकते.