कोटींची संपत्ती तरी देखील स्वतःची कार नाही ! दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता कोणत्या कारमधून करतात प्रवास?
दिल्लीच्या 2025 मधील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय प्राप्त केला. भाजपने आप आणि काँग्रेसला मागे टाकत सर्वाधिक सीट्स मिळवलेल्या होत्या. या विजयानंतर भाजपच्या दिल्ली कार्यालयात जल्लोषाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांसह अनेक मोठ्या नेत्यांनी हा विजय साजरा केला आणि उत्साहात रंगलेल्या कार्यकमांमध्ये भाजपच्या यशाचे स्वागत केले. या विजयाने दिल्लीतील भाजपला प्रचंड ताकद मिळवली.
२०२५ च्या दिल्ली निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 70 पैकी 48 जागा जिंकल्या. दिल्ली निवडणुकीत भाजपच्या विजयानंतरही मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबतात जास्त बोलले जात नव्हते. त्याच वेळी, 19 फेब्रुवारी, बुधवारी रात्री झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी रेखा गुप्ता यांचे नाव मंजूर करण्यात आले. 20 फेब्रुवारी रोजी रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण तुम्हाला माहिती आहे का दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडे स्वतःची कार नाही. अशावेळी प्रश्न उद्भवतो की जर त्यांच्याकडे स्वतःची कार नाही तर मग त्या कोणाच्या कारने प्रवास करतात?
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्या व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्याकडे 5.3 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. याशिवाय, 1.2 कोटी रुपयांचे लायबिलिटी देखील आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे स्वतःची कार नाही. परंतु, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता यांच्याकडे एक कार आहे, ज्याची किंमत 4.33 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. रेखा गुप्ता यांच्याकडे मारुती XL6 आहे. ही कार त्यांच्या पतीच्या नावावर नोंदणीकृत आहे.
मारुती सुझुकीची ही कार नेक्सा डीलरशिप अंतर्गत येते. सध्या या कारचे 10 कलर व्हेरियंट बाजारात उपलब्ध आहेत. ही मारुती कार K15C स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिनने सुसज्ज आहे, ज्यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्याय दिले आहेत. या कारमधील इंजिन 6,000 आरपीएम वर 75.8 किलोवॅट पॉवर आणि 4,400 आरपीएम वर 136.8 एनएम टॉर्क निर्माण करते.
दिवसभर AC चालू ठेवल्यानंतरही 40 Average देईल तुमची कार! उन्हाळ्यापूर्वी करा 3 कामं
ही मारुती कार मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 20.97 किमी प्रति लिटर आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये 20.27 किमी प्रति लिटर मायलेज देते. ही कार बाजारात सीएनजी मोडमध्ये देखील उपलब्ध आहे. ही मारुती कार CNG मोडमध्ये K15C इंजिनसह 26.32 किमी/किलो मायलेज देण्याचा दावा करते. सध्या या कारची एक्स-शोरूम किंमत 11.71 लाख रुपयांपासून सुरू होते. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू देखील शकते.