फोटो सौजन्य: iStock
भारतात हाय परफॉर्मन्स बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. यातही तरुणांमध्ये Royal Enfield च्या बाईक्सचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. खरंतर कंपनी नेहमीच आपल्या बाईक स्टायलिश दिसण्यासोबतच उत्तम परफॉर्मन्सवर सुद्धा लक्षकेंद्रित करत असतात. तसेच बदलत्या वेळेनुसार ते आपल्या बाईक अपडेट देखील करत असतात. अशीच एक Royal Enfield ची बाईक अपडेट होण्यास सज्ज झाली आहे.
रॉयल एनफील्डने अनेक सेगमेंटमध्ये बाईक ऑफर केल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच Meteor 350 अपडेटसह लाँच करू शकते. त्यात कोणत्या प्रकारचे अपडेट्स पाहायला मिळतील. ही बाईक कधीपर्यंत लाँच केले जाऊ शकते? त्याची सर्व माहिती जाणून घेऊयात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Royal Enfield कंपनी आपल्या 350cc सेगमेंटमधील Meteor 350 ला अपडेट करण्याच्या तयारीत आहे. लाँचपूर्वीच हे मॉडेल डीलरशिपवर दिसले आहे.
रिपोर्ट्सनुसार नव्या Meteor 350 मध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी टर्न इंडिकेटर, निळ्या रंगाचा नवीन पेंट पर्याय, टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि स्लिपर क्लच असे फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय Stellar व्हेरिएंटमधील क्रोम काढून टाकून त्याऐवजी काळ्या रंगाचा वापर करण्यात येऊ शकतो.
निर्मात्यांच्या माहितीनुसार, ही बाईक अपडेट करताना यातील इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. यात सध्याचा 349cc क्षमतेचा सिंगल-सिलेंडर इंजिनच देण्यात येणार आहे. हे इंजिन 20.2 BHP ची पॉवर आणि 27 Nm टॉर्क निर्माण करेल. यासोबत 5-स्पीड ट्रान्समिशन दिले जाईल.
अपडेट दरम्यान मिळणाऱ्या नव्या फीचर्सव्यतिरिक्त या बाईकमध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स, ड्युअल-चॅनेल ABS, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, सेमी-डिजिटल स्पीडोमीटर तसेच 17 आणि 19 इंचांचे अलॉय व्हील्स देण्यात येतील.
रिपोर्ट्सनुसार, बाईक अपडेट करण्यासोबतच याची किंमतही थोडी बदलली जाऊ शकते. याच्या सध्याचे व्हर्जन भारतात 2.08 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. तिच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 2.32 लाख रुपये आहे.
रॉयल एनफील्डची मेटिओर 350 बाईक भारतीय बाजारात 350 सीसी क्षमतेच्या सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. या सेगमेंटमध्ये ती थेट होंडा Honda CB 350, Yezdi Roadster 350 सारख्या बाईकसोबत स्पर्धा करते.