फोटो सौजन्य: iStock
भारतात हाय परफॉर्मन्स बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये उत्तमोत्तम बाईक ऑफर करत आहे. अशीच एक कंपनी म्हणजे Royal Enfield.
रॉयल एन्फिल्डने देशात दमदार बाईक ऑफर केल्या आहेत. अशीच एक लोकप्रिय बाईक म्हणजे Royal Enfield Bullet 350. मात्र, आता चर्चा रंगली आहे की जीएसटी कमी झाल्यानंतर या बाईकची किंमत किती कमी होणार?
केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये सुधारणा केली आहे, ज्यामुळे दिवाळीपूर्वी लोकांना मोठी भेट मिळाली आहे. आता लोकांना कार आणि बाईक खरेदी करणे थोडे सोपे होणार आहे, कारण जीएसटी कपातीनंतर दोन्हीच्या किमती कमी होताना दिसत आहेत.
500 किमी रेंज, 7 एअरबॅग्स आणि ADAS फिचरसह भारतात व्हिएतनामची ‘ही’ इलेक्ट्रिक कार लाँच
नवीन जीएसटी सुधारणांनुसार, 350 सीसी पर्यंतच्या स्कूटर आणि बाईक आता स्वस्त झाल्या आहेत, तर 350 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक महाग होतील. बाईकवरील जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी केला जाईल. हे नवीन जीएसटी दर 22 सप्टेंबरपासून लागू होतील. जर तुम्ही येत्या काळात रॉयल एनफील्ड बुलेट 350 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बाईक तुम्हाला पूर्वीच्या तुलनेत किती स्वस्त मिळेल? त्याबद्दल जाणून घेऊयात.
रॉयल एनफिल्ड बुलेट 350 मध्ये 349cc इंजिन दिलेले आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत ₹1,76,000 आहे. सध्या या बाईकवर 28% GST लागू आहे. जर हा GST 10% ने कमी करण्यात आला, तर ग्राहकांना ही बाईक खरेदी करताना 17,663 रुपयांचा फायदा होऊ शकतो.
बुलेट 350 मध्ये सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, एअर-ऑइल कूल्ड इंजिन बसवले आहे. हे इंजिन 6,100 rpm वर 20.2 bhp पॉवर आणि 4,000 rpm वर 27Nm टॉर्क निर्माण करते. बाईकसोबत 5-स्पीड कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स दिला आहे. ही बाईक सुमारे 35 kmpl मायलेज देते. यामध्ये 13 लिटरची फ्युएल टँक कॅपेसिटी आहे. टाकी फुल केल्यावर ही बाईक जवळपास 450 किमी पर्यंत धावू शकते.
Hyundai Aura ला मिळाले नवीन फीचर्स मिळाले, मात्र किंमतही महागली
ब्रेकिंग सिस्टीममध्ये फ्रंटला डिस्क ब्रेक आणि रिअरला ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. सेफ्टीसाठी यात ABS सिस्टम आहे. मिलिटरी व्हेरिएंटमध्ये सिंगल-चॅनल ABS, तर ब्लॅक गोल्ड व्हेरिएंटमध्ये ड्युअल-चॅनल ABS दिला आहे.