Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield: रॉयल एनफिल्डचा डबल धमाका! या वर्षी लाँच होणार २ नव्या स्क्रॅम्बलर बाइक्स! पाहा कोणत्या असतील या बाईक्स

रॉयल एनफिल्ड कंपनी आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करत दोन नवीन स्क्रॅम्बलर बाइक्स लाँच करण्याची तयारी करत आहे. यामध्ये ४५२ सीसी इंजिन असणारी पेट्रोलवर चालणारी स्क्रॅम ४५० आणि फ्लाइंग फ्ली ब्रँडची आधुनिक S6 ही इलेक्ट्रिक स्क्रॅम्बलर समाविष्ट आहे. या दोन्ही बाइक्स रोजच्या प्रवासासोबतच हलक्या ऑफ-रोडिंगसाठी उत्तम पर्याय ठरतील.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 11, 2026 | 02:32 PM
Royal Enfield: रॉयल एनफिल्डचा डबल धमाका! या वर्षी लाँच होणार २ नव्या स्क्रॅम्बलर बाइक्स! पाहा कोणत्या असतील या बाईक्स
Follow Us
Follow Us:
  • Scram ४५० मध्ये ४५२ सीसीचे दमदार लिक्विड-कुल्ड शेर्पा इंजिन आणि १९-इंच फ्रंट व्हील दिले आहे.
  • फ्लाइंग फ्ली S6 ही प्रगत तंत्रज्ञानाने युक्त ६ रायडिंग मोड्स असलेली इलेक्ट्रिक स्क्रॅम्बलर बाईक आहे.
  • या दोन्ही बाइक्स शहरी प्रवास आणि ऑफ-रोडिंग ट्रेलचा उत्तम अनुभव देण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.

रॉयल एनफिल्ड आपल्या स्क्रॅम्बलर पोर्टफोलिओचा विस्तार करत असून, कंपनी एक नवीन ४५० सीसी पेट्रोल मोटारसायकल आणि ‘फ्लाइंग फ्ली’ या आपल्या नवीन ब्रँडअंतर्गत एक इलेक्ट्रिक स्क्रॅम्बलर बाईक बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. रॉयल एनफिल्डच्या आगामी बाइक्सच्या यादीत अनेक मॉडेल्स रांगेत आहेत, ज्यापैकी या दोन स्क्रॅम्बलर बाइक्स सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहेत. कंपनी ‘स्कॅम ४५०’ वर काम करत आहे, जी गुरिला ४५० आणि हिमालयन ४५० च्या दरम्यानची पोकळी भरेल. तर दुसरीकडे, कंपनीचा केवळ इलेक्ट्रिक वाहनांसाठी असलेला ‘फ्लाइंग फ्ली’ ब्रँड ‘S6 इलेक्ट्रिक स्क्रॅम्बलर’ लाँच करण्याची तयारी करत आहे. बनावटीच्या बाबतीत या दोन्ही बाइक्स एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या असल्या, तरी दैनंदिन वापराच्या रोडस्टर बाईकला एक वर्साटाईल पर्याय म्हणून त्यांची रचना करण्यात आली आहे.

१. Royal Enfield Scram 450

हिमालयनच्या तुलनेत, स्क्रॅम ४५० ही दैनंदिन रस्त्यांवरील प्रवासावर जास्त लक्ष केंद्रित करेल, तसेच खराब रस्ते आणि हलक्या ऑफ-रोडिंग ट्रेलवर चालण्यासाठी सक्षम असेल. भारतात ही बाईक २०२७ मध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्हिल सेटअप व डिझाइन: या बाईकमध्ये पुढे १९-इंच आणि मागे १७-इंचेचे व्हिल सेटअप मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हिमालयनच्या २१-इंचाच्या फ्रंट व्हिलच्या तुलनेत ही चालवण्यासाठी अधिक सोयीस्कर ठरेल. डिझाईनबाबत बोलायचे झाल्यास, यात गोल हेडलॅम्प, स्क्रॅम्बलर-स्टाईल बॉडीवर्क आणि आरामदायक रायडिंग पोझिशन पाहायला मिळेल.

गोव्यातील रॉयल एनफिल्डचा मोटोवर्स फेस्टीव्हल काही असा साजरा केला जातो! पाहा बाईकप्रेमींच्या पर्वणीची काही विहंगम दृश्ये!

सस्पेंशन व इंजिन: या बाईकमध्ये समोर USD फ्रंट फॉर्क्स आणि मागे मोनोशॉक सस्पेंशन दिले जाऊ शकते. यामध्ये हिमालयन ४५० मधीलच ४५२ सीसी, लिक्विड-कुल्ड, सिंगल-सिलेंडर ‘शेर्पा’ इंजिन वापरले जाईल. हिमालयनमध्ये हे इंजिन ४०.०२ एचपी पॉवर आणि ४० एनएम टॉर्क जनरेट करते आणि ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

अंदाजे किंमत: या बाईकची संभाव्य एक्स-शोरूम किंमत ₹२.६ लाख ते ₹२.८ लाख च्या दरम्यान असू शकते.

२. Flying Flea S6 Electric Scrambler

फ्लाइंग फ्ली S6 ही रॉयल एनफिल्डच्या नवीन ‘फ्लाइंग फ्ली’ ब्रँडअंतर्गत येणारी दुसरी इलेक्ट्रिक मोटारसायकल आहे. रस्त्यांसाठी बनवलेल्या C6 मॉडेलपेक्षा वेगळी असणारी S6 ही स्क्रॅम्बलर/एंड्यूरोने प्रेरित डिझाइनसह येते. शहरात चालवण्यासाठी आणि हलक्या ट्रेलवर ऑफ-रोडिंग करण्यासाठी ही विकसित करण्यात आली आहे.

व्हिल व सस्पेंशन: S6 मध्ये पुढे १९-इंच आणि मागे १८-इंच स्पोक व्हिल्स आणि ड्युअल-पर्पज टायर्स मिळतात. तसेच यात USD फ्रंट फॉर्क्स, रिअर मोनोशॉक, मोठी व अरुंद एंड्यूरो-स्टाईल सीट, उत्तम सस्पेंशन ट्रॅव्हल आणि उत्तम ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे.

अ‍ॅडव्हान्स तंत्रज्ञान व फीचर्स: या बाईकमध्ये ६ रायडिंग मोड बायडायरेक्शनल क्रॉल मोड, अ‍ॅडजस्टेबल रीजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांसारखे फीचर्स मिळतात. याशिवाय यात लीन-अँगल सेन्सिंग ABS आणि दोन्ही व्हिल्ससाठी डिफीटेबल ABS सुविधा आहे.

Royal Enfield Motoverse 2026: ‘मोटोव्हर्स २०२६’च्या तारखा जाहीर! हिमालयन ७५०, इंटरसेप्टर ७५० सह अनेक नव्या बाईक्सची प्रतीक्षा!

स्मार्ट कनेक्टिव्हिटी: या बाईकमध्ये ३.५-इंचाची गोल TFT टचस्क्रीन, इन-बिल्ट नॅव्हिगेशन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, की-लेस ऑपरेशन, वायरलेस चार्जिंग आणि क्वालकॉम चिपवर चालणारी इन-हाउस ऑपरेटिंग सिस्टम दिलेली आहे. युजर्स स्मार्टफोन किंवा स्मार्टवॉचचा वापर करून ही बाईक लॉक/अनलोक करू शकतात.

लाँच व उपलब्धता

रॉयल एनफिल्डने फ्लाइंग फ्ली S6 च्या किंमतीबाबत किंवा लाँचच्या निश्चित तारखेबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार ही बाईक २०२६ च्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ही बाईक केवळ संकल्पना नसून पूर्णपणे विकसित केली जात आहे आणि लवकरच उत्पादनासाठी तयार होईल.

Web Title: Royal enfield to launch 2 new scrambler bikes in india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • royal enfield

संबंधित बातम्या

SUV ची क्रेझ असतानाही भारतात MPV मार्केटची मोठी झेप! 4 वर्षांत विक्री जवळपास दुप्पट
1

SUV ची क्रेझ असतानाही भारतात MPV मार्केटची मोठी झेप! 4 वर्षांत विक्री जवळपास दुप्पट

टीव्हीएस Apache RTR 125 LC vs हिरो Xtreme 125R vs बजाज पल्सर 125 vs होंडा CB125 Hornet; कोणती बाईक ठरतेय बेस्ट?
2

टीव्हीएस Apache RTR 125 LC vs हिरो Xtreme 125R vs बजाज पल्सर 125 vs होंडा CB125 Hornet; कोणती बाईक ठरतेय बेस्ट?

यावर्षीच्या भारतातील टॉप 10 EV Brands!  टाटा पहिल्या क्रमांकावर, महिंद्राची मोठी झेप; MGला टाकले मागे!
3

यावर्षीच्या भारतातील टॉप 10 EV Brands!  टाटा पहिल्या क्रमांकावर, महिंद्राची मोठी झेप; MGला टाकले मागे!

टीव्हीएस अपाचे RR 310 ची इटलीत ऐतिहासिक एन्ट्री! मिसानो रेसिंग ट्रॅकवर भारतीय रायडर्सचा जलवा
4

टीव्हीएस अपाचे RR 310 ची इटलीत ऐतिहासिक एन्ट्री! मिसानो रेसिंग ट्रॅकवर भारतीय रायडर्सचा जलवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.