फोटो सौजन्य: iStock
पूर्वी रस्त्यांवर आपल्याला फक्त इंधनावर चालणारी वाहनं जास्त प्रमाणात बघायला मिळायची. मात्र, आज ही स्थिती पूर्णपणे बदलेली आहे. बदलत्या काळानुसार मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहन दाखल झाली आहेत. आधी इलेक्ट्रिक कार आल्या आणि आता इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर लाँच होत आहे. आता मात्र टेक्नॉलजी झपाट्याने वाढते आहे.
आतापर्यंत आपण पेट्रोल, डिझेल किंवा लिथियम बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटरबद्दल ऐकले असेलच, पण आता येणाऱ्या काळात “मीठावर चालणाऱ्या स्कूटर” देखील रस्त्यावर धावताना दिसण्याची शक्यता आहे. सोडियम-आयन बॅटरी टेक्नॉलजीवर आधारित हे स्कूटर आता चीनच्या रस्त्यांवर दिसू लागले आहेत. खरंतर, त्यात वापरले जाणारे सोडियम समुद्री मीठापासून निर्माण केले जाते, जे केवळ स्वस्तच नाही तर मोठ्या प्रमाणात उपलब्ध देखील आहे.
FADA Report 2025: भारत-पाकिस्तान युद्धामुळे पॅसेंजर व्हेईकलची विक्री गडबडली
नॉर्मल इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सहसा लिथियम-आयन किंवा लीड-अॅसिड बॅटरी वापरल्या जातात, परंतु नवीन तंत्रज्ञानाच्या स्कूटरमध्ये सोडियम आयन बॅटरी बसवल्या जात आहेत, ज्या समुद्री मीठापासून तयार केल्या जातात. हे बॅटरी तंत्रज्ञान लिथियमपेक्षा अधिक सुलभ असून पर्यावरणासाठी देखील सुरक्षित मानले जाते. सोडियम बॅटरीची किंमत लिथियम बॅटरीपेक्षा कमी आहे आणि त्या खूप जलद चार्ज केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, त्या फक्त 15 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज केल्या जाऊ शकतात. या नवीन तंत्रज्ञानामुळे, स्कूटरची किंमत खूपच कमी आहे, जी चीनमध्ये 35,000 ते 51,000 रुपये (अंदाजे 400 ते 660 अमेरिकन डॉलर्स) दरम्यान विकल्या जात आहेत.
चीनमधील हांगझोऊ शहरातील एका शॉपिंग मॉलच्या बाहेर या मिठावर चालणाऱ्या स्कूटरचे पहिले सार्वजनिक प्रदर्शन करण्यात आले. या प्रसंगी, विशेषतः डिझाइन केलेले चार्जिंग स्टेशन देखील उभारण्यात आले होते, जिथे या स्कूटरची बॅटरी फक्त 15 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज केली गेली. या लाईव्ह डेमोने सिद्ध केले की सोडियम बॅटरी टेक्नॉलॉजी केवळ व्यावहारिकच नाही तर सामान्य वापरासाठी पूर्णपणे सक्षम आहे.
आजच्या काळात, जेव्हा जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाटयाने वाढत आहे. अशावेळी लिथियमची मर्यादित उपलब्धता आणि जास्त किंमत ही एक मोठी चिंता बनली आहे. याशिवाय, लिथियम खाणकाम देखील पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे. याउलट, सोडियम हा एक स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे, ज्यामुळे हे तंत्रज्ञान अधिक टिकाऊ बनते.
तुमची Auto Rickshaw राहील एकदम टकाटक, फक्त ‘या’ 5 गोष्टींकडे लक्ष द्या
सध्या, भारतात सोडियम बॅटरीवरील संशोधन सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मात्र, Hero Electric, Ather आणि Ola सारख्या सरकारी आणि खाजगी कंपन्या आता पर्यायी बॅटरी तंत्रज्ञानाकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत. हे तंत्रज्ञान भारतात व्यावसायिकरित्या उपलब्ध होताच, त्याचे अनेक मोठे फायदे होऊ शकतात.