फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केट हे नेहमीच विविध सेगमेंटमधील वाहनांसाठी महत्वाची बाजारपेठ ठरली आहे. दिवसेंदिवस ऑटो कंपन्या मार्केटमध्ये उत्तम फीचर्स असणारी वाहनं लाँच करत आहे. मात्र, नुकताच फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन म्हणजे फाडाने एक रिपोर्ट सादर केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने मे 2025 साठी वाहन विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या सीमा तणाव आणि संघर्षामुळे, अनेक राज्यांमधील ग्राहकांनी वाहने खरेदी करण्याचा निर्णय पुढे ढकलला, ज्यामुळे पॅसेंजर व्हेईकलच्या किरकोळ विक्रीत 3% घट झाली.
FADA अहवालानुसार, मे 2025 मध्ये पॅसेंजर व्हेईकलच्या एकूण किरकोळ विक्री 3,02,214 युनिट्स होती, तर मे 2024 मध्ये ही संख्या 3,11,908 युनिट्स होती.
TVS कडून 450cc इंजिन असणाऱ्या बाईकवर काम सुरु, केव्हा होईल लाँच?
या 3% कमी विक्रीच्या मागे अनेक कारणे जबाबदार मानली जात आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील सीमा तणाव आणि लष्करी संघर्ष हे सर्वात मोठे कारण मानले जात आहे, ज्यामुळे पंजाब, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि गुजरात सारख्या राज्यांमधील ग्राहकांनी वाहन खरेदी करण्यास विलंब केला.
याशिवाय, एंट्री-लेव्हल मॉडेल्स म्हणजेच लो सेगमेंट कारच्या मागणीत घट झाली कारण त्यांना मर्यादित फायनान्स पर्याय आणि कमकुवत ग्राहक भावनांचा सर्वाधिक फटका बसला. आर्थिक अनिश्चिततेमुळे ग्राहकांनी, विशेषतः कमी उत्पन्न गटातील लोकांनी, खरेदी पुढे ढकलली. परंतु, FADA ने असेही स्पष्ट केले की बुकिंग चांगली होती, मात्र, डिलिव्हरी जाणूनबुजून पुढे ढकलण्यात आल्या.
या घसरणीदरम्यान दुचाकी वाहनांच्या विक्रीत चांगली वाढ झाली. मे 2025 मध्ये दुचाकी वाहनांची किरकोळ विक्री 7% वाढून 16,52,637 युनिट्स झाली, जी मे 2024 मध्ये 15,40,077 युनिट्स होती. या वाढीमागे अनेक सकारात्मक कारणे होती, जसे की लग्नाच्या अधिक तारखा, मजबूत रब्बी पीक आणि मान्सूनपूर्व ग्रामीण मागणी.
टाटा मोटर्सकडून मान्सून चेक-अप कॅम्प सुरु, ग्राहकांना फ्रीमध्ये मिळणार ‘हे’ फायदे
मे 2025 मध्ये व्यावसायिक वाहनांची किरकोळ विक्री 4% ने घटून 75,615 युनिट्सवर आली. यामागील मुख्य कारणे म्हणजे फायनान्स होण्यास होणारा विलंब आणि कमोडिटी आणि वाहतूक संबंधित व्यवसायांमध्ये मंदी. ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स आणि वाहतूक कंपन्यांच्या एक्टिव्हिटीज मर्यादित असताना ही परिस्थिती दिसून आली.
तीन चाकी वाहनांनी चांगली ताकद दाखवली. मे 2025 मध्ये तीन चाकी वाहनांची नोंदणी 6% ने वाढून 1,04,448 युनिट्सवर पोहोचली. बस विक्रीतही काही प्रमाणात दिलासा मिळाला, ज्यामुळे हा विभाग स्थिर राहिला.