फोटो सौजन्य: istock
महाराष्ट्रातील प्रत्येक भागात रिक्षांचा वापर मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, कारसारखेच ऑटो रिक्षाला सुद्धा मेंटेन करावे लागते. प्रत्येक भागात ऑटो रिक्षा प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहेत. पियाजिओ, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, आणि टीव्हीएस सारख्या कंपन्या त्यांच्या तीन चाकी गाड्या भारतीय मार्केटमध्ये विकत आहेत. या वाहनांसाठी चांगली पॉवरट्रेन कामगिरी असणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा, रिक्षा बिघडण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे ती चालवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हीच बाब लक्षात घेत, आज आपण ऑटो रिक्षाला टकाटक ठेवण्यासाठी 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत.
ऑटो रिक्षाची डिपस्टिक काढून तुम्ही इंजिन ऑइलचे लेव्हल तपासले पाहिजे. जर इंधन त्याच्या लेव्हलपेक्षा कमी असेल तर ते ताबडतोब टॉप अप करा. जर रिक्षाचे ऑइल बदलण्याची वेळ आली तर संपूर्ण इंजिन ऑइल बदलणे आवश्यक आहे. जर तुम्ही इंजिन ऑइल बदलले नाही तर ते घट्ट होऊ शकते आणि गाळात बदलू शकते. परिणामी इंजिनला नुकसान होऊ शकते. इंजिन ऑइल इंजिनमधून उष्णता काढून टाकते.
AI च्या मदतीने बनवलेला New Maruti Wagonr चा अफलातून फोटो होतोय व्हायरल
कुठेही जाण्यापूर्वी रिक्षाच्या टायर्समधील हवेचा प्रेशर नेहमी तपासा कारण त्यामुळे तुमच्या टायर्सचे आयुष्य वाढते. कमी हवेचा प्रेशर घर्षण आणि रोलिंग प्रतिरोध वाढवतो, ज्यामुळे टायर्स लवकर खराब होतात. तुमच्या टायर्सचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि महागडे बदल टाळण्यासाठी नियमितपणे हवेचा प्रेशर तपासणे चांगले.
ऑटो रिक्षाची ब्रेकिंग सिस्टीम तपासणे खूप महत्वाचे आहे. ब्रेक पॅड, ब्रेक लाइनर आणि संपूर्ण सिस्टीम नियमितपणे तपासावी लागते, जेणेकरून ब्रेकचे आयुष्य आणि परफॉर्मन्स पूर्वीपेक्षा चांगले राहते.
ऑटो रिक्षाच्या लॉन्ग लाइफसाठी, तुम्ही ती जास्त वेगाने चालवणे टाळावे. जर तुम्ही सकाळी पहिल्यांदाच रिक्षा सुरू करत असाल, तर ती सुरू केल्यानंतर, इंजिन गरम होण्यासाठी काही वेळ द्या. सुरुवातीला, काही काळासाठी 35 किमी प्रति तास वेगाने रिक्षा चालवा. यानंतर, हळूहळू वेग वाढवा, जेणेकरून इंजिन आणि ट्रान्समिशन पार्ट बराच काळ काम करू शकतील.
‘या’ कारच्या समोर सगळ्याच कार फेल ! फुल्ल टॅंकमध्ये मिळेल 1000 ची रेंज, विक्रीतही दमदार वाढ
तुमची ऑटो दररोज स्वच्छ करा. यामुळे त्याचे पार्टस स्वच्छ राहतील आणि ते व्यवस्थित काम करेल. रिक्षाच्या खालच्या बाजूने घाण, धूळ आणि गंज निर्माण करणाऱ्या गोष्टी स्वच्छ करा, यामुळे रिक्षाचे आयुष्य वाढेल.