iphone, second hand car,
नुकताच iPhone 17 लाँच झाला आहे. त्यामुळे सगळीकडेच या नव्या आयफोनची चर्चा पाहायला मिळत आहे. भारतात देखील Apple iPhone 17 ची किंमत जाहीर करण्यात आली आहे. फ्लॅगशिप iPhone 17 Pro Max ची किंमत 1,49,900 लाख रुपये (256 GB) आहे आणि 2 TB असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 2,29,900 रुपये आहे. इतका महाग फोन असून देखील अनेक जण हा फोन खरेदी करण्याच्या तयारीत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की इतक्या पैशात तुम्ही सेकंड-हँड कार खरेदी करू शकता. चला जाणून घेऊयात या महागड्या किमतीत कोणत्या सेकंड हॅन्ड कार येतात.
किलेस एंट्री, 9 इंच टचस्क्रीन आणि सोबतीला बॅक कॅमेरा! GST कपातीनंतर 76 हजारांनी स्वस्त झाली ‘ही’ कार
होंडा जॅझ ही भारतातील पहिली प्रीमियम हॅचबॅक कार होती, जी 2009 मध्ये पहिल्यांदा लाँच करण्यात आली होती. ती तिच्या स्पोर्टी डिझाइन, आलिशान केबिन, चांगले इंजिन आणि परफॉर्मन्ससाठी ओळखली जात होती. या हॅचबॅक कारला एक अनोखी मॅजिक सीट देण्यात आली होती, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार मागील सीट वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनमध्ये फोल्ड करता येत होत्या. त्यावेळी, जॅझला 120 पीएस 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले होते आणि नंतर त्यात एक लहान 90 पीएस 1.2-लिटर पेट्रोल इंजिन पर्याय जोडण्यात आला होता. 2010-2012 होंडा जॅझ मॉडेल या कारची किंमत 1.5 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत आहे.
फॉक्सवैगन वेंटो ही कार-प्रेमींच्या खास पसंतीची गाडी होती, जिची नेहमीच प्रशंसा होत असे. त्या काळात Volkswagen ने यात 1.6-लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा पर्याय दिला होता. दोन्ही इंजिन्स 105 PS ची ताकद देत असत. जर तुम्ही iPhone 17 Pro Max घेण्याऐवजी ही जुनी Vento घेतली, तर तुम्हाला याचा अजिबात पश्चाताप होणार नाही. ही कार तुम्हाला सुमारे 2 लाख ते 2.5 लाख रुपयांमध्ये मिळू शकते.
जर तुम्हाला sedan सारखी stability आणि परफॉर्मन्स आवडत असेल, तर iPhone च्या पैशात second-hand Honda City घेणे फायदेशीर ठरेल. त्या काळात City च्या rev-happy i-VTEC पेट्रोल इंजिनमधून 118 PS ची ताकद आणि 146 Nm टॉर्क मिळत असे. जरी सध्याच्या City मध्ये कम्फर्टला प्राधान्य दिले गेले आहे, तरी जुन्या काळातील City ही तिच्या शार्प डिझाइन, स्पोर्टी राइड आणि उत्तम हँडलिंगसाठी ओळखली जात असे. हा मॉडेल 2011-2012 मधील आहे. ही कार तुम्हाला 2 लाख ते 2.5 लाख रुपयांमध्ये मिळू शकते.
आयफोनच्या टॉप मॉडेलऐवजी, तुम्ही भारतातील सर्वात लोकप्रिय हॅचबॅक कार मारुती स्विफ्ट खरेदी करू शकता. आजही स्विफ्ट त्याच्या स्पोर्टी लूक आणि राईड, हँडलिंगसाठी ओळखली जात होती. ती 87 पीएस पॉवर 1.2-लिटर पेट्रोल इंजिनसह येते. त्या काळात स्विफ्टला अधिक लोकप्रिय 75 पीएस 1.3-लिटर डिझेल इंजिन देखील देण्यात आले होते. ही कार तुम्हाला 1.8 लाख ते 2.5 लाख रुपयांना मिळेल. आतापर्यंत ही कार 50,000 ते 1 लाख किलोमीटर धावली आहे.