फोटो सौजन्य: iStock
सध्या सणासुदीचा काळ चालू झाला आहे. या काळात अनेक जण नवीन बाईक किंवा कार घेताना दिसतात. म्हणूनच अनेक ऑटो कंपनीज या काळात आपल्या वाहनांवर आकर्षक सूट देत असतात. पण ज्याप्रमाणे अनेक जण नवीन कार विकत घेत असतात, त्याप्रमाणेच अनके कारमालक आपली जुनी कार विकायला काढतात. जर तुम्ही सुद्धा जुनी विकण्याच्या तयारीत आहात तर अनेकदा प्रश्न पडतो की कारची रिसेल व्हॅल्यू कशी वाढेल. म्हणूनच आज आपण अशा 5 कामांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या कारची रिसेल व्हॅल्यू नक्कीच वाढेल.
योग्य वेळी कारची सर्व्हिसिंग केल्याने केवळ तिचे परफॉर्मन्स सुधारत नाही तर रिसेल व्हॅल्यू सुद्धा वाढण्यात मदत होते. कारच्या नियमित सर्व्हिसिंग आणि देखभालीमध्ये ऑइल बदलणे, आवश्यक फ्लुइड रिफिल करणे, टायर रोटेशन, ब्रेक बदलणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. जेव्हा ते योग्यरित्या कार्य करतात तेव्हा कार सुरळीत चालते आणि चांगले रिसेल व्हॅल्यू देखील मिळते.
कार योग्य वेळी सर्व्हिसिंगसाठी नेण्यासोबतच तिची सर्व्हिस हिस्ट्रीही जपायला हवे. यामुळे विक्रीच्या वेळी कारचे रिसेल व्हॅल्यू वाढण्यास मदत होते. हे तुम्हाला तुमच्या कारचे सर्व्हिस शेड्युल राखण्यात देखील मदत करते.
हे देखील वाचा: ‘ही’ 6 लाखांची एसयूव्ही खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड, जाणून घ्या फीचर्स
कार नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. यामुळे कार केवळ चांगली दिसत नाही तर तिची रिसेल व्हॅल्यू देखील वाढते. स्वच्छ कारची किंमत नेहमीच गलिच्छ कारपेक्षा जास्त असते. तुमची कार स्वच्छ ठेवण्यासाठी, ती वेळोवेळी धुवा.
कारची रिसेल व्हॅल्यू वाढवण्यासाठी कोणतेही किरकोळ नुकसान किंवा स्क्रॅच दुरुस्त करा. तुमच्या कारवर काही लहान स्क्रॅच किंवा डेंट असल्यास, ती विकण्यापूर्वी दुरुस्त करून घ्या. खराब झालेले टायर किंवा ब्रेक नवीन टायरने बदलण्याने कारची रिसेल व्हॅल्यू वाढते.
जुन्या कारमध्ये आजची मॉडर्न फीचर्स जोडल्यास कारला नवा लुक मिळतो. हे देखील खरेदीदारांना आकर्षित करते. यामध्ये तुम्ही ब्लूटूथ ऑडिओ सिस्टीम इन्स्टॉल, रिअर-व्ह्यू कॅमेरा किंवा टचस्क्रीन सिस्टीम इन्स्टॉल करू शकता.