Shah Rukh Khan And Gauri Khan Buys New Mercedes Benz V Class To Show Up More Luxury And Spacious Van See Feature Marathi News
King Khan ने आपल्या ‘क्वीन’ साठी खरेदी केली Mercedes ची नवी आलिशान वॅन, फिचर्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
बॉलिवूडचा किंग खान नेहमीआलिशान गोष्टींसाठी चांगलाच चर्चेत असतो. आलिशान शब्द आला म्हणजे तिथे गाड्यांच्या चर्चा तर होणारच ना! शाहरुख खानच्या ताफ्यात बरीच आलिशान गाड्या आहेत. आता या ताफ्यात अशा एका नावाचा समावेश झाला आहे.
Mercedes-Benz V-Class ही शाहरुख खानने नुकतीच खरेदी केली
दीड कोटींपेक्षा जास्त महागडी कार
किंग खानच्या नव्या लक्झरी व्हॅनमधले फीचर्स
Shah Rukh Khan Buys new Mercedes Benz V Class: बॉलिवूडचा किंग खान नेहमी त्याच्या आलिशान गोष्टींसाठी चांगलाच चर्चेत असतो. आलिशान शब्द आला म्हणजे तिथे गाड्यांच्या चर्चा तर होणारच ना! शाहरुख खानच्या ताफ्यात बरीच आलिशान गाड्या आहेत. आता या ताफ्यात अशा एका नावाचा समावेश झाला आहे, ज्याची त्यांची पत्नी गौरी खान बऱ्याच काळापासून चाहती आहे. ती या गाडीची बऱ्याच काळापासून वाट पाहत आहे. अलीकडेच या लक्झरी कारच्या लाँचिंगच्या कार्यक्रमाला गौरी खान उपस्थित होती. Mercedes-Benz V-Class ही शाहरुख खानने नुकतीच खरेदी केली आहे. ही लक्झरी व्हॅन शाहरुख आणि गौरी यांच्यासाठी एका ‘प्रायव्हेट सूट’प्रमाणे काम करणार आहे. काय आहे या लक्झरीयस कारमध्ये खास ?
शाहरुख आणि गौरी खान यांनी ओब्सिडियन ब्लॅक रंगाची चमकणारी नवीन Mercedes-Benz V-Class कार खरेदी केली आहे. त्यांना त्यांच्या गरजेनुसार यात बरेच बदल करुन घेतले आहेत. ज्यामुळे या लक्झरी व्हॅनची किंमत दीड कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. अलीकडेच क्रिकेटर हार्दिक पांड्याने सुद्धा आपल्या गर्लफ्रेंड महीका शर्माला देखील ही लक्झरी व्हॅन खरेदी करुन दिली होती. त्या कारचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर किंग खानने खरेदी केल्याने ही नवीन व्हॅन त्याच्या घराच्या परिसरात दिसली आहे.
किंग खानच्या नव्या लक्झरी व्हॅनमधले फीचर्स
शाहरुखच्या या नवीनMercedes-Benz V-Class च्या फिचर्सबाबत बोलायचं तर याचं इंजिन पॉवरफूल आहे. यामध्ये २.० लीटरचे टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जे २३१ PS पॉवर आणि ३७० Nm टॉर्क जनरेट करते. तसंच यामध्ये ९G-ट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशनही देण्यात आलं आहे. याच्या डिझाइनमध्ये काही खास गोष्ट आहे. बिझनेस मीटिंग आणि फॅमिली टूरिंगसाठी हा एक उत्तम पर्याय म्हणून या car कडे पाहिलं जात आहे. ही व्हॅन ५.४ मीटर लांब असून यामध्ये ६-सीटर लेआउट मिळतो. ही कार आधुनिक फीचर्सनेही सुसज्ज आहे. यामध्ये १९ इंची डायमंड कट अलॉय व्हील्स, प्रीमियम इंटिरिअर, मसाज सुविधेसह व्हेंटिलेटेड सीट्स, लुगानो लेदर अपहोल्स्ट्री, इन्फोटेनमेंटसाठी १२.३ इंची स्क्रीन, प्रीमियम साउंड सिस्टम, ३६० डिग्री कॅमेरा आणि ‘लेव्हल २’ ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सारखी प्रगत फीचर्स यात दिली गेली आहेत.
शाहरुख खानचे लक्झरी कार कलेक्शन
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या शाहरुख खानकडे एकापेक्षा एक सरस आलिशान गाड्या आहेत. त्याच्या कलेक्शनमध्ये १२ कोटींची Bugatti Veyron, ११ कोटींची Rolls Royce Cullinan, याशिवाय बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, बीएमडब्ल्यू i8, मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, रेंज रोव्हर वोग बीएमडब्ल्यू ७ सिरीज आणि टोयोटा लँड क्रूझर यांसारख्या अत्यंत महागड्या गाड्यांचा समावेश आहे.