Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skoda Kushaq Facelift लाँच! जाणून घ्या किंमत आणि अन्य व्हेरिएंट्सची किंमत

Skoda Kushaq ही मार्केटमधील एक लोकप्रय एसयूव्ही आहे. नुकतेच, या कारचे Facelift व्हर्जन लाँच झाले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 21, 2026 | 06:28 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Skoda Kushaq चा Facelift व्हर्जन लाँच
  • किंमत 10.69 लाख रुपये (एक्स-शोरूम)
  • जाणून घ्या फीचर्स
Skoda Auto ने आपली लोकप्रिय SUV Skoda Kushaq चे फेसलिफ्ट मॉडेल भारतात लाँच केली आहे. या नव्या मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.69 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या फेसलिफ्टमध्ये मेकॅनिकल बदल करण्यात आलेले नाहीत, मात्र 1-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसोबत नवीन ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

एक्सटिरिअर डिझाइन

2021 मध्ये लाँच झाल्यापासून Kushaq आपल्या स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. फेसलिफ्ट मॉडेलमध्ये कारचा फ्रंट लूक अधिक मॉडर्न करण्यात आला आहे. आता यात स्लिम हेडलॅम्प्स मिळतात ज्यामध्ये DRL सिग्नेचर आहे. याशिवाय ग्लॉस ब्लॅक ग्रिलवर LED लाइट बार देण्यात आला आहे, जो दोन्ही हेडलाइट्सना जोडतो.

बाईकवरून पडण्याच्या भीतीला टाटा बाय बाय करा! ‘या’ देशात लाँच झाली जगातील पहिली सेल्फ बॅलन्सिंग बाईक

साइड लूक

साइड प्रोफाइलमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. कारचा आकार आणि साइज पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आला आहे. वर सिल्व्हर रूफ रेल्स आणि खाली ब्लॅक बॉडी क्लॅडिंग देण्यात आली आहे, ज्यामुळे SUV ला दमदार लूक मिळतो. मात्र, आता 17-इंचचे नवीन डिझाइन असलेले अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, जे अधिक स्पोर्टी आणि आकर्षक दिसतात.

कलर ऑप्शन्स

नवीन Kushaq फेसलिफ्टमध्ये एकूण 8 कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. यामध्ये शिमला ग्रीन, चेरी रेड आणि स्टील ग्रे हे 3 नवीन रंग समाविष्ट करण्यात आले आहेत. याशिवाय लावा ब्लू, कँडी व्हाइट, ब्रिलियंट सिल्व्हर, डीप ब्लॅक आणि कार्बन स्टील हे पर्यायही उपलब्ध आहेत. काही कलर्समध्ये ड्युअल-टोन पर्याय मिळतो, ज्यात कारची छत ब्लॅक रंगात असते.

इंटीरियर आणि केबिन

इंटीरियर डिझाइनमध्ये मोठे बदल नसले तरी क्वालिटी अधिक सुधारण्यात आली आहे. यात ब्लॅक आणि बेज रंगाचा ड्युअल-टोन इंटीरियर देण्यात आला आहे. केबिन लेआउट पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले असून सर्व कंट्रोल्स आणि बटण्स त्याच ठिकाणी आहेत.

10 लाखांच्या बजेटमध्ये ‘तुफान’ मायलेज! ‘या’ Automatic SUVs चा दराराच वेगळा, परफॉर्मन्स तर एकदमच भारी

कारमध्ये टू-स्पोक स्टीयरिंग व्हील क्रोम फिनिशसह देण्यात आले आहे. सीट्सवर रेड स्टिचिंग आहे आणि डॅशबोर्ड तसेच दरवाजांवर Nashik Red Matte फिनिश दिली आहे. इतर व्हेरिएंट्समध्ये ब्लॅक-बेज इंटीरियरसोबत डार्क सिल्व्हर मॅट फिनिश मिळते. या मॉडेलमध्ये आता पॅनोरमिक सनरूफ देण्यात आली आहे, जी केबिनला अधिक प्रीमियम आणि प्रशस्त फील देते.

फीचर्स आणि सेफ्टी

या SUV मध्ये पॅनोरमिक सनरूफ, मसाज फंक्शन असलेल्या सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग, 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले (टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह) आणि AI असिस्टंटसह 10.1-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे.

सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स, ESC, ऑल-व्हील डिस्क ब्रेक (फक्त 1.5-लिटर इंजिनसाठी), हिल होल्ड असिस्ट, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स, रिअर व्ह्यू कॅमेरा आणि TPMS यांचा समावेश आहे.

किंमत

  • Skoda Kushaq चे विविध व्हेरिएंट्स आणि इंजिन ऑप्शन्सनुसार किंमती वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत.
  • Classic+ व्हेरिएंटसाठी 1-लिटर TSI टर्बो पेट्रोल इंजिनची किंमत 10.69 लाख रुपये असून 1.5-लिटर TSI टर्बो पेट्रोलसाठी 12.69 लाख रुपये आहे.
  • Signature व्हेरिएंट 1-लिटर इंजिनसह 14.59 लाख रुपये आणि 1.5-लिटर इंजिनसह 15.59 लाख रुपये आहे.
  • Sportline व्हेरिएंटची किंमत 1-लिटर इंजिनसाठी 14.74 लाख रुपये आणि 1.5-लिटर इंजिनसाठी 15.74 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
  • Prestige व्हेरिएंटमध्ये 1-लिटर इंजिनसाठी 16.79 लाख रुपये, 1.5-लिटरसाठी 17.59 लाख रुपये आणि DCT गिअरबॉक्ससह 18.79 लाख रुपये किंमत आहे.
  • Monte Carlo व्हेरिएंट फक्त 1.5-लिटर इंजिनसह उपलब्ध असून त्याची किंमत 17.89 लाख रुपये आहे, तर DCT गिअरबॉक्ससह त्याची किंमत 18.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Web Title: Skoda kushaq facelift launched with price of 10 lakh 69 thousand rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • automobile
  • Skoda Auto
  • SUV

संबंधित बातम्या

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
1

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
2

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर
3

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV
4

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.