Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skoda Octavia: स्कोडा ऑक्टाव्हिया RS ची दुसरी बॅच भारतासाठी जाहीर! लवकरच होणार लाँच! पाहा काय असतील स्पेशल फीचर्स

भारतीय कारप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेली एक लोकप्रिय स्पोर्ट्स सेडान पुन्हा एकदा नवीन अवतारात धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे. अवघ्या काही मिनिटांत विक्रीचा विक्रम मोडणाऱ्या या दमदार कारच्या खरेदीसाठी ग्राहकांना का मोठी चढाओढ करावी लागणार आहे, याचा सस्पेन्स वाढला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 19, 2026 | 02:03 PM
Skoda Octavia: स्कोडा ऑक्टाव्हिया RS ची दुसरी बॅच भारतासाठी जाहीर! लवकरच होणार लाँच! पाहा काय असतील स्पेशल फीचर्स
Follow Us
Follow Us:
  • स्कोडा ऑक्टाव्हिया RS ची दुसरी तुकडी भारतात लवकरच दाखल होणार असून फक्त ५० गाड्या विक्रीसाठी उपलब्ध असतील.
  • २.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असलेली ही स्पोर्ट्स कार अवघ्या ६.४ सेकंदात १०० किमी प्रतितास वेग धरते.
  • सणासुदीच्या काळात या आलिशान सेडानचे बुकिंग व डिलिव्हरी सुरू होणार असल्याने कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे.

भारतातील कारप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘स्कोडा ऑक्टाव्हिया RS’ पुन्हा एकदा भारतीय रस्त्यांवर धुमाकूळ घालण्यासाठी अगदी सज्ज झाली आहे. स्कोडाने या लोकप्रिय परफॉर्मन्स सेडानच्या दुसऱ्या तुकडीची ऑफीशल घोषणा केली आहे. पण, यावेळी ही कार खरेदी करण्यासाठी तुफान स्पर्धा बघायला मिळणार आहे, कारण कंपनी या तुकडीत फक्त ५० गाड्याच विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे- पहिल्या तुकडीच्या तुलनेत ही संख्या निम्मीच आहे.थोडक्यात पाहायला गेले तर हे एका पद्धतीचे लिमिटेड एडिशनच आहे.

गेल्या वर्षी स्कोडाने भारतात २५ वर्षे पूर्ण केल्याच्या प्रीत्यर्थ ही कार CBU मार्गाने आयात करून लाँच केली गेली होती. ₹४९.९९ लाख एक्स-शोरूम या किमतीत आलेल्या पहिल्या तुकडीतील १०० गाड्या बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत बुक झाल्या होत्या!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

इंजिन आणि क्रेझी परफॉर्मन्स

या स्पोर्ट्स सेडानमध्ये २.०-लिटर TSI टर्बो पेट्रोल इंजिन पाहायला मिळते, जे २६५ PS ची पॉवर आणि ३७० Nm चा टॉर्क जनरेट करते. ही कार फक्त ६.४ सेकंदात ० ते १०० किमी/तास वेग पकडू शकते, तर तिचा टॉप स्पीड २५० किमी/तास आहे. यात स्पोर्ट्स सस्पेंशन, प्रोग्रेसिव्ह स्टेअरिंग आणि १९-इंचाचे ‘एलिआस अँथ्रासाइट’ अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

आकर्षक लुक आणि रंगांचे पर्याय

ऑक्टाव्हिया RS ला स्पोर्टी लुक देण्यासाठी ग्लॉसी ब्लॅक एलिमेंट्स, फुल-LED मॅट्रिक्स हेडलाइट्स आणि डायनॅमिक इंडिकेटर्ससह LED टेललाइट्स दिल्या आहेत. ही कार मांबा ग्रीन, कँडी व्हाईट, रेस ब्लू, मॅजिक ब्लॅक आणि व्हेलव्हेट रेड या ५ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. यात ६०० लिटरची मोठी डिग्गी मिळते, जी १५५५ लिटरपर्यंत वाढवता येते.

Skoda Epiq ची ग्लोबल एंट्री! मिळणार दमदार रेंज, ADAS आणि प्रीमियम फीचर्स… जाणून घ्या किंमत

प्रीमियम फीचर्स आणि इंटीरियर

  • केबिन: सुएडिया आणि लेदर अपहोल्स्ट्री, रेड कॉन्ट्रास्ट स्टिचिंग आणि स्पोर्टी सीट्स.
  • आरामदायी फीचर्स: फ्रंट सीट्ससाठी मेमरी, हिटींग आणि मसाज फंक्शन.
  • तंत्रज्ञान: ३२.७७ सेमीची मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन (वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले), डिजिटल व्हर्च्युअल कॉकपीट आणि हेड-अप डिस्प्ले.
  • साउंड सिस्टीम: ११-स्पीकरची कॅन्टन प्रीमियम ऑडिओ सिस्टीम.
  • इतर: थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग आणि ॲम्बियंट लायटिंग.
सेफ्टी फीचर्स

सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता यात १० एअरबॅग्स, ३६०-डिग्री कॅमेरा, ISOFIX माउंट्स आणि प्रगत ADAS तंत्रज्ञान दिले आहे. यामध्ये ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन असिस्ट, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग आणि इंटेलिजेंट पार्क असिस्ट यांसारख्या आधुनिक फीचर्सचा समावेश आहे.

कधी सुरू होणार डिलिव्हरी?

स्कोडाने स्लाव्हियाच्या फेसलिफ्ट मॉडेलच्या लाँचदरम्यान ऑक्टाव्हिया RS च्या या दुसऱ्या तुकडीची माहिती दिली. येणाऱ्या सणासुदीच्या काळात या कारचे बुकिंग आणि डिलिव्हरी सुरू होणार आहे. जर तुम्हाला ही भन्नाट कार आपल्या गॅरेजमध्ये उभी करायची असेल, तर बुकिंगसाठी सज्ज राहा आणि कंपनी वेबसाईटवर लक्ष देऊन ठेवा!

Web Title: Skoda octavia rs second batch india launch auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Skoda

संबंधित बातम्या

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स
1

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
2

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये
3

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट
4

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.