Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield Flying Flea S6 Electric Scrambler सादर! 2027 मध्ये भारतात होणार लाँच, ऑफ-रोडिंगसाठी मिळणार खास फीचर्स

रॉयल एनफिल्डने Flying Flea S6 Electric Scrambler सादर केली असून 2027 च्या सुरुवातीला भारतात लाँच होणार आहे. गोल टचस्क्रीन, खास ऑफ-रोड मोड आणि स्क्रॅम्बलर डिझाइन असलेली ही इलेक्ट्रिक बाइक किती रेंज देणार?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 04, 2026 | 03:43 PM
Royal Enfield Flying Flea S6 Electric Scrambler सादर! 2027 मध्ये भारतात होणार लाँच, ऑफ-रोडिंगसाठी मिळणार खास फीचर्स
Follow Us
Follow Us:
  • रॉयल एनफिल्ड Flying Flea S6 Electric Scrambler 2027 च्या सुरुवातीला भारतासह जागतिक मार्केटमध्ये लाँच होणार आहे.
  • या इलेक्ट्रिक स्क्रॅम्बलरमध्ये गोल टचस्क्रीन, Fleaware.OS, ऑफ-रोड मोड आणि ब्लॉक-पॅटर्न टायर्स मिळणार आहेत.
  • Dart Yellow आणि Lightning Grey अशा 2 रंगांमध्ये ही बाइक सादर करण्यात आली आहे.

रॉयल एनफिल्डने आपल्या इलेक्ट्रिक ब्रँड फ्लाइंग फ्लीअंतर्गत नवीन Flying Flea S6 Electric Scrambler सादर केली आहे. EICMA 2026 मध्ये या इलेक्ट्रिक मोटरसायकलचा खुलासा करण्यात आला असून, 2027 च्या सुरुवातीला भारतासह जागतिक मार्केटमध्ये तिचे लाँच होणार आहे. C6 इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या प्लॅटफॉर्मवर आधारित असलेली S6 ही स्क्रॅम्बलर बाइक खराब रस्ते, मातीचे रस्ते आणि हलक्या ऑफ-रोडिंगसाठी तयार करण्यात आली आहे. ही बाइक Dart Yellow आणि Lightning Grey अशा 2 कलरमध्ये अवेलेबल होणार आहे.

डिझाइनच्या बाबतीत Flying Flea S6 ला वेगळा स्क्रॅम्बलर लूक देण्यात आला आहे. यामध्ये पुढील बाजूला मोठे वायर-स्पोक व्हील आणि मागे तुलनेने लहान वायर-स्पोक व्हील देण्यात आले आहे. दोन्ही चाकांवर ब्लॉक-पॅटर्न टायर्स वापरण्यात आले आहेत. गोल्ड फिनिश अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स, उंच पिवळा मडगार्ड आणि लांब एंड्युरो स्टाइल सीट यामुळे बाइकला अ‍ॅडव्हेंचर लूक मिळतो. निळ्या रंगाची फ्रेम उघड्या स्वरूपात ठेवण्यात आली असून मध्यभागी बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटरची रचना दिसते.

रॉयल एनफिल्डची फेस्टिव्हल सेलमध्ये ऐतिहासिक विक्री! ऑक्टोबरमध्ये 1.33 लाख बाइक्सची विक्री

या बाइकच्या मध्यभागी हॉरिझॉन्टल रिबिंग असलेले मोठे ब्लॅक बॅटरी हाउसिंग देण्यात आले आहे. इलेक्ट्रिक मोटर चेसिसच्या खालच्या भागात बसवण्यात आली असून मागील चाकाला चेन ड्राइव्हद्वारे पॉवर दिली जाते. लहान साइड पॅनल्स, उघडी सबफ्रेम आणि कमी बॉडीवर्कमुळे बाइकचा लूक साधा आणि हलका ठेवण्यात आला आहे. व्हील रिम्सवरील पिवळे ग्राफिक्स बॉडीच्या रंगसंगतीशी जुळतात.

फीचर्सच्या बाबतीत Flying Flea S6 मध्ये गोलाकार कलर टचस्क्रीन देण्यात आली आहे. यावर कंपनीची Fleaware.OS सिस्टीम काम करते. या डिस्प्लेवर स्पीड, बॅटरी चार्ज, शिल्लक रेंज आणि रायडिंगशी संबंधित माहिती पाहता येते. याशिवाय विविध रायडिंग मोड्स आणि खास ऑफ-रोड मोड देण्यात आला आहे. ऑफ-रोडिंग करताना रायडरला मदत करण्यासाठी विविध इलेक्ट्रॉनिक रायडर असिस्टन्स सिस्टीमही मिळणार आहेत.

रॉयल एनफिल्डच्या Flying Flea ची पुण्यात एन्ट्री! शहरात सुरू केले 10 सेल्स & सर्व्हिस सेंटर

गोलाकार हेडलॅम्प, उंच हँडलबार, टॉल मिरर्स आणि कॉम्पॅक्ट हेडलॅम्प काऊलमुळे या बाइकचा स्क्रॅम्बलर लूक पूर्ण होतो. फ्लाइंग फ्लीच्या इलेक्ट्रिक मोटरसायकल कुटुंबात S6 हे खराब रस्त्यांसाठी तयार केलेले मॉडेल असेल. हाय टॉर्क इलेक्ट्रिक मोटर, ऑफ-रोड मोड आणि हलकी आर्किटेक्चर ही तिची खास वैशिष्ट्ये ठरणार आहेत. पण कंपनीने बॅटरी कॅपॅसिटी, मोटर पॉवर, टॉर्कचे आकडे, रेंज आणि किंमत जाहीर केलेली नाही. त्यामुळे या बाइकच्या भारतातील लाँचकडे इलेक्ट्रिक मोटरसायकल चाहत्यांचे लक्ष असेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Royal Enfield Flying Flea S6 भारतात कधी लाँच होणार आहे?

    Ans: रॉयल एनफिल्डच्या Flying Flea S6 Electric Scrambler चे भारतात 2027 च्या सुरुवातीला लाँच होण्याचे नियोजन आहे.

  • Que: Flying Flea S6 मध्ये कोणते खास फीचर्स मिळणार आहेत?

    Ans: या इलेक्ट्रिक बाइकमध्ये गोलाकार कलर टचस्क्रीन, Fleaware.OS, ऑफ-रोड रायडिंग मोड, वायर-स्पोक व्हील्स, ब्लॉक-पॅटर्न टायर्स आणि अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स मिळतात.

  • Que: Flying Flea S6 ची रेंज आणि किंमत किती असेल?

    Ans: कंपनीने या बाइकची बॅटरी कॅपॅसिटी, रेंज आणि किंमत जाहीर केलेली नाही. भारतातील लाँचच्या वेळी याबाबत माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Royal enfield flying flea s6 electric scrambler revealed auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Royal Enfield Shotgun 650 Son Of A Gun लिमिटेड एडिशन! जगभरात फक्त 100 बाइक्सची विक्री होणार! पाह काय असेल खास
1

Royal Enfield Shotgun 650 Son Of A Gun लिमिटेड एडिशन! जगभरात फक्त 100 बाइक्सची विक्री होणार! पाह काय असेल खास

Hero Classic Concept EICMA 2026 मध्ये सादर! Royal Enfield Classic 350 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?
2

Hero Classic Concept EICMA 2026 मध्ये सादर! Royal Enfield Classic 350 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?

Hero Scrambler Concept EICMA 2026 मध्ये सादर! Dakar Rally स्टाइलसह प्रीमियम बाइकची झलक
3

Hero Scrambler Concept EICMA 2026 मध्ये सादर! Dakar Rally स्टाइलसह प्रीमियम बाइकची झलक

अल्ट्राव्हायोलेट X-47 Venom इलेक्ट्रिक बाइक युरोपमध्ये लाँच! 343 km रेंज अन् 155 kmph टॉप स्पीड
4

अल्ट्राव्हायोलेट X-47 Venom इलेक्ट्रिक बाइक युरोपमध्ये लाँच! 343 km रेंज अन् 155 kmph टॉप स्पीड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.