Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TVS Orbiter चे युरोपमध्ये पदार्पण! रिमूव्हेबल बॅटरीसह मिळणार 105 km रेंज; पाहा अजून काय मिळणार

टीव्हीएस ऑर्बिटर आता युरोपमध्येही एन्ट्री करणार आहे. 1.8 kWh आणि 3.1 kWh बॅटरी, रिमूव्हेबल बॅटरी टेक्नोलॉजी आणि फ्रंट डिस्क ब्रेकसह ही स्कूटर 2027 मध्ये युरोपियन मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 04, 2026 | 04:26 PM
TVS Orbiter चे युरोपमध्ये पदार्पण! रिमूव्हेबल बॅटरीसह मिळणार 105 km रेंज; पाहा अजून काय मिळणार
Follow Us
Follow Us:
  • टीव्हीएस ऑर्बिटरच्या युरोपियन मॉडेलमध्ये 1.8 kWh आणि 3.1 kWh अशा 2 रिमूव्हेबल बॅटरीचे ऑप्शन मिळतात.
  • मोठ्या बॅटरीसह WMTC सायकलनुसार 105 km रेंज मिळते, तर टॉप स्पीड 45 kmph आहे.
  • 2027 मध्ये युरोपियन टाइप अप्रूव्हल मिळण्याची योजना असून किंमत आणि विक्रीची तारीख नंतर जाहीर होईल.

TVS मोटरने ईआयसीएमए 2026 मध्ये युरोपियन स्पेस TVS ऑर्बिटर इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. रिमूव्हेबल बॅटरी, 105 km पर्यंतची रेंज आणि फ्रंट डिस्क ब्रेक ही या मॉडेलची खास वैशिष्ट्ये आहेत. शहरातील रोजच्या प्रवासासाठी तयार केलेल्या या स्कूटरला 2027 मध्ये युरोपियन टाइप अप्रूव्हल मिळण्याची योजना आहे. किंमत आणि विक्री सुरू होण्याची तारीख संबंधित मार्केटनुसार नंतर जाहीर केली जाईल.

युरोपियन ऑर्बिटरमध्ये भारतात विकल्या जाणाऱ्या मॉडेलसारखी ट्युब्युलर स्टील फ्रेम, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि मागच्या बाजूला ट्विन शॉक अ‍ॅब्झॉर्बर्स दिले आहेत. पण युरोपियन मॉडेलमध्ये दोन्ही बॅटरी रिमूव्ह करता येतात. पुढे 14-इंच आणि मागे 12-इंच अलॉय व्हील्स आहेत. ब्रेकिंगसाठी 220 mm फ्रंट डिस्क आणि 130 mm रिअर ड्रम ब्रेकसह CBS मिळते. स्कूटरची सीट 760 mm उंचीवर असून सीटखाली 34 लिटर स्टोरेज स्पेस दिली आहे.

TVS चा युरोपमध्ये धमाका! EICMA 2026 मध्ये नव्या बाइक्सवरून पडदा उघडणार; कोणकोणत्या देशात कशी आहे योजना? जाणून घ्या

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 1.8 kWh आणि 3.1 kWh अशा 2 NMC लिथियम-आयन बॅटरीचे ऑप्शन मिळतात. लहान बॅटरीसह WMTC सायकलनुसार 70 km, तर मोठ्या बॅटरीसह 105 km रेंज अपेक्षित आहे. यात BLDC हब मोटर असून ती 1.85 kW रेटेड आणि 2.9 kW पीक पॉवर देते. स्कूटरचा टॉप स्पीड 45 kmph आहे.

फीचर्समध्ये हिल होल्ड, क्रूझ मोड आणि रिव्हर्स असिस्ट यांचा समावेश आहे. 5-इंच LCD डिस्प्ले ब्लूटूथद्वारे टीव्हीएस SmartXonnect अ‍ॅपशी जोडता येतो. LTE कनेक्टिव्हिटीमुळे जिओफेन्सिंग, क्रॅश अलर्ट, फॉल अलर्ट आणि लाईव्ह व्हेईकल ट्रॅकिंगची सुविधा मिळते. अ‍ॅपवर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल अलर्ट आणि उरलेल्या रेंजची माहितीही पाहता येते.

स्पोर्ट्स बाइक, इलेक्ट्रिक स्कूटर अन् लिमिटेड एडिशन! या आठवड्यात काय काय घडलं? जाणून घ्या लेटेस्ट बाईक्स अपडेट

550 W चार्जरद्वारे घरच्या सॉकेटमधून बॅटरी चार्ज करता येते. 1.8 kWh बॅटरीला 0 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 2 तास 39 मिनिटे, तर 3.1 kWh बॅटरीला 4 तास 33 मिनिटे लागतात. रिमूव्हेबल बॅटरी घरात किंवा वेगळ्या ठिकाणी चार्ज करण्यासाठी कंपनी ऑप्शनल चार्जिंग डॉकही देणार आहे.

TVS ने या स्कूटरचे डेव्हलपमेंट, इंजिनिअरिंग आणि प्रोडक्शन भारतात केले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ऑर्बिटरने 600 सेफ्टी आणि स्ट्रक्चरल स्ट्रेस टेस्ट पूर्ण केल्या आहेत. 5 ते 8 नोव्हेंबरदरम्यान मिलान येथे सुरू असलेल्या EICMA 2026 मध्ये ही स्कूटर पाहता येणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: युरोपियन टीव्हीएस ऑर्बिटरमध्ये कोणते बॅटरी ऑप्शन मिळतात?

    Ans: या स्कूटरमध्ये 1.8 kWh आणि 3.1 kWh अशा 2 रिमूव्हेबल NMC लिथियम-आयन बॅटरीचे ऑप्शन मिळतात.

  • Que: टीव्हीएस ऑर्बिटरची रेंज किती आहे?

    Ans: 1.8 kWh बॅटरीसह 70 km आणि 3.1 kWh बॅटरीसह 105 km WMTC रेंज अपेक्षित आहे.

  • Que: युरोपियन टीव्हीएस ऑर्बिटरची विक्री कधी सुरू होणार आहे?

    Ans: या स्कूटरसाठी 2027 मध्ये युरोपियन टाइप अप्रूव्हलची योजना आहे. विक्रीची तारीख आणि किंमत नंतर जाहीर केली जाईल.

Web Title: Tvs orbiter europe removable battery eicma 2026 electric scooter auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooters
  • TVS

संबंधित बातम्या

इटालजेटची भारतात एन्ट्री! इंडिया बाइक वीक 2026 मध्ये ड्रॅगस्टर 300, 459 आणि 700 होणार सादर
1

इटालजेटची भारतात एन्ट्री! इंडिया बाइक वीक 2026 मध्ये ड्रॅगस्टर 300, 459 आणि 700 होणार सादर

Royal Enfield Flying Flea S6 Electric Scrambler सादर! 2027 मध्ये भारतात होणार लाँच, ऑफ-रोडिंगसाठी मिळणार खास फीचर्स
2

Royal Enfield Flying Flea S6 Electric Scrambler सादर! 2027 मध्ये भारतात होणार लाँच, ऑफ-रोडिंगसाठी मिळणार खास फीचर्स

Royal Enfield Shotgun 650 Son Of A Gun लिमिटेड एडिशन! जगभरात फक्त 100 बाइक्सची विक्री होणार! पाह काय असेल खास
3

Royal Enfield Shotgun 650 Son Of A Gun लिमिटेड एडिशन! जगभरात फक्त 100 बाइक्सची विक्री होणार! पाह काय असेल खास

Hero Classic Concept EICMA 2026 मध्ये सादर! Royal Enfield Classic 350 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?
4

Hero Classic Concept EICMA 2026 मध्ये सादर! Royal Enfield Classic 350 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.