
फोटो सौजन्य: Pinterest
Tata Sierra EV ला डिजिटलदृष्ट्या अत्याधुनिक वाहनांपैकी एक बनवण्यात येणार आहे. या SUV मध्ये मोठा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सेंट्रल टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि पॅसेंजर साइड डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.
लाँचनंतर Tata Sierra ला भारतीय ऑटो बाजारात चांगला प्रतिसाद मिळत असून, अवघ्या पहिल्या 24 तासांत 70 हजारांहून अधिक बुकिंग्स नोंदवण्यात आल्या होत्या. 15 जानेवारीपासून या SUV ची डिलिव्हरी सुरू होणार आहे. गुजरातमधील सानंद येथील टाटा प्लांटमध्ये या वाहनाचे उत्पादन वेगाने सुरू आहे. Tata Sierra ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹11.49 लाख आहे.
2025 Tata Sierra मध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, ते 105 bhp पॉवर आणि 145 Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला आहे. हे इंजिन शहरातील वापरासाठी स्मूथ असून, महामार्गावरही आरामदायक ड्रायव्हिंग अनुभव देते. उंच ड्रायव्हिंग पोस्चरमुळे गाडी चालवताना खरी SUV फील मिळते.
Tata Sierra चे मायलेज 18.2 kmpl पर्यंत असून, या सेगमेंटमध्ये ते चांगले मानले जाते. याशिवाय या SUV मध्ये टर्बो-पेट्रोल आणि टर्बो-डिझेल इंजिनचे पर्यायही उपलब्ध आहेत. भारतीय बाजारात Tata Sierra ची थेट स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos आणि Renault Duster यांसारख्या लोकप्रिय SUVs शी आहे.