फोटो सौजन्य: Pinterest
Hyundai Venue चे डिझाइन अधिक मस्क्युलर असून, रस्त्यावर दमदार उपस्थिती निर्माण करते. तर दुसरीकडे Kia Syros चे टॉलबॉय डिझाइन तिला अधिक अर्बन आणि कॉम्पॅक्ट लुक देते, जो शहरातील वापरासाठी अधिक सोयीस्कर मानला जातो.
नव्या Hyundai Venue चा टॉप व्हेरिएंट HX 10 असून तो 1.0 लिटर टर्बो पेट्रोल DCT आणि 1.5 लिटर डिझेल ऑटोमॅटिक इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. दुसरीकडे, Kia Syros चा टॉप मॉडेल HTX+ (O) हाही याच इंजिन आणि ट्रान्समिशन कॉम्बिनेशनमध्ये येतो. किंमतीच्या बाबतीत दोन्ही SUVs ची एक्स-शोरूम किंमत जवळपास समान आहे; मात्र काही अतिरिक्त फीचर्समुळे Syros ही Venue च्या तुलनेत किंचित महाग पडू शकते.
फास्ट चार्जिंग, 212 KM रेंज आणि टॅबलेटसारखा मोठा डिस्प्ले! रोजच्या प्रवासासाठी ‘ही’ Electric Scooter
डायमेंशन्सच्या बाबतीत Kia Syros ही Venue पेक्षा थोडी आघाडीवर आहे. Syros चा व्हीलबेस 2,550 मिमी असून तो Venue पेक्षा 30 मिमी अधिक आहे. तसेच तिची उंचीही 15 मिमी जास्त असल्याने मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना अधिक हेडरूम मिळते. Syros मध्ये 17-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, तर Venue मध्ये 16-इंच अलॉय व्हील्स मिळतात. मात्र Venue चा फ्रंट ग्रिल आणि DRL डिझाइन तिला अधिक स्पोर्टी आणि SUVसारखा लुक देतात.
दोन्ही SUVs फीचर्सने परिपूर्ण असल्या तरी, या बाबतीत Kia Syros एक पाऊल पुढे आहे. Hyundai Venue मध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जिंग, पॉवर्ड ड्रायव्हर सीट आणि प्रीमियम ऑडिओ सिस्टमसारखी फीचर्स मिळतात. तर Kia Syros मध्ये 5-इंच AC कंट्रोल डिस्प्ले, रिअर सीट बेस वेंटिलेशन, एअर प्युरिफायर, स्लायडिंग रिअर सीट्स आणि पॅनोरमिक सनरूफ यांसारखी अधिक प्रगत फीचर्स देण्यात आली आहेत, जी Venue मध्ये उपलब्ध नाहीत.
सुरक्षेच्या बाबतीत दोन्ही SUVs जवळपास समान पातळीवर आहेत. दोन्ही कार्समध्ये लेव्हल-2 ADAS, 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, पॅडल शिफ्टर्स, विविध ड्राइव्ह मोड्स आणि अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. Venue ची मजबूत बिल्ड क्वालिटी आणि Syros चा स्थिर K1 प्लॅटफॉर्म या दोन्ही SUVs सुरक्षित बनवतात.






