
अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्समुळे ‘हे’ प्रीमियम हेल्मेट चर्चेत!
EICMA मध्ये प्रथमच सादर झालेली ही नवी प्रीमियम रेंज अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्स, आकर्षक स्टाइल आणि एर्गोनॉमिक डिझाइन यांचा उत्तम मिलाफ घडवून रायडिंगचा अनुभव अधिक समृद्ध करते.
Tata Sierra vs MG Hector facelift: कोणत्या SUV ची बात न्यारी? जाणून घ्या फीचर्स
SMK Cygnus हे आतापर्यंतचे SMK चे सर्वात अत्याधुनिक आणि फुली-लोडेड हेल्मेट आहे. 180° रोटेटिंग चिन बार असलेले हे हेल्मेट फुल-फेस आणि ओपन-फेस मोडमध्ये सहज रूपांतर करता येते. क्रूझर रायडिंगसाठी सरळ बसण्याच्या पोझिशनमध्ये ओपन-फेस, तर स्पोर्ट रायडिंगसाठी टक पोझिशनमध्ये फुल-फेस असा वापर करता येतो, ज्यामुळे एरोडायनॅमिक्सही सुधारतात.
P/J सर्टिफिकेशन असलेल्या भारतातील मोजक्या हेल्मेट्सपैकी एक असलेले Cygnus, अॅडव्हान्स सेफ्टी, मजबूत बिल्ड क्वालिटी आणि आधुनिक स्टाइल यांना प्राधान्य देणाऱ्या रायडर्ससाठी खास डिझाइन करण्यात आले आहे.
सेफ्टीच्या दृष्टीने Energy Impact Resistant Thermoplastic (EIRT) शेल आणि Multi-density EPS लाइनर यांचा वापर करून इम्पॅक्ट अब्झॉर्प्शन अधिक प्रभावी करण्यात आले आहे. वाइड अॅन्टी-स्क्रॅच व्हायझर, Pinlock® MaxVision @120, इंटिग्रेटेड सन व्हायझर, दर्जेदार व्हेंटिलेशन सिस्टीम, डबल D-रिंग आणि रिमूवेबल, मऊ हायपोअॅलर्जेनिक लाइनर अशा अनेक प्रीमियम फीचर्सनी हे हेल्मेट रायडर्ससाठी एक उत्तम पर्याय बनते.
Ola चं टेन्शन वाढलं! ‘ही’ कंपनी आणतेय स्वस्त Electric Scooter, कधी होणार लाँच?
Cygnus हा सध्या Solid व्हेरिएंटमध्ये 5 ऑप्शन्ससह उपलब्ध असून Black, White, Metallic Grey आणि Nardo Grey अशा 4 रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. XS ते XXXL साइज रेंजमध्ये उपलब्ध असलेले हे हेल्मेट 2 शेल ऑप्शन्समध्ये येणार आहे. बाजारात पूर्ण प्रमाणात लाँच झाल्यानंतर याची अंदाजे किंमत 17,000–20,000 रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे.