फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये कार्सची विक्री होत असते. ग्राहकांच्या बजेट आणि आवश्यकतेनुसार ते त्यांची कार निवडत असतात. यातही सर्वात जास्त डिमांड ही एसयूव्ही विभागातील वाहनांना असते. याच मागणीकडे लक्ष देत अनेक कार उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात.
भारतात सब 4 मीटर एसयूव्हींना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यात म्हणजेच जून 2025 मध्ये सब 4 मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये कोणत्या कंपनीच्या कोणत्या एसयूव्हीला सर्वाधिक मागणी मिळाली. कोणत्या एसयूव्ही टॉप-5 मध्ये समाविष्ट झाल्या आहेत? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
अरेरेरे किती वाईट ! Fortuner सोबत भिडायला गेलेल्या ‘या’ SUV ला एका सुद्धा ग्राहकाने खरेदी केले नाही
मारुती सुझुकी ब्रेझा ही सब 4 मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी विक्रीसाठी सादर करत आहे. गेल्या महिन्यात कंपनीने सादर केलेल्या या एसयूव्हीच्या 14507 युनिट्सची विक्री झाली. या कारच्या वर्षानुवर्षे विक्रीत 10.14 टक्के वाढ झाली आहे.
या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने Tata Nexon ऑफर केली आहे. ही कार मार्केटमध्ये लाँच होताच सुपरहिट ठरली होती. ही एसयूव्ही ICE तसेच EV मध्ये देखील ऑफर केली जाते. गेल्या महिन्यात त्याची एकूण विक्री 11602 युनिट्स झाली आहे. यासह, या एसयूव्हीला टॉप-5 यादीत दुसरे स्थान मिळाले आहे.
टाटा मोटर्सने मायक्रो एसयूव्ही म्हणून सादर केलेली टाटा पंच देखील खूप लोकप्रिय आहे. गेल्या महिन्यात या एसयूव्हीच्या एकूण 10446 युनिट्सची विक्री झाली आहे. यासह, ही कार या विक्री यादीत तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.
‘या’ Electric Auto Rickshaw ची बातच न्यारी ! फुल्ल चार्जमध्ये मिळेल 227 किलोमीटरची रेंज
मारुती सुझुकीने सब 4 मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये मारुती फ्रॉन्क्स विकते. गेल्या महिन्यात या एसयूव्हीच्या 9815 युनिट्स विकल्या गेल्या. वर्षानुवर्षे विक्रीत 1.31 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
महिंद्रा एक्सयूव्ही 3एक्सओ देखील या सेगमेंटमध्ये ऑफर केली जाते. गेल्या महिन्यात कंपनीने ऑफर केलेल्या या एसयूव्हीच्या 7089 युनिट्स विकल्या गेल्या आहेत.