
सध्या मारुती सुझुकीची वार्षिक उत्पादन क्षमता सुमारे 29 लाख वाहनांची आहे. कंपनीच्या आधीच्या नियोजनानुसार ही क्षमता आर्थिक वर्ष 2027 अखेर 29 लाख आणि आर्थिक वर्ष 2031 अखेर 36.5 लाख युनिट्सपर्यंत जाण्याची अपेक्षा होती. पण वाढती मागणी आणि निर्यातीच्या संधी लक्षात घेता सुझुकीने आता 40 लाख वाहनांचे लक्ष्य ठेवले आहे.
Maruti Suzuki: मारुती सुझुकीचे ग्रीन कार विक्रीचे लक्ष्य वाढले! 10 लाख वाहनांचे टार्गेट
गेल्या वर्षी छोट्या कारवरील GST दरात बदल झाल्यानंतर वाहनांच्या मागणीत वाढ झाली होती. त्यामुळे मारुती सुझुकीला काही काळ उत्पादन क्षमतेपेक्षा जास्त बुकिंगचा सामना करावा लागला. कंपनीने मागणी पूर्ण करण्यासाठी काही काळ रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही प्लांट सुरू ठेवले होते. नव्या क्षमतेमुळे भविष्यात उत्पादन आणि डिलिव्हरीचा वेग वाढण्यास मदत होऊ शकते.
सुझुकीचे आणखी एक महत्त्वाचे लक्ष्य म्हणजे नवीन कार विकसित करण्यासाठी लागणारा वेळ 2030 पर्यंत निम्मा करणे. कंपनी डिझाइन, उत्पादन, क्वालिटी आणि खरेदी प्रक्रिया एकाच वेळी पुढे नेण्याबरोबरच डिजिटल इंजिनिअरिंग आणि समान मॉड्यूल्सचा वापर वाढवणार आहे.
मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
दरम्यान, सुझुकी कॉम्पॅक्ट कारसाठी ‘REEV Light’ नावाच्या रेंज-एक्स्टेंडेड इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानावर काम करत आहे. या वाहनात चाके इलेक्ट्रिक मोटरद्वारे फिरतील, तर छोटा पेट्रोल इंजिन बॅटरी चार्ज करण्यासाठी जनरेटर म्हणून काम करेल. मोठी बॅटरी न वापरता जास्त ड्रायव्हिंग रेंज देणे हा यामागचा उद्देश आहे. भारतासाठी हे तंत्रज्ञान भविष्यात महत्त्वाचे ठरू शकते.